सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी

‘सुराज्य अभियान’

सामाजिक दुष्प्रवृत्ती रोखूया, सुराज्य स्थापूया

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून वर्ष २०१७ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी ‘सुराज्य अभियान’ चालू केले. हिंदु राष्ट्र यावे’, अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे. आपल्या पूर्वजांनी इंग्रजांविरूद्ध लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले, पण स्वातंत्र्य म्हणजे हिंदु राष्ट्र नाही. ‘सुराज्य’ ही एक महत्त्वाची संकल्पना आहे ! स्वराज्य आले पण सुराज्यही यायला पाहिजे ! ‘स्वराज्य, सुराज्य आणि आध्यात्मिक संकल्पनेच्या आधारावरील शासन व्यवस्था; या तिन्ही गोष्टींचा संगम म्हणजे हिंदु राष्ट्र’. आज सर्वत्र होत असलेल्या भ्रष्टाचाराविषयी सर्व जण अप्रसन्न आहेत; पण त्याविषयी काय करता येईल, हे सर्वांनाच ठाऊक नसल्यामुळे ते अडकतात आणि भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग बनतात. शासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील गैरप्रकारांविरुद्ध घटनात्मक पद्धतीने लढा देणे आणि जनजागृती करणे, तसेच सर्वसामान्य जनतेला यासाठी दिशा देणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

‘सुराज्य अभियाना’ अंतर्गत राबवत असलेले उपक्रम

रेल्वेस्थानकांवरील नादुरुस्त ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’पुन्हा सुरु करण्याविषयी अभियान

Learn more

रेल नीर’
विक्रेत्यांकडून अधिक दर आकारण्याविरोधात अभियान

Learn more

अन्य अभियान

जलप्रदूषणाविषयी ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’कडे याचिका

Learn More

राज्य महामार्गांवर (NH4A) सुरक्षा निर्देशकांच्या अभावाबाबत पत्रव्यवहार

Learn More

सर्वच ठिकाणी Maximum Retail Price (कमाल किरकोळ किंमत) प्रमाणे दर आकारले जावेत, याबाबत जागृती अभियान

Learn More

आपल्या परिसरात होत असलेल्या गैरप्रकारांच्या विरोधात
वैध मार्गाने लढा द्यायला आरंभ करा !

: 9867558384

विविध क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींची उदाहरणे

नागरिकांची कामे पूर्ण करण्यास जाणूनबुजून विलंब करणे
नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात हेलपाटे मारायला लावणे
जनतेशी फटकून वागणे
कार्यालयीन कामाचा वेळ अन्यत्र वाया घालवणे,
वेळेपूर्वीच कार्यालय बंद झाल्याचे सांगणे
महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर ‘रॅगिंग’ करणे
विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये भरमसाठ देणगी मागणे
शिक्षकांचे स्थानांतर (बदली) करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी लाच मागणे
शाळेत किंवा महाविद्यालयात आवश्यक विद्यार्थीसंख्या नसतांनाही खोटी संख्या दाखवून शासकीय अनुदान घेणे
शाळेतील शिक्षक खाजगी शिकवणी घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या शिकवणीला येण्याचा आग्रह करणे
शाळेचा किंवा महाविद्यालयाचा निकाल अधिक लागलेला दिसावा, यासाठी परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना उत्तरे सांगून किंवा अन्य प्रकारे ‘कॉपी’ करण्यास साहाय्य करणे
डॉक्टर आणि रुग्णालये यांनी रुग्णाकडून अतिरिक्त शुल्क घेणे
महागडी औषधे आणि तीही ठराविक दुकानांतूनच घेण्यास भाग पाडणे
निष्कारण खर्चिक वैद्यकीय चाचण्या करायला लावणे
शल्यकर्माची (‘ऑपरेशन ‘ची) आवश्यकता नसतांनाही ते करण्यास सांगणे
रुग्णाच्या मृत्यूनंतरही तो अद्याप जिवंत असल्याचे सांगून त्याला अतीदक्षता विभागात ठेवून ‘बिल’ वाढवणे
भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा दूध विकणे
पेट्रोल, डिझेल आदी इंधन भरण्यासाठी जात असलेल्या पंपावर मापात किंवा गुणवत्तेत फसवणूक करणे
हवाबंद उत्पादनांवर अधिकतम किरकोळ विक्री मूल्यापेक्षा अधिक रक्कम मागणे
अधिक नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी वजनमापात ग्राहकांची फसवणूक करणे
IRCTC ने रेल्वेत विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे दरपत्रक घोषित केले असून पण प्रवाश्यांकडून अधिक दर आकारणे
राष्ट्रीय आणि धार्मिक भावना दुखावणारे प्रसारण करणे
चुकीचे वृत्त प्रसारित करणे, श्रद्धास्थानांचे विडंबन करणे
ब्लॅकमेल करण्याची धमकी देऊन पैसे उकळणे
अश्लीलता आणि नग्नता यांना प्रोत्साहन मिळेल, अशी विज्ञापने प्रसिद्ध करणे
मानहानिकारक आणि समाजविघातक तसेच धर्मभावना दुखावणारे प्रसारण करणे
सामाजिक विकृती आणि हिंसाचार यांचे समर्थन होईल अथवा त्यांना प्रोत्साहन मिळेल, असे लिखाण आणि छायाचित्रे प्रसिद्ध करणे

लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा देण्यासाठी पुढील मार्ग वापरा !

माहितीच्या अधिकाराचा वापर करा !

तक्रारी आणि निवेदने यांद्वारे आपल्या मागण्या
 संबंधितांपर्यंत पोहोचवा !

पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवा !

जनआंदोलने आणि निदर्शने करा !

जनहित याचिकांद्वारे न्यायालयीन मार्गाने लढा द्या !

सामाजिक क्षेत्रातील आपले परिचित आदींना भेटून त्यांना समितीच्या कार्याची माहिती द्या

सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी समितीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्काचे आयोजन करा !

ग्राहकाचे अधिकार, माहिती अधिकार कायदा तसेच अन्य विषयांची व्याख्याने आयोजित करा

भ्रष्टाचार विरोधात कार्य करणाऱ्यांसाठी शिबिरे आदींचे आयोजन करा

‘सुराज्य अभियाना’च्या कार्यासाठी धन अर्पण करा !

सोशल मिडिया द्वारे जनजागृती करा

खरेदी करा !

या संदर्भ ग्रंथांना
तुमच्या घराचा किंवा कार्यालयीन ग्रंथालयाचा भाग बनवा

संबंधित बातम्या