।। जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्‌ ।।

आमचा उद्देश्य

हिंदु जनजागृती समिती ही हिंदु हितासाठी कार्य करणारी एक अशासकीय संघटना (एनजीओ) आहे. धर्मपालन, धर्मशिक्षण, समाजात धर्मजागृती करणे, राष्ट्ररक्षण आणि भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या उद्देशाने हिंदूंचे संघटन करण्यासाठी समिती कटीबद्ध आहे. हिंदु धर्म-परंपरेच्या संदर्भात दिशाभूल करणारी माहिती, हिंदु देवी-देवतांचे विडंबन, हिंदुद्वेष तसेच राष्ट्रीय चिन्हे आणि संपत्तीचा मान राखण्यासाठी प्रयत्न करणे, हे समितीचे प्रमुख कार्य आहे.

आमचे ध्येय

हिंदु राष्ट्राची स्थापना धर्माच्या सिद्धांतावर आधारित आहे, जे सनातन धर्माच्या (हिंदू धर्माच्या) शाश्वत मूल्यांचे आचरण, जतन आणि प्रसार करण्यासाठी अनुकूल आहे. यामुळे सुखी, निरोगी, समृद्ध आणि सुरक्षित विश्व निर्माण होण्यास सहाय्य होईल.

आमची मूल्ये

अध्यात्म हाच कोणत्याही कार्याचा पाया आहे. दैवी कृपेच्या बळावर प्रत्येक कार्य यशस्वी होते. म्हणून हिंदु जनजागृती समिती (HJS) धर्माच्या निःस्वार्थ सेवेला आध्यात्मिक साधना मानते.

धर्मो रक्षति रक्षित: – “आपण धर्माचे रक्षण केले की, धर्म आपले रक्षण करतो’’

आमची वाटचाल

१० हिंदूंना १००० हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी जोडणे

प्रारंभ

विविध माध्यमांतून होणारी देवी-देवतांची विटंबना पाहून २००२ मध्ये काही जागरूक हिंदु याविषयी चर्चा करण्यासाठी एकत्रित आले. या चर्चेमधून असे लक्षात आले की, हिंदु समुदाय धार्मिक असला तरी, आजच्या काळात हिंदु धर्मासमोर असणाऱ्या विविध समस्यांबद्दल अनभिज्ञ आहे. यातून, दैनंदिन जीवनात धर्मरक्षणाचे बीज जागृत करण्याची आ‌वश्यकता निर्माण झाली. म्हणूनच, 2002 च्या नवरात्रीला म्हणजेच घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली.

आमचे प्रेरणास्रोत

हिंदु जनजागृती समितीला द्रष्टा राष्ट्रसंत सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत आठवले यांच्याकडून प्रेरणा मिळाली. ते हिंदु राष्ट्राचे पुरस्कर्ते आहेत.

प्राथमिक आव्हान

हिंदु बहुसंख्य असलेल्या देशात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना अस्तित्वात असताना, एक नवीन उदयोन्मुख हिंदु संघटना म्हणून हिंदु जनजागृती समितीला आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागले. विविध उपक्रमांचे आयोजन, समितीच्या स्वयंसेवकांचे निःस्वार्थी वर्तन आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाप्रती असलेले समर्पण यांमुळे आता राष्ट्र आणि धर्म संबंधित विषयांवरील समस्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी समाजाला समितीचा आधार वाटतो.

आज

हिंदु देवी-देवतांचा मान राखण्यासाठी एका छोट्या प्रबोधन चळवळीच्या रूपात पेरलेले छोटे बीज आता वटवृक्ष बनले आहे, जे हिंदू धर्म आणि हिंदूंना भेडसावणाऱ्या विविध समस्यांना प्रखरपणे तोंड देत आहे.

आमचा समूह

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक

सद्गुरु (डॉ.) पिंगळे हे ई.एन.टी. (कान-नाक-घसा) तज्ञ आहेत. हिंदु धर्माबद्दल असलेली आवड त्यांना आध्यात्मिक मार्गावर घेऊन आली. ज्ञानाचा कोष असलेले सद्गुरु (डॉ.) पिंगळे हे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत. ते समितीचा आध्यात्मिक आधारस्तंभ आहेत. अध्यात्म आणि हिंदु धर्म या विषयांवरील अनेक पुस्तकांचे ते लेखक आहेत.

श्री. रमेश शिंदे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते

हिंदु धर्माची सेवा करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे श्री. शिंदे हे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. धर्म आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या विविध मुद्द्यांवर त्यांच्या सखोल ज्ञानासाठी ते ओळखले जातात. तसेच, ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल प्रमाणपत्र’ या विषयांवर आधारित दोन सर्वाधिक विक्री होणारी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.