हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखा !

हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन अन् त्यांच्यावरील अश्‍लाघ्य टीका रोखा !

धर्महानी होत असल्याच्या बर्‍याच घटना आपल्याकडे घडत असतात. त्यातीलच एक समस्या म्हणजे हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन केले जाणे, तसेच त्यांच्यावर अश्‍लाघ्य टीका केली जाणे, ही आहे.

१. धर्मश्रद्धांचे भंजक कोण ?

अ. धर्मद्रोही आणि हिंदुद्वेष्टे

हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन अथवा त्यांच्यावर अश्‍लाघ्य टीका करून हिंदूंच्या धर्मश्रद्धांचे भंजन करण्याचा कट हिंदु धर्मातील काही धर्मद्रोही आणि अन्य पंथियांतील हिंदुद्वेष्टे यांनी रचला आहे. चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदु देवता आणि भारतमाता यांची नग्न अन् अश्‍लील चित्रे रेखाटली होती, हे आपल्याला ज्ञात आहे.

आ. धर्मशिक्षण नसलेले हिंदू

काही वेळा धर्मशिक्षण नसल्याने सामान्य हिंदूंकडूनही नकळतपणे देवतांचे विडंबन केले जाते. मध्यंतरी टी.व्ही.एस्. स्कूटीने तिच्या विज्ञापनात श्री गणेशाला उंदराऐवजी स्कुटीवर बसवलेले दाखवून यंदा गणपतीने आपले वाहन बदलले, असे सांगणारे विज्ञापन गणेशोत्सवाच्या काळात प्रसिद्ध केले होते.

२. धर्महानी रोखण्याचे महत्त्व

देवतांचे विडंबन अथवा देवता, धर्मग्रंथ, संत आदी श्रद्धास्थानांवर टीका करणार्‍याला धर्मद्रोहाचे पातक लागते. ही धर्महानी घडत असतांना बघ्याची भूमिका घेणे अथवा त्याचे मूकसंमतीदार बनणे, हाही धर्मद्रोह असून त्यासाठीही तितकेच पातक भोगावे लागते.

अ. देवतांचे विडंबन करणार्‍यांना शिक्षा भोगावीच लागते, याचे एक उदाहरण म्हणजे चित्रकार डॉ. सुबोध केरकर !

गोवा येथील चित्रकार डॉ. सुबोध केरकर यांनी ३-४ वर्षांपूर्वी श्री गणेशाची अनेक विडंबनात्मक चित्रे रेखाटून त्यांचे प्रदर्शन भरवले होते. त्यांपैकी एक चित्र होते, श्री गणेशाचे शिर अन् उंदराचे धड असलेले विडंबनात्मक शिल्प ! अशा प्रकारचे चित्रप्रदर्शन भरवण्यास हिंदू जनजागृती समितीसह धर्मप्रेमींनी विरोध करूनही त्यांनी हे विडंबन चालूच ठेवले होते. पुढे काही कालावधी उलटल्यानंतर केरकर यांच्यावर भ्रष्टाचार करून शासनाला फसवल्याच्या एका प्रकरणात गोवा शासनाने गुन्हा दाखल केला. केरकर यांना त्यांच्या धर्मद्रोहाची शिक्षा लगेचच भोगावी लागली.

या घटनेतून मिळालेला दुसरा बोध म्हणजे ज्यांची वृत्ती तामसिक असते, ते विडंबन करतात. अशांना देवतेचे विडंबन केल्याबद्दल जसे काहीच वाटत नाही, तसे भ्रष्टाचार केल्यानंतरही काही वाटत नाही. साधना करणारे भक्त मात्र सात्त्विक असतात. ते देवतांचे विडंबन किंवा भ्रष्टाचार करत नाहीत.

३. हिंदु धर्माभिमानी बनण्यासाठी त्यांच्यामध्ये देवता, धर्मग्रंथ आणि राष्ट्रपुरुष यांच्याविषयी आदर निर्माण होणे आवश्यक !

मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मीय त्यांच्या धार्मिक अस्मितांविषयी अत्यंत सजग असतात; पण हिंदूंना त्यांच्या देवतांचे त्यांच्या समोर विडंबन होत असले, तरी त्यात काही चुकीचे आहे, असे वाटत नाही. हे हिंदूंमधील धर्माभिमान लोप पावत असल्याचे लक्षण आहे. हिंदूंमधील धर्माभिमान पुन्हा जागृत करायचा असल्यास देवता, हिंदु धर्म, धर्मग्रंथ आणि राष्ट्रपुरुष यांच्याविषयी त्यांच्या मनात पूजनीय भाव निर्माण करायला हवा. देवता, धर्मग्रंथ आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखण्याच्या कृतीतून हे साध्य होत असल्याचा अनुभव समितीच्या कार्यकर्त्यांना गेल्या १० वर्षांत आला आहे.

४. धर्महानी रोखण्यात हिंदू जनजागृती समितीला मिळालेल्या यशाचा संक्षिप्त आढावा

अ. विज्ञापने, वर्तमानपत्रातील व्यंगचित्रे यांमध्ये देवता अन् राष्ट्रपुरुष यांचे विडंबन केले जाते. हिंदू जनजागृती समितीने कॅडबरी, एबीएन् एम्रो, पार्ले, अमूल यांसारख्या राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे होणारे देवतांचे विडंबन त्या त्या वेळी आंदोलने करून रोखले आहे.

आ. उत्पादनांची वेष्टने, फटाके यांवर देवतांची चित्रे, धर्मप्रतीके आणि राष्ट्रपुरुषांची चित्रे छापली जातात. त्यांचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करतात.

समितीच्या कार्यकर्त्यांनी तंबाखूच्या पुडीवरील ॐ, उदबत्तीचे वेष्टन, मिठाईची खोकी, फटक्यांवरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे पालटण्यासंदर्भात उत्पादकांचे प्रबोधन केले. या प्रबोधनाचा सुपरिणाम म्हणजे त्यांनी उत्पादनांवरील विडंबनात्मक चित्रे पालटली.

इ. चित्रपट, नाटके, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका यांमध्ये देवतांना मानवी रूपात दाखवले जाते, तसेच राष्ट्रपुरुषांच्या तोंडी विनोदी संवाद घातले जातात.

हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत १७ नाटके, आणि दूरचित्रवाहिन्यांवरील ८ मालिका यांमधील देवता किंवा राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखले आहे. यात यदा-कदाचित्, बिघडले स्वर्गाचे दार अशी मराठी नाटके, द लव्ह गुरु यासारखे हॉलीवूडचे चित्रपट यांचाही समावेश आहे.

ई. चित्रकार हुसेन यांच्या विरोधातील समितीचा लढा !

देवतांची चित्रे विकृत पद्धतीने रेखाटणारे चित्रकार म.फि. हुसेन वा अन्य चित्रकारांच्या विडंबनात्मक चित्रांचा समावेश असलेली सुमारे २५ हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्र-प्रदर्शने समितीने रोखली आहेत. तसेच संकेतस्थळांच्या माध्यमातून होणारी १६० हून अधिक विडंबने समितीने ऑनलाईन आंदोलन करून रोखली आहेत.

उ. काही धर्मद्रोही हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता यांच्यावर हेतूपुरस्सर अश्‍लाघ्य टीका करतात. धार्मिक ग्रंथ जाळतात वा त्यांवर टीका करतात.

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची एक संघटना आहे. ती हिंदु धर्म, धर्मग्रंथ, संत आदी श्रद्धास्थानांवर टीका करते. हिंदू जनजागृती समितीने अशा हिंदुविरोधी आणि निरीश्‍वरवादी संघटनांच्या सभा रोखल्या आहेत.

या सर्व विश्‍लेषणाचा आशय इतकाच आहे की, प्रबोधनाच्या अंगाने हा उपक्रम राबवला, तर या माध्यमातूनही धर्महानी रोखता येते. देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन, तसेच देवता, धर्म आणि धर्मग्रंथ यांवरील टीका अशा धर्महानी रोखण्याच्या ३७५ हून अधिक घटनांमध्ये समितीला यश मिळाले आहे; किंबहुना या उपक्रमामुळेच समितीचे कार्य देशविदेशांत पोहोचले आहे.

५. धर्महानी रोखण्याच्या कृती कशा कराव्यात ?

अ. उत्पादकांना देवतांची चित्रे वेष्टनांवर (उदा. उदबत्ती, मिठाई, फटाके) वापरू नका, यासाठी प्रबोधन करा ! धर्महानी करणार्‍या घटकांना पत्र, इ-मेल, दूरध्वनी करून वा प्रत्यक्ष भेटून त्यांचे धर्महानी केल्याने होणार्‍या आध्यात्मिक हानीविषयी प्रबोधन करावे.विडंबन केल्याने देवतेचा अपमान होतो. त्यामुळे तिची अवकृपा होते, हे शास्त्र कळल्यावर लोकही स्वतःहून विडंबन थांबवतात. अशा प्रकारे प्रबोधन करून समितीने धर्महानीच्या शेकडो घटना रोखल्या आहेत.

आ. नाटके, चित्रपट, विज्ञापने, चित्रप्रदर्शने, पुस्तके इत्यादींद्वारे देवतांचे विडंबन करणार्‍यांचे प्रबोधन करूनही त्यांनी धर्महानी न थांबवल्यास अनेकांनी दूरभाष करून त्यांचा निषेध करावा.  निषेध करणे, हा प्रत्येक नागरिकाचा घटनादत्त अधिकार आहे. अनेकांनी निषेध नोंदवल्यामुळे धर्महानी करणार्‍याला धाक बसतो.

इ. देवता, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन करणारी विज्ञापने, नाटके, चित्रपट आदींविरुद्ध प्रखर आंदोलने करून विडंबन रोखा ! तसेच त्यांच्या विरोधात सेन्सॉर बोर्ड आणि पोलीस यांच्याकडे गार्‍हाणे नोंदवा ! अशांच्या विरोधात भारतीय दंडविधान संहितेतील २९५ अनुसार धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंदवता येतो, हे लक्षात घ्या !

ई. देवतांविषयी अनुद्गार काढणार्‍यांच्या विरोधात पोलिसांत गार्‍हाणे (तक्रार) मांडून धर्मद्रोह्यांवर कारवाई करण्यास भाग पाडा ! धर्मद्रोही मंडळींनी त्यांच्या कार्यक्रमातून राष्ट्र अन् धर्म यांच्या विरोधात टीका करू नये, यासाठी त्या भागातील पोलिसांना त्या कार्यक्रमापूर्वीच निवेदन द्या आणि पोलिसांमार्फत ही धर्महानी रोखण्याचा प्रयत्न करा !

पोलिसांनी निवेदन स्वीकारले नाही आणि काही कृती केली नाही, तर ते निवेदन त्यांच्या वरिष्ठांनाही द्यावे. या निवेदनासोबत पोलीस स्थानकात तक्रार न स्वीकारल्याविषयीची तक्रारही वरिष्ठांना (उदा. पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त) लेखी द्यावी. देवतांच्या विडंबनाविषयी कोणीच दखल न घेतल्यास अधीवक्त्यांच्या साहाय्याने स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल करावी.

उ. देवतांचे विडंबन करणारी नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्या यांच्यावर बहिष्कार घालण्याविषयी समाजाला आवाहन करा ! अशा माध्यमांतून देवतांचे विडंबन रोखण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.

६. देवतांचे विडंबन रोखण्यासाठी हिंदू आक्रमक होणार नाहीत, याची काळजी शासनाने घ्यायला हवी !

