देवनिधी लुटणार्‍या भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई कधी होणार ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवी हिचे प्राचीन दागिने, वस्तू अन् प्राचीन नाणी यांच्या चोरीप्रकरणी पसार असलेले तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना वर्षभरानंतर तुळजापूर पोलिसांनी अटक केली, एवढेच पुरेसे नाही. Read more »

मध्यप्रदेशातील शंकरपूर येथील सरकारीकरण केलेल्या मंदिराची भूमीची अवैध विक्री !

शंकरपूर येथील सरकारीकरण झालेल्या श्री चारभुजा नारायण मंदिराचे पुजारी नारायण बैरागी यांचा अलीकडेच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी विष्णुबाई बैरागी आणि मुलगा राहुल बैरागी यांनी या मंदिराची भूमी इंदूरच्या देवेंद्रसिंह बुंदेला यांना अवैधरित्या विकल्याचे उघड झाले आहे. Read more »

मल्लपूरम् (तमिळनाडू) येथील श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट !

तमिळनाडूमधील द्रमुक सरकारकडून अनेक मंदिरे हटवण्याची मोहीम चालू आहे. आता राज्य सरकारने तांजावूर जिल्ह्यात असलेल्या मल्लपूरम् येथील श्रीथलसायाना पेरूमल मंदिराशेजारी शौचालये उभारण्याचा घाट घातला आहे. या शौचालयांमुळे मंदिराशेजारी अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होऊन मंदिराचे पावित्र्य नष्ट होणार आहे. Read more »

राजस्थानमधील मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलन करणार ! – श्री राजपूत करणी सेनेची घोषणा

राजस्थान सरकार मेंहदीपूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने त्याच्या डोक्यातून सरकारीकरणाचा विचार काढून टाकावा. श्री राजपूत करणी सेना मेहंदीपूर बालाजी मंदिर आणि राज्यातील अन्य मंदिरे यांचे सरकारीकरण होऊ देणार नाही. आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करू, अशी चेतावणी श्री राजपूत करणी सेनेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंह मकराना यांनी येथे दिली. Read more »

महंत श्री किशोर पुरी महाराज यांच्या देहत्यागानंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकार मेहंदीपूर बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याच्या सिद्धतेत !

जयपूर येथील प्रसिद्ध मेंहदीपूर बालाजी मंदिराचे महंत श्री किशोर पुरी महