साहाय्य करा

वाचक, हितचिंंतक आणि धर्मप्रेमी यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात यथाशक्ती हातभार लावण्याची अमूल्य संधी !


संगणकीय क्षेत्रातील साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना सेवेची अमूल्य संधी !

संकेतस्थळाशी संबंधित तंत्रज्ञानाच्या विविध सेवांसाठी जाणकारांची तातडीने आवश्यकता ! 

धर्मशिक्षण, धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षण हे व्यापक कार्य शीघ्रतेने करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे संकेतस्थळ (वेबसाईट) ! विविध संकेतस्थळांद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर केल्या जाणार्‍या धर्मप्रसाराच्या कार्यात दिवसेंदिवस वृद्धी होत आहे. त्यामुळे संकेतस्थळाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांची संख्या अपुरी पडत आहे. संकेतस्थळाच्या तांत्रिक सेवा करणे, विविध संगणकीय प्रकल्प बनवणे, ई.आर्.पी. सिस्टीमविषयीच्या तांत्रिक सेवा शिकणे आदी सेवांसाठी पूर्णवेळ अथवा काही कालावधीसाठी रामनाथी आश्रमात राहून वा घरबसल्या सेवा करू शकणार्‍या संगणकीय क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता आहे.

सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांना Web-design (Html, CSS, jQuery), PHP, Mysql, WordPress CMS, PrestaShop, Laravel or similar PHP framework, Android/iPhone App Development, React Native or similar mobile development framework, Website Security, Linux Administration या संगणकीय भाषा आणि तंत्रज्ञान यांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
संकेतस्थळाच्या माध्यमातून सेवा करून धर्मकार्यात खारीचा वाटा उचलण्यास इच्छुक असलेल्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार आपली माहिती [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा टपाल पत्त्यावर पाठवावी. या संदर्भात काही शंका असल्यास सौ. भाग्यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या क्रमांकावर संपर्क करावा. (वर दिलेल्या संगणकीय भाषा अथवा तंत्रज्ञान यांच्या व्यतिरिक्त अन्य भाषा आणि तंत्रज्ञान उत्तम ज्ञान असल्यास त्याविषयीही कळवू शकता.)

घटक विवरण
१. नाव आणि जिल्हा
२. संपर्क क्रमांक
३. शिक्षण
४. वय (वर्षे)
५. संगणकीय क्षेत्रातील अनुभव (असल्यास)
६. कोणत्या संगणकीय भाषा येतात ?
७. वरीलपैकी कोणत्या सेवा करू शकता ?
८. सेवेसाठी वेळ देण्याचे स्वरूप (आश्रमात कि घरी राहून सेवा करणार ?) आणि प्रतिदिन / शनिवार / रविवार किती तास ?

 


जनसामान्यांमध्ये राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीची कृतीशीलता निर्माण करणार्‍या प्रबोधनपर ध्वनी-चित्रचकत्या दाखवण्याकरता प्रोजेक्टरांची आवश्यकता !

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे ध्येय साकार होण्यासाठी सनातन संस्था कटीबद्ध आहे. विविध ग्रंथ, सनातन प्रभात नियतकालिके तसेच प्रबोधनपर ध्वनी-चित्रचकत्या या माध्यमांतून संस्थेच्या वतीने राष्ट्र अन् धर्म यांविषयी जनसामान्यांमध्ये जागृती केली जात आहे. या प्रबोधनपर ध्वनी-चित्रचकत्या प्रोजेक्टरवर दाखवल्या जात असल्याने एकाच वेळी अनेक धर्मप्रेमी त्याचा लाभ घेऊ शकत असून त्यांच्यामध्ये कृतीशीलता निर्माण होत आहे. धर्मप्रसाराच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांसाठीही प्रोजेक्टरचा वापर केला जात आहे. त्यामुळे सध्या त्यांची उपलब्ध संख्या अपुरी पडत असून प्रोजेक्टर आणि त्याचा पडदा (स्क्रीन) यांचीही आवश्यकता आहे.

वस्तू मूल्य (रुपयांमध्ये) आवश्यक संख्या एकूण मूल्य
१. प्रोजेक्टर ३०,००० १४ ४,२०,०००
२. प्रोजेक्टरसाठी पडदा (स्क्रीन ६  ८ फूट) ८,००० १४ १,१२,०००
एकूण ५,३२,०००

जे वाचक, हितचिंंतक अथवा धर्मप्रेमी वरील वस्तू विकत घेण्यासाठी आर्थिक साहाय्य करून अथवा सुस्थितीतील प्रोजेक्टर अथवा त्याचा पडदा अर्पण स्वरूपात देऊन या कार्यात खारीचा वाटा उचलू इच्छितात, त्यांनी सौ. भाग्यश्री सावंत यांना [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा टपाल पत्त्यावर कळवावे. या संदर्भात काही शंका असल्यास ७०५८८८५६१० या क्रमांकावर संपर्क करावा.


 

फेसबूक, ट्विटर आदी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे धर्मप्रसार करून घरबसल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापक सेवा करा !

सध्या समाजमनावर सामाजिक प्रसारमाध्यमांचा (सोशल मिडियाचा) पुष्कळ प्रभाव आहे. फेसबूक, ट्विटर, गूगल प्लस, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अ‍ॅप आदी संगणकीय प्रणालींचा जनसामान्यांकडून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

१. सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे घरबसल्या धर्मप्रसार करा !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्या संकेतस्थळांवर वाचनीय ज्ञानसंपदा उपलब्ध आहे. साधक, तसेच वाचक, हितचिंतक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी आपले कुटुंबीय, नातेवाईक, स्नेही, कार्यालयातील सहकारी, परिचित आदींना या संकेतस्थळावरील अमूल्य माहिती, तसेच ऑडिओ, व्हिडिओ पाठवून धर्मप्रसाराच्या अनमोल संधीचा लाभ घेऊ शकतात. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवल्यास केवळ भारतभरातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील धर्मप्रसार घरबसल्या होऊ शकतो.

२. राष्ट्र-धर्म, तसेच अध्यात्म यांविषयी अनमोल ज्ञान देणारी विविध संकेतस्थळे !

संकेतस्थळाचे नाव भाषा  उपलब्ध मजकूर
१. www.Hindujagruti.org मराठी, हिंदी आणि इंग्रजी राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात, हिंदूंच्या समस्या अन् त्यांवरील उपाय, तसेच हिंदूसंघटन, हिंदु राष्ट्र, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीपर मोहिमा इत्यादी विषयांवरील वाचनीय लेखसंपदा
२. www.Sanatan.org मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड धर्म, अध्यात्म, आचारधर्म, सण-उत्सव आणि व्रते, साधना आदी विषयांवरील शास्त्रीय परिभाषेतील अमूल्य माहिती
३. www.SanatanPrabhat.org मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड नियतकालिक सनातन प्रभात – राष्ट्र, धर्म, राजकारण आदी विषयांवरील वृत्ते (संपादकीय दृष्टीकोनांसह), तसेच साधना, आचारधर्म आदी विषयांवरील लेख
४. www.Balsanskar.com मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भावी पिढीवर सुसंस्कार होऊन आदर्श पिढी घडण्याच्या दृष्टीने उपयुक्त मजकूर
५. www.SSRF.ORG २२ भाषांत आध्यात्मिक संशोधनावर आधारित लेखमालिका

३. www.Balsanskar.com या संकेतस्थळावर पाल्य आणि पालक या दोघांसाठीही मार्गदर्शक मजकूर उपलब्ध !

या संकेतस्थळावर आदर्श बालक कसे बनावे ? चांगल्या सवयी अंगी कशा बाणवाव्यात ? अभ्यासाचे सुनियोजन कसे करावे ? इत्यादी विषयांवरील लेखमालिका आहे. देवता, संत, ऋषिमुनी, हिंदू राजे, भारतीय स्वातंत्र्यसेनानी यांच्या कथा, तसेच राष्ट्र आणि धर्म यांप्रती प्रेम निर्माण होण्यासाठी उपयुक्त मजकूर उपलब्ध आहे. आदर्श पालक कसे बनावे ? मुलांवर सुसंस्कार करण्याचे महत्त्व काय ? मुलांच्या समस्या कशा सोडवाव्यात ? आदी विषयांवरील अनमोल आणि वाचनीय माहिती पालकांसाठीही उपलब्ध आहे.

४. जिज्ञासूंना साधनेचे महत्त्व पटवून देणार्‍या www.SSRF.ORG या संकेतस्थळावर २२ भारतीय आणि विदेशी भाषांमधील लेखसंपदा उपलब्ध !

www.SSRF.ORG या संकेतस्थळावर मनुष्य जीवनातील विविध समस्यांचे कारण काय ? या समस्यांच्या निवारणासाठी साधना करण्याचे महत्त्व काय ? साधनेद्वारे आनंदप्राप्ती कशी होते ? जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी काय करावे ? आदी आध्यात्मिक संशोधनावर आधारित लेखमालिका आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ, नेपाळी यांसह पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन, रशियन, स्लोव्हेनियन, इंडोनेशियन, रोमेनियन, व्हिएत्नामीस, क्रोएशियन, स्पॅनिश, मलेशियन, हंगेरियन, सर्बियन, डच, चिनी, इटालियन, मॅसिडोनियन आणि बल्गेरियन या २२ भाषांतील मजकूर उपलब्ध आहे.

५. संकेतस्थळांद्वारे कशा प्रकारे धर्मप्रसार करावा ?

अ. प्रत्येक लेखाच्या (आर्टिकलच्या) शेवटी असलेल्या फेसबूक, ट्विटर, गूगल प्लस आदींच्या आयकॉनवर क्लिक केल्यास तो लेख प्रसारित (शेअर) करता येतो.

आ. आपल्याला आवडलेली एखादी माहिती अथवा वेबपेज प्रसारित करायचे असल्यास त्याची संगणकीय मार्गिका (लिंक) कॉपी करून ती इतरांना पाठवू शकतो.

संकेतस्थळाच्या माध्यमातून धर्मप्रसार करण्याच्या संदर्भात काही अभिनव संकल्पना अथवा वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे सुचल्यास वा धर्मप्रसार केल्यानंतर समाजाकडून चांगला प्रतिसाद लाभला असल्यास त्याची माहिती [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवावी.


हिंदु धर्मप्रसार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी पूर्णकालीन धर्मसेवा करण्यासाठी सिद्ध व्हा !

हिंदु धर्माचे वैशिष्ट्य असे की, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा धर्माची पुनर्स्थापना होते. हिंदु धर्माला आद्य शंकराचार्य, समर्थ रामदासस्वामी, स्वामी विवेकानंद इत्यादींसारख्या तेजस्वी धर्मप्रसारकांची परंपरा लाभली आहे. या धर्मप्रसारकांनी काळाची आवश्यकता लक्षात घेऊन हिंदु धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी धर्मप्रसार आणि धर्मरक्षण केले. सध्या केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवरच धर्माला आलेली एक प्रकारची ग्लानी आपण अनुभवत आहोत. अशा धर्मग्लानीच्या काळात धर्मसंस्थापनेसाठी कार्य करणे, ही काळानुसार साधना असते.  सध्या भारतात धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था निर्माण करणे, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही साधना ठरणार आहे. भारतात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना अविरत कार्यरत असल्या, तरी भारतवर्ष अन् हिंदु धर्म यांच्या समोरील वर्तमान परिस्थितीतील आव्हानांचा विचार करता धर्मासाठी समर्पित कार्य करणार्‍या धर्मविरांची मोठी आवश्यकता आहे.

१. त्याग ही साधना आहे, हे लक्षात घ्या !

हिंदु धर्म धर्मासाठी त्याग करण्याची शिकवण देतो. धर्माने गृहस्थाश्रमी व्यक्तीलाही आयुष्याच्या अंती वानप्रस्थाश्रम (वनात जाऊन साधना करणे) आणि त्या पुढे संन्यासाश्रम (सर्वस्वाचा त्याग करणे) स्वीकारण्याची, म्हणजे त्याग करण्याची शिकवण दिली आहे; कारण त्याग केल्याविना मनुष्यजन्माचे सार्थक (आध्यात्मिक उन्नती) होत नाही.  हिंदु धर्मानुसार त्याग ही साधना असल्याने टप्प्याटप्प्याने त्याग करण्याची क्षमता वाढवणे अपेक्षित असते. शेवटी धर्माचे आचरण आणि रक्षण यांसाठी, तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी तन, मन आणि धन या सार्‍यांचा, म्हणजे सर्वस्वाचा त्याग करावयाचा असतो. या दृष्टीकोनातून पूर्णवेळ धर्माची सेवा करणे, हा सर्वस्वाचा त्याग करण्याचा पहिला टप्पा आहे.

२. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी पूर्णवेळ योगदान द्या !

नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून आज अनेक धर्मप्रेमी धर्मप्रसाराची सेवा करतच आहेत. आता मात्र धर्मकार्यासाठी स्वतःचे पूर्णवेळ योगदान देण्याची वेळ आली आहे. कालमहिम्यानुसार वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; पण काळानुसार साधना म्हणून या संधीकालात पूर्णवेळ धर्मसेवा केल्यास आपली शीघ्र आध्यात्मिक उन्नती होणार आहे. जे धर्मप्रेमी पूर्णकालीन सेवा करू शकत नाहीत, त्यांनी धर्मसेवेसाठी अधिकाधिक वेळ देण्याचा तरी प्रयत्न करावा.

धर्मो रक्षति रक्षितः । (मनुस्मृति, अध्याय ८, श्‍लोक १५)

म्हणजे धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्हणजेच ईश्‍वर रक्षण करतो, या वचनानुसार धर्माचे कार्य करणार्‍यांचे रक्षण भगवान श्रीकृष्ण निश्‍चितच करणार आहे, अशी श्रद्धा बाळगा. कौटुंबिक समस्या, तसेच आर्थिक अडचणी यांविषयी कसलीही चिंता न करता पूर्णवेळ साधना करण्याचे पाऊल शीघ्रतेने उचला आणि महद्भाग्याने मिळालेल्या मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्या !


विविध परकीय भाषा अवगत असल्यास भाषांतराच्या सेवेत सहभागी व्हा !

१. एस्.एस्.आर्.एफ्. या आध्यात्मिक संस्थेचे व्यापक स्तरावर चालू असलेले प्रसारकार्य ! : जगभरातील जिज्ञासूंना अध्यात्माविषयी मार्गदर्शन करून आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारी स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.) ही एक आध्यात्मिक संस्था आहे. www.spiritualresearchfoundation.org हे तिचे संकेतस्थळ आहे.

हिंदी, इंग्रजी यांसह फारसी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, जर्मन, रशियन, स्लोव्हेनियन, चिनी, मलेशियन, क्रोएशियन, स्पॅनिश, हंगेरियन, सर्बियन, इंडोनेशियन, मॅसिडोनियन, बल्गेरियन अशा १८ भाषांतून या संस्थेचे प्रसारकार्य चालू आहे. एस्.एस्.आर्.एफ्.ने जर्मन भाषेतील अध्यात्माविषयीची ग्रंथसंपदा प्रकाशित केली आहे. स्पॅनिश, क्रोएशियन, सर्बियन आदी भाषांतील ग्रंथ प्रकाशित करण्याची सेवा चालू आहे.

२. अध्यात्माविषयीच्या अमूल्य ज्ञानाचे अन्य भाषांत भाषांतर करण्यासाठी जाणकारांची आवश्यकता ! : सार्‍या विश्‍वात शास्त्रशुद्ध परिभाषेतील अध्यात्म पोचून अखिल मानवजातीला त्याचा लाभ व्हावा, असा उदात्त हेतू ठेवून एस्.एस्.आर्.एफ्. कार्यरत आहे.
अनेक भारतियांना बर्‍याच परकीय भाषांचे ज्ञान असते. त्यामुळे तेे भाषांतराच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतात. अशा अनेकांनी आता भाषांतर सेवेला आरंभ केला असून अध्यात्माचे बहुमूल्य ज्ञान घेता घेता त्यांना अवर्णनीय असा आनंद मिळत आहे. जगभरातील जिज्ञासूंपर्यंत अध्यात्माचा प्रसार होण्यासाठी अधिकाधिक जण या सेवेत सहभागी झाल्यास हे कार्य आणखी गतीने पुढे नेता येईल. त्यासाठी परकीय भाषा अवगत असणार्‍यांनी या सेवेसाठी वेळ देऊन अध्यात्मप्रसार कार्यात आपला मोलाचा वाटा उचलावा, ही विनंती ! जे या व्यापक स्तरावरील सेवेेत सहभागी होऊ इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून खालील सारणीनुसार स्वतःची माहिती [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा ७०५८८८५६१० या क्रमांकावर पाठवावी.

इच्छुक असणारे पूर्णवेळ आश्रमात राहून किंवा काही कालावधीसाठी आश्रमात येऊन ही सेवा करू शकतात. तसे शक्य नसल्यास घरबसल्या सेवा करूनही ते धर्मकार्यात खारीचा वाटा उचलू शकतात.

तपशील माहिती
१. नाव
२. जिल्हा
३. संपर्क क्रमांक
४. शिक्षण
५. कोणती भाषा अवगत आहे ?
६. आश्रमात राहून कि घरबसल्या सेवा करणार ?
७. सेवेसाठी प्रतिदिन अथवा आठवड्यातून किती वेळ देऊ शकतात ?
८. संगणक आणि इंटरनेट यांची सुविधा आहे का ?

 


हिंदु धर्मशास्त्रातील अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून राष्ट्र-धर्म कार्यासाठी निष्काम आणि समर्पित वृत्तीने सेवा करणार्‍या सनातन आश्रमांतील शेकडो साधकांच्या अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करा !

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असणारी अन् त्यासाठी प्रभावीपणे कार्य करणारी सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे. भारतात विविध ठिकाणी संस्थेचे आश्रम आहेत. तेथे अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांविषयी ज्ञान देणारे ग्रंथ, नियतकालिके, ध्वनीचित्र-चकती आदींच्या निर्मितीची सेवा अविरतपणे चालू असते. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे उद्दिष्ट समोर ठेवून निष्काम आणि समर्पित वृत्तीने अखंड सेवारत असलेलेे शेकडो साधक या आश्रमांत वास्तव्याला असतात. त्यांच्यासाठी अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करून आध्यात्मिक लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी सर्व धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांना उपलब्ध आहे.

१. हिंदु धर्मशास्त्रानुसार अन्नदानाचे महत्त्व : हिंदु धर्मशास्त्रानुसार जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. अन्नदानामुळे भोक्ता तृप्त होऊन आशीर्वाद देतो; म्हणून अन्नदान करणे हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. अन्नदान केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपाने अन्नदानाच्या दुप्पट फळ अन्नदात्याला मिळते; परंतु अहंपोटी अन्नदान केल्यास फळ निम्मे होते. त्यामुळे धर्मकर्तव्य समजून अन्नदान करणे आवश्यक आहे.

२. साधकांना अन्नदान करणे, म्हणजे सत्पात्रे दानच ! : भिकारी, गरीब आदींना अन्नदान केल्यास अक्षय्य सुख मिळते; परंतु अन्नदान सत्पात्रे दान असेल, तर अन्नदात्याचा सर्व पातकांतून उद्धार होऊन तो ईश्‍वराच्या जवळ जातो, असे धर्मशास्त्र सांगते. सनातनच्या आश्रमांतील साधकांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी स्वतःचे जीवन समर्पित केले आहे. त्यांतील काही जण संतपदाला पोचले आहेत, तर बरेच जण त्या दिशेने वाटचाल करत आहेत. अशा आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्यक्तींसाठी अन्नदान करणे सत्पात्रे दानच ठरते !

३. अल्पाहार आणि भोजन यांसाठी येणारा व्यय

व्ययाचे स्वरूप व्यय (रुपयांमध्ये)
१. प्रतिदिन १,४५,०००
२. प्रतिमास ४३,५०,०००

जे वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी साधकांसाठी अल्पाहार (न्याहारी) आणि भोजन यांकरता धनरूपात साहाय्य करून हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यास इच्छुक आहेत, त्यांनी सौ. भाग्यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या क्रमांकावर अथवा [email protected] या संगणकीय पत्त्यावर आपली माहिती पाठवावी.