मागे काही वर्षांपूर्वी नाटक, चित्रपट यांतून देवतांचे विडंबन न थांबवले गेल्यामुळे काही हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत होऊन स्फोटाच्या काही घटना घडल्या होत्या. असे करण्याची वेळ हिंदूंवर का यावी, याचा विचार शासनाने अंतर्मुखतेने करायला हवा. येथे कृतीपेक्षा कृतीमागील उद्देश महत्त्वाचा आहे. या स्फोटामागे देवतांचे विडंबन रोखण्याचा धर्माभिमान्यांचा उद्देश होता. त्यामुळे त्यांना त्या घटनेचे पाप-पुण्य लागले नाही. ही घटना कायद्याच्या विरोधात असेल; पण त्या घटनेच्या परिणामांचा विचार आपण करायला हवा. नाटकांतील देवतांच्या विडंबनेच्या पार्श्‍वभूमीवर ही घटना घडली होती. या घटनेनंतर देवतांचे विडंबन असलेले एकही नाटक नाट्यसृष्टीत आले नाही. आता अनेक नाट्यलेखक त्यांच्या नवीन नाटकांच्या संहिता घेऊन हिंदुत्ववाद्यांकडे येतात आणि त्यात देवतांचे विडंबन नाही ना, याची खात्री करून घेतात. देवतांचे विडंबन रोखण्याच्या उपक्रमातील हा एक मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. अर्थात हिंदूंच्या धर्मभावनांचा स्फोट होईल, अशा कृती होणार नाहीत, याची काळजी सत्ताधार्‍यांनी घेतली, तर पुढील सर्वच घटना आपोआप टळतील.

७. हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखणे, हे धर्मपालनच !

धर्मविषयी कर्तव्य बजावणे म्हणजे जसे धर्मपालन, तसे देव आणि धर्म यांची विटंबना थांबवणे, हेदेखील धर्मपालनच आहे. आपण जर धर्माचे रक्षण केले, तर धर्म (ईश्‍वर) आपले रक्षण करतो. म्हणजेच देवतांचे विडंबन थांबवण्यासाठी प्रयत्न केले, तर आपल्या कार्याला देवतांचेही आशीर्वाद लाभतात; किंबहुना ते कार्य होण्यासाठी ईश्‍वरच आपणाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती पुरवत असतो. त्यासाठीच हिंदुत्ववादी संघटनांनी सर्रासपणे होणारे देवतांचे विडंबन रोखून धर्मकर्तव्य बजावायला हवे.​संबंधित बातम्या

डोणगाव (सोलापूर) येथे धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी रोखले छत्रपती शिवरायांचे विडंबन

डोणगाव येथे काही दुकानांमध्ये छत्रपती शिवरायांचे चित्र असलेली पिचकारी विक्रीसाठी ठेवली होती. गावातील धर्मशिक्षणवर्गातील काही धर्मप्रेमींना हा प्रकार लक्षात आला. Read more »

भगवा रंग एका धर्मासाठी किती महत्त्वाचा आहे, हे गाणे बनवणार्‍याला माहीत नाही का ? – मुकेश खन्ना, ज्येष्ठ अभिनेते

भगवा रंग एका धर्मासाठी किती महत्त्वाचा आहे, हे गाणे बनवणार्‍याला माहीत नाही का ? असा प्रश्‍न ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या अर्धनग्न अवस्थेतील अश्‍लील नृत्याविषयी मुकेश खन्ना यांनी उपस्थित केला. Read more »

आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्याकडून हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचे एक हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित झाले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही या प्रकरणी आमीर खान यांच्यावर टीका केली आहे. Read more »

‘भारत राष्‍ट्र समिती’ या पक्षाच्‍या फलकावरील भारताच्‍या नकाशात जम्‍मू-काश्‍मीरचा भाग वगळला !

तेलंगाणातील निझामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी ‘तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा नवा राष्‍ट्रीय पक्ष ‘भारत राष्‍ट्र समिती’च्‍या फलकावरील भारताच्‍या मानचित्रात (नकाशात) काश्‍मीरचा भाग वगळण्‍यात आल्‍याचे दाखवण्‍यात आले आहे’, असा आरोप केला आहे. Read more »

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना कायदेशीर नोटीस

‘आदिपुरुष’ चित्रपटातून रामायणाचे इस्लामीकरण केले आहे, असा आरोप ब्राह्मण महासभेने केला आहे. याविषयी आठवडाभराच्या आत क्षमा मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. Read more »