अधिक वार्ता

नास्तिकवादी महिलांनी धर्म परंपरा न थांबवल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल ! – शिवसेनेच्या सौ. सुषमा पाडुळे आणि सौ. आशा निंबाळकर

महिलांची ही धर्मविरोधी कृती ही केवळ शनिशिंगणापूर येथे जाऊन स्टंटबाजी करणारी आहे. त्या नास्तिकवादी कृत्याला आम्ही पूर्ण विरोध करतो. त्यांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्या नास्तिकवादी महिलांना शिवसेना तिच्या पद्धतीने उत्तर देईल. Read more »

देश लुबाडणार्‍या भ्रष्ट नेत्यांच्या जमिनी शासनाने प्रथम शेतकर्‍यांच्या नावे कराव्यात ! – हिंदु जनजागृती समितीची प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी

निवडणुकीच्या माध्यमातून राजसत्ता मिळालेल्या राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचार करून देशच बुडीत काढला. यात मंदिरांचा कोणताही दोष नसतांना आता मंदिरांच्या भूमींवर डोळा ठेवून त्या लाटण्याचा प्रयत्न करणे, हे धर्माला अफूची गोळी मानणार्‍या डाव्यांचे षड्यंत्र आहे. Read more »

‘इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट’च्या (IAIS च्या) राष्ट्रव्यापी चळवळीला अनेक राज्यांतून मोठा प्रतिसाद

काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे फडकावणारे, राजस्थानात इसिस जिंदाबादच्या घोषणा देणारे, तमिळनाडूत इसिसचे टी-शर्ट घालणारे किंवा आज ठाणे, हैद्राबाद आणि कर्नाटक येथे अटक करण्यात आलेले इसिसचे समर्थक म्हणजे भारतात इसिस पसरत असल्याचा ठळक पुरावा आहेत. Read more »

देशभरातून इसिसच्या ११ संशयित आतंकवाद्यांच्या आवळल्या मुसक्या !

देशभरात एकाच वेळी बॉम्बस्फोटांची शृंखला घडवण्याचा कट राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) अधिकार्‍यांनी उधळला. यांसदर्भात मुंब्रा (महाराष्ट्र), हैद्राबाद, राजस्थान आणि कर्नाटक येथून ११ संशयित आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. Read more »

नवापूर (जिल्हा नंदुरबार) येथील ऐतिहासिक मोर्च्यात १२ सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग

नवापूर शहरातील दोन धर्मांधांनी शेजारी रहाणार्‍या अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार केल्याच्या विरोधात १९ जानेवारी या दिवशी विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात १२ सहस्रांहून अधिक हिंदू सहभागी झाले होते. हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. Read more »

पुणे जळीत कांड : हिंदू असल्‍यानेच माझ्या मुलाला ठार केले, वडिलांचा आरोप

शहरात १३ जानेवारी रोजी सावन राठोड (१७) या युवकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्‍याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्‍यान, आपला मुलगा हा हिंदू असल्‍यानेच त्‍याची हत्‍या केली गेली असा आरोप सावनचे वडील धर्मा राठोड यांनी केला आहे. Read more »

पाक हिंदु क्रिकेटपटू कनेरिया म्हणाला, मी मरतोय, BCCI ने मदत करावी

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदीची शिक्षा झालेला पाकिस्तानातील हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ICC समोर आपले म्हणणे मांडण्यासाठी मदत करण्याची विनंती BCCI ला केली आहे. Read more »

सनातन संस्था धर्मप्रसाराचे उत्कृष्ट कार्य करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा

सनातन संस्था धर्मप्रसाराचे उत्कृष्ट कार्य करत आहे, असे गौरवोद्गार योगऋषी रामदेवबाबा यांनी काढले. पतंजली योग समिती मुंबई यांच्या वतीने योगऋषी रामदेव बाबा यांचे योग चिकित्सा आणि ध्यान निःशुल्क शिबीर वांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स एम्एम्आर्डीए मैदान येथे १७ ते २१ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आले होते. Read more »

हिंदू देवतेच्या मूर्तीचे अवशेष फ्रान्सकडून कंबोडियाला परत

सातव्या शतकातील एका हिंदू देवतेच्या मूर्तीचे फ्रान्समध्ये असलेले शीर तब्बल 130 वर्षांनंतर त्या देशाने पुन्हा कंबोडियाकडे सोपविले आहे. हे शीर मूळ शरीराला पुन्हा जोडण्यात आले असून, संग्रहालयात ठेवलेली ही मूर्ती आजपासून पुन्हा नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. Read more »

1 1,265 1,266 1,267 1,268 1,269 1,284