इतिहासाचे विकृतीकरण

इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटनाक्रम नसून, तो एक प्रेरणादायी आणि भविष्यातील वाटचालीचा ‘दीपस्तंभ’ आहे. तोच इतिहास जर खोटा आणि विकृत करून समाजमनावर बिंबवला गेला, तर राष्ट्र आणि धर्म यांची कधीही भरून न येणारी हानी होऊ शकते. भारतात ब्रिटिशांच्या काळापासून हिंदूंची भावी पिढी नपुंसक आणि चारित्र्यहीन व्हावी, याची पद्धतशीर योजना राबवली जात आहे. त्यासाठी प्रामुख्याने शिक्षणक्षेत्राला केंद्रित करण्यात आले आहे. शालेय पाठ्यपुस्तकांद्वारे हेतूपुरस्सर विकृत इतिहास शिकवला जात आहे. हिंदू जनजागृती समिती समविचारी संघटनांच्या साहाय्याने या इतिहासाच्या विकृतीकरणाच्या विरोधात सातत्याने लढा देत आहे.

इतिहासाला कला म्हणून पालटण्याचा प्रयत्न केलात, तर ती एक विकृती बनते

इतिहास म्हणजे प्रत्यक्ष वास्तव. इतिहास हा इतिहासच असतो. या इतिहासाचे सादरीकरण जसेच्या तसे करणेच आवश्यक असते. इतिहासाला पालटण्याचा प्रयत्न केल्यास ती एक विकृतीच बनते. कलेच्या नावाखाली तुम्ही इतिहासाचे भांडवल बनवायचा प्रयत्न कराल, तर तुम्हाला समाजविरोधाला नक्कीच सामोरे जावे लागते. Read more »

शालेय पाठ्यपुस्तकांतील इतिहासाचे विकृतीकरण

शालेय पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम बनवणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी. यांसारख्या काही संस्था, विद्यालये आणि विविध राज्यांतील शिक्षण मंडळे हिंदुविरोधी अन् विकृत इतिहास सादर करतात. हिंदूंचा स्वाभिमान जागृत होऊ नये, यासाठी भारताला सर्वांगाने लुबाडणार्‍या धर्मांध आक्रमकांचा उदोउदो, क्रांतीकारकांचा अवमान आणि भारताला घडवणार्‍या छत्रपती शिवरायांसारख्या राजांना नगण्य स्थान, असे या सर्व विकृतीकारांचे धोरण आहे. Read more »



​संबंधित बातम्या

मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि प्रशासन यांना नोटीस ! – ठाणे येथील अवैध दर्ग्याच्या बांधकामाचे प्रकरण

स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करून कारवाई न केल्यामुळे अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी हजरत सय्यद बालेशाह पीर दर्ग्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. Read more »

शंखवाळ (गोवा) येथील वारसा स्थळी आगामी फेस्ताच्या पार्श्‍वभूमीवर अवैधरित्या बांधकाम

शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी (पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी असलेले ठिकाण) जानेवारी २०२४ मध्ये होणार्‍या फेस्ताच्या पार्श्‍वभूमीवर अवैधरित्या बांधकाम केले जात आहे. Read more »

(म्हणे) ‘भगवान श्रीकृष्णानेही रुक्मिणीला पळवून नेले होते !’ – भूपेन बोरा, काँग्रेस आसाम प्रदेशाध्यक्ष

युद्ध आणि प्रेम यांत सर्व क्षम्य आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अशा गोष्टी आहेत. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण हेही रुक्मिणी समवेत पळून गेले होते. Read more »

गोवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळा !

‘सी.बी.एस्.ई.’च्या (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या) इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळावा आणि ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा | Read more »

गोवा : कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख

कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख आणि औरंगजेबाचे रेखाचित्र छापण्यात आले आहे. यामुळे राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. Read more »

Know More About this Issue >>