Menu Close

पुणे जळीत कांड : हिंदू असल्‍यानेच माझ्या मुलाला ठार केले, वडिलांचा आरोप

1_1453432996

पुणे : शहरात १३ जानेवारी रोजी सावन राठोड (१७) या युवकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्‍याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्‍यान, आपला मुलगा हा हिंदू असल्यानेच त्याची हत्या केली गेली असा आरोप सावनचे वडील धर्मा राठोड यांनी केला आहे. शिवाय या प्रकरणात आता हिंदुत्ववादी संघटनांनीही उडी घेतली. त्यामुळे धार्मिक तणाव वाढला आहे.

वडिलांनी म्‍हटले जाळण्‍यापूर्वी आपल्‍या मुलाला धर्म विचारला….

– ही घटना साबापेठ परिसरात घडली होती. सावन याच्यावर कारची बॅटरी चोरण्याचा आरोप होता.
– सावनच्या वडिलांनी म्हटले, ”त्याच्या अंगावर पेट्रोल टाकण्यापूर्वी आरोपींना त्‍याचा धर्म विचारला. सावनने आपण हिंदू असल्याचे सांगताच त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जाळण्यात आले”, असा आरोप त्याच्या वडिलांनी केला.
– उपचारादरम्यान  सावनचा १४ जानेवारी रोजी रुग्णालयात मृत्यू  झाला होता.
– सावनच्या काही नातेवाईकांनी आपल्या मोबाइल मध्ये त्याच्या मृत्युपूर्व बयाणाचे चित्रिकरण केले. यात  त्याने ही बाब संगितल्याचे बोलले जात असून, हा वीडियो वायरल झाला आहे. .

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *