Menu Close

आरोग्य साहाय्य समिती

हिंदु जनजागृती समितीची शाखा

आरोग्य साहाय्य समिती’ हे वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ डॉक्टर, वैद्य, परिचारिका आदींचे संघटन आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून जून २०१८ मध्ये सातव्या ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात या समितीची स्थापना झाली. या समितीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांच्या कार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. ही श्रेष्ठ अशी समष्टी साधनाच आहे.

आरोग्य साहाय्य समितीची उद्दिष्टे

गरजू रुग्णांना, तसेच युद्ध, पूर, भूकंप यांसारख्या आपत्तीमध्ये आपद्‌ग्रस्तांना तत्परतेने वैद्यकीय साहाय्य करणे

वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींविषयी सामान्य जनतेमध्ये जागृती करणे, तसेच त्याविरुद्ध वैध मार्गाने लढा देणे

वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना राष्ट्र-निर्माण कार्यात योगदान देण्यासाठी संघटित आणि कृतीप्रवण करणे

वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींना रोखा

सामान्यतः आढळणारे गैरव्यवहार

‘कट प्रॅक्टिस’ द्वारे पैसे कमावण्यासाठी रुग्णाला वेगवेगळ्या डॉक्टरांकडे तपासण्या आणि उपचार यांसाठी पाठवणे

रूग्णावर त्वरित उपचार करणे आवश्यक असतांनाही ‘डिपॉझिट’ भरेपर्यंत उपचार न करणे

आर्थिक लाभासाठी रूग्णाला स्वस्त औषधांऐवजी महागडी औषधे आणि उपकरणे विकत घ्यायला लावणे

एका रुग्णासाठी वापरलेली ‘सिरिज’, ‘कॅथेटर’ आदी अन्य रुग्णाला विकून पैसे कमावणे

आर्थिक लाभासाठी जिवंत किंवा मृत रुग्णाचे काही अवयव परस्पर काढून विकणे

अतीदक्षता विभागातील रुग्ण मृत झाल्यावरही त्याच्या कुटुंबियांना तसे न सांगता त्याला तेथेच ठेवून उपचाराचा खर्च वाढवणे

आरोग्य विभागाचे

कर्मचारी तसेच वैद्य यांच्यासाठी

राष्ट्र आणि धर्म सेवा करण्याची संधी

: +917058885610

arogya.sahayya@hindujagruti.org

तुम्ही अशा प्रकारे सहभागी होऊ शकता

आपल्या ओळखीचे डॉक्टर, वैद्य, परिचारिका आदींना भेटून त्यांना आरोग्य साहाय्य समितीच्या कार्याची माहिती द्या

सामान्य लोकांसाठी आरोग्य संबंधी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व्याख्याने आयोजित करा

आरोग्य साहाय्य समितीच्या मदतीने विनामूल्य ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गा’त सहभागी व्हा अथवा त्याचे आयोजन करा

स्वयंउपचारासाठी बिंदूदाबन, प्राणशक्तीवहन उपाय आदी उपायपद्धती स्वतः शिका आणि इतरांनाही शिकवा

आरोग्य साहाय्य समितीच्या कार्यासाठी धन, औषधे वा वैद्यकीय साहित्य अर्पण करा

गरजूंसाठी रक्तपडताळणी, नेत्रचिकित्सा आदी शिबिरे तसेच विनामूल्य औषधेवाटप यांचे आयोजन करा अथवा या सेवांत सहभागी व्हा

वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींविरोधात आरोग्य साहाय्य समितीची मोहीम

रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय वैद्यकीय तज्ञांवर विश्वास ठेवतात. त्यामुळे विश्वासावर खरे उतरणे हे वैद्यकीय तज्ञांचे प्राथमिक कर्तव्य आहे. रूग्णांची उत्तम काळजी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक कायदेशीर तरतूदी आहेत.तरीही आरोग्य साहाय्य समितीला आरोग्य क्षेत्रात त्रुटी आढळून आल्या आहेत.वैद्यकीय गैरप्रकार उघड करून आरोग्य साहाय्य समितीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि अधिकाऱ्यांना त्याविषयी दखल घेण्याची मागणी देखील केली आहे. आरोग्य साहाय्य समितीने न्यायालयांमध्ये विविध याचिका केल्या, आरटीआय प्रश्न दाखल केले, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी केल्या आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे खालील गैरप्रकारांविरुद्ध निवेदनही दाखल केले.

सरकारी अनुदानित रुग्णालये आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी पलंग आरक्षित ठेवण्यात अयशस्वी ठरले

रुग्णांना शासकीय योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात रुग्णालये अपयशी ठरली

रुग्णालयांकडून जैव वैद्यकीय (बायो मेडिकल) कचऱ्याचे चुकीचे व्यवस्थापन, नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा

फार्मा उद्योगाच्या खराब कार्यप्रणालीमुळे निकृष्ट दर्जाच्या औषधांचा पुरवठा

आर्थोपेडिक इम्प्लांट निर्मात्यांकडून वैद्य आणि रूग्णालयांना लाच देणे

सरकारी आदेशापेक्षा अधिक दराने रक्ताची विक्री करणाऱ्या रक्तपेढ्या

आजच खरेदी करा !

या ग्रंथांना तुमच्या घराचा किंवा चिकित्सालयातील ग्रंथालयाचा भाग बनवा

संबंधित बातम्या