हिंदु राष्ट्र-जागृती सभा

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेकडे वाटचाल !

भारत स्वतंत्र होऊनही सध्या देशात स्वतःचे (हिंदूंचे) असे कुठलेच तंत्र नाही. न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था, राज्य करण्याची व्यवस्था काहीच जर स्वतःची नाही, तर भारत स्वतंत्र कसा ? भारत खर्‍या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, जर केवळ ८५ लाख ज्यू धर्मियांचे इस्रायल हे ज्यू राष्ट्र बनू शकते, तर १०० कोटी हिंदूंचे हिंदु राष्ट्र्र का बनू शकत नाही ? ते संवैधानिक मार्गाने साकार करण्यातील आपली भूमिका समजून घेण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे.

१. १२५ कोटी हिंदूंचे स्वत:चे एकही राष्ट्र का नाही ?

हिंदु राष्ट्र ! स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वारंवार उधृत केलेला; मात्र स्वातंत्र्यानंतर विस्मरणात गेलेला शब्द ! स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले. एका आकडेवारीनुसार जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र आहे; मात्र १२५ कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या हिंदूंचे स्वत:चे असे एकही राष्ट्र नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रथम मांडण्यात आलेली हिंदु राष्ट्राची संकल्पना पुढे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या निधर्मी राज्यप्रणालीत विरून गेली; कारण काँग्रेसने एकगठ्ठा मतांचे राजकारण करण्यासाठी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणे आणि हिंदु धर्म अन् संस्कृती यांचे समूळ उच्चाटन करणे, हा एककलमी कार्यक्रम हाती घेतला. यामुळे हिंदू आणि हिंदु धर्म यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, हे सत्य नाकारता येऊ शकत नाही;किंबहुना असेच म्हणा की, बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात हिंदूंवर अन्याय होत आहेत नि त्यांना सापत्नपणाची वागणूक मिळत आहे.

देशाच्या फाळणीनंतर मुसलमानांना पाकिस्तान मिळाला; हिंदूंना काय मिळाले ? सेक्युलर सरकारे हिंदूंची मंदिरे ताब्यात घेतात,मंदिरांतील धन अन्य धर्मियांसाठी खर्च करतात, कुंभमेळ्यासारख्या यात्रांवर कर लावतात, हे किती दिवस सहन करायचे ? आज सेक्युलरवादाच्या नावाखाली अल्पसंख्याकांचे लांगूलचालन चालू आहे.

२. हिंदु धर्मजागृती सभांच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ संघटना

आणि सामान्य हिंदू यांचे निर्माण झालेले राष्ट्रव्यापी अभेद्य संघटन !

हिंदूंवरील आघातांविषयी समाजाला माहिती व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्मप्रेम यांची ज्योत प्रज्वलित होऊन हिंदूसंघटन व्हावे, या उदात्त हेतूने समितीने गेल्या १६ वर्षांत देशातील अनेक राज्यांमध्ये ठिकठिकाणी, जिल्हा आणि गावस्तरावर १४६० हून अधिक हिंदु धर्मजागृती सभांचे यशस्वी आयोजन केले. या सभांची फलनिष्पत्ती म्हणजे सभांच्या माध्यमातून अनेक स्थानिक प्रश्‍नांना वाचा फोडण्यात आली, तर राष्ट्रीय स्तरावर राष्ट्र अन् धर्म यांवर होणार्‍या आघातांना व्यासपीठ मिळाले. हिंदूंमधील मतभेद दूर होऊन गावागावांतील हिंदू संघटित झाले. अनेक गावांतील युवक धर्माचरणी झाले, काहींचे व्यसन सुटले, तर काहींनी राष्ट्रकार्याला वाहून घेतले. बघता बघता अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांतही हिंदु राष्ट्राची ओढ निर्माण झाली. हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी धडपडणार्‍या समितीला याहून निराळे कोणते फळ अपेक्षित असणार ? या माध्यमातून समिती करत असलेले अथक प्रयत्न आणि देशभरातील शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यासमवेत केलेल्या मोहिमांमुळे आज देशव्यापी हिंदूसंघटन देशामध्ये हिंदुत्वाचा स्वाभाविक विचार प्रबळ करत आहे. आजपर्यंत जात-पात, समुदाय किंवा विविध वैचारिक गटांमध्ये अडकलेल्या संकुचित हिंदूंचे अशाप्रकारे एक होणे, हा एक अद्भूत चमत्कारच आहे, हे विश्‍वाला विशेषत्वाने सांगणे आवश्यक आहे

३. हिंदु धर्मजागृतीच सभांचा पुढचा टप्पा म्हणजे हिंदु राष्ट्र-जागृती सभा होय !

हिंदु जनजागृती समितीने वर्ष 2007 पासून आतापर्यंत १४६० हून अधिक हिंदु धर्मजागृती सभांचे यशस्वी आयोजन केले. आजवर या सभांतून राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, त्याद्वारे होणारी राष्ट्र आणि धर्म यांची हानी, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटनाची आवश्यकता आदी विविध विषयांद्वारे धर्मजागृती करण्यात आली. आता हिंदु समाज हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी कृतीप्रवण व्हायला हवा, हा उद्देश ठेवून या सभांचे नामकरण हिंदु राष्ट्र-जागृती सभा असे करण्यात येत आहे. तरी यापुढे या सभांतून हिंदु राष्ट्र-स्थापनेचा उद्घोष करणे, हिंदु राष्ट्र्राची अपरिहार्यता समाजाला पटवून देणे, हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा देणे आदी विषय घेतले जाणार आहेत. हिंदु राष्ट्र-जागृती सभा या हिंदु धर्मजागृती सभांच्याच पुढचा टप्पा आहेत.

४. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साकारण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभेची आवश्यकता !

हिंदूंनी त्यांचे धर्म आणि राष्ट्र कर्तव्य चोख बजावण्यासाठीच या धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आता सर्वच हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठी अधिकाधिक संघटित पावले उचलून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साकारण्यासाठी कार्यरत व्हावे. भारत हे हिंदु राष्ट्र उद्घोषित करण्यासाठी सामान्य हिंदू, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांना एकत्र करणे, हाच या धर्मजागृती सभांचा प्रमुख हेतू आहे.त्यामुळे सर्व हिंदूंना आवाहन आहे की, साधनेच्या बळावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याप्रमाणे आपणही हिंदु राष्ट्र आणण्यासाठी वैध मार्गाने उभारलेल्या लढ्यात सहभागी होण्याचा निश्‍चय करूया. हिंदु जनजागृती समिती ही धर्मजागृती, धर्मशिक्षण, धर्मरक्षण, हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण या पंचसूत्रीवर हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करणारी संस्था आहे. याचाच एक भाग म्हणून या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.​संबंधित बातम्या

जानेवारी २०२० मधे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभांचा वृत्तांत

किवळे येथील भैरवनाथ मंदिरात हिंदु जनजागृती समितीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित केली होतीम. या वेळी १०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. Read more »

धुळे येथील सभेत भाजप आमदार टी. राजासिंह यांच्यावर हल्ल्याचे षडयंत्र ?

काल २२ डिसेंबर रोजी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत संशयास्पद हालचाली करणारा एक मुस्लिम युवक कार्यकर्त्यांना आढळून आला. Read more »

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने श्री बेताळ मंदिर सभागृह, प्रियोळ, म्हार्दोळ येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त श्री. गोविंद चोडणकर बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांची उपस्थिती होती. Read more »

गडचिरोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर व्याख्यान !

आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता जिजाऊ यांसारख्या भारतीय ऐतिहासिक स्त्रियांविषयी, तसेच सध्याच्या आधुनिक कर्तृत्ववान स्त्रियांचे अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. प्रगती मामीडवार यांनी येथे केले. Read more »

देशांतर्गत आतंकवाद संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक : वैद्य उदय धुरी

मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी तसेच देशांतर्गत इस्लामिक आतंकवाद, धर्मांतर, लव्ह जिहाद हे नष्ट करण्यासाठी हिंदूंचे संघटन करून घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही काळाची आवश्यकता आहेे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी येथे केले. Read more »

वर्ष २०२३ मध्ये भगवंताच्या कृपेने हिंदु राष्ट्र येणारच : कु. प्रतीक्षा कोरगावकर

सुरेगाव, नेवासा (जिल्हा नगर) येथे झालेली हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला ३०० हून अधिक धर्मप्रेमी युवक आणि महिला उपस्थित होत्या. Read more »

नायगाव (यवतमाळ) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

नायगाव (यवतमाळ) येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ७४ हिंदूंनी सभेचा लाभ घेतला. Read more »

तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यातील ‘आर्ट्स कॉलेज’ मैदानात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सभेला धर्माभिमानी हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सभेला १ सहस्र २०० धर्माभिमानी उपस्थित होते. Read more »

मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण दिले, तरच ते धर्माचरण करतील : सतीश कोचरेकर

छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्वराज्याची शिकवण मिळाली. त्यामुळे ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. आजची पिढी पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत असल्याने वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. Read more »

पोलिसांच्या अनाठायी आक्षेपानंतरही न्यायालयाकडून करीमनगर (तेलंगण) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती

तेलंगण पोलिसांचा हिंदुद्वेष जाणा ! पोलिसांनी असा आक्षेप कधी १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍या ओवैसी यांच्यावर घेतला आहे का ? कि पोलिसांनी ओवैसी यांची अशी विधाने आक्षेपार्ह वाटत नाहीत ? Read more »