थोर संत

समर्थ रामदासस्वामी

बलशाली आणि चारित्र्यसम्पन्न मानवधर्म हे ज्यांचे उद्दिष्ट असे सार्वकालिक संत ! त्यांच्या वाणीने सुमारे चारशे वर्षांपूर्वी मरगळलेल्या महाराष्ट्राला संजीवनी दिली होती. समर्थ रामदासस्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सज्जनगडावरील स्थानांच्या छायाचित्रांचे भावपूर्ण दर्शन घेऊन समर्थांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची अनुभूती घ्या ! Read more »

महान संत विसोबा खेचर

संत विसोबा खेचर हे महाराष्ट्रातील मोठे संत होऊन गेले. संत ज्ञानेश्‍वर हे त्यांचे गुरु, तर संत नामदेवांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. संत विसोबा खेचर हे शैव पंथीय होते; परंतु त्यांचा वारकरी आणि नाथ संप्रदाय यांच्याशीही जवळचा संपर्क आला. Read more »

धर्मसम्राट करपात्र स्वामीजी यांचे अलौकिक कार्य !

‘वर्ष १९०७ मधील श्रावण शुक्ल पक्ष द्वितीया या दिवशी उत्तरप्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील भटनी या गावी करपात्र स्वामीजींचा जन्म झाला. त्यांचे ‘हरनारायण’ असे नाव ठेवण्यात आले. वयाच्या १९ व्या वर्षी अर्थात् वर्ष १९२६ मध्ये त्यांनी गृहत्याग केला. त्यांचे वास्तव्य गंगातीरावर होते. Read more »

हिंदु धर्मप्रसारासाठी जीवनभर क्षणन्क्षण वेचणारे नगर (महाराष्ट्र) येथील महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी !

गुरुदेव डॉ. नारायणानंदनाथ काटेस्वामीजी हे उत्तरप्रदेशातील महान संत धर्मसम्राट करपात्री स्वामीजी यांचे शिष्य ! गुरुदेवांनी पुणे विद्यापिठातून ‘डॉक्टरेट’ची पदवी घेतली होती. त्यांनी जीवनातील बहुतांश काळ हा हिमालयात व्यतीत केला. Read more »

संसारात राहून साधना करत भावभक्तीचा आदर्श निर्माण करणारे संत सावता महाराज !

संत सावता महाराज (संत सावता माळी) यांचा काळ वर्ष १२५० ते १२९५ चा आहे. सावता माळी हे ‘कर्तव्य आणि कर्म करीत राहणे, हीच खरी ईश्‍वरसेवा’, अशी प्रवृत्तीमार्गी शिकवण देणारे संत ! वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. Read more »

वाराणसी येथील संत कबीर प्राकट्य स्थळाचे छायाचित्रात्मक दर्शन

संत कबीर गुरूंच्या प्रतीक्षेत होते. त्यांनी वैष्णव संत स्वामी रामानंद यांना गुरु मानले; मात्र स्वामी रामानंद यांनी कबिरांना शिष्य मानण्यास नकार दिला. तेव्हा संत कबिरांनी मनोमन ठरवले की, स्वामी रामानंद पहाटे ज्या वेळी गंगास्नानास जातील, तेव्हा मी त्यांच्या मार्गात पायर्‍यांवर पडून राहीन. Read more »

संत ज्ञानेश्वर (१२७५-१२९६)

संत ज्ञानदेव समाजाची स्थिती डोळसपणे पहात होते. रूढीत अडकलेल्या धर्मामुळे ते स्वतः बहिष्कृत जीवन जगत होते. स्वतःला शुद्रापेक्षाही भयंकर अशा सामाजिक छळाला तोंड द्यावे लागत होते. अशा परिस्थितीत हे सर्व पालटून टाकण्यासाठी त्यांनी ‘गीते’च्या पायावर धर्म-देवळाची नव्याने रचना कली. Read more »

संत एकनाथ (१५३३-१५९९)

संत एकनाथांनी लहानपणी एका कीर्तनात गुरुचरित्राचे महत्त्व ऐकले. त्यांच्या मनात ते रुजले आणि त्यांनी ‘गुरु कसा भेटणार ?’ असा प्रश्न पडला. पाच वर्षांचे असतांना त्यांनी घर सोडले आणि गुरूंना शोधण्यासाठी निघाले. Read more »

क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी ओतप्रोत असलेले राष्ट्र-धर्माचे रक्षक श्री गुरु गोविंदसिंह !

क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी ओतप्रोत भरलेल्या श्री गुरु गोविंदसिंह यांविषयी ‘जर ते नसते, तर सगळ्यांची सुंता झाली असती’, असे जे म्हटले जाते, ते शतप्रतिशत खरे आहे. एकीकडे युद्धाच्या व्यूहरचना आणि दुसरीकडे वीररस अन् भक्तीरस यांच्या परिपूर्णतेने भरलेले चरित्रग्रंथ आणि काव्य यांची निर्मिती, अशा दोन्ही अंगांनी गुरुजींनी राष्ट्र-धर्माचे रक्षण केले. Read more »

1 thought on “थोर संत”

Comments are closed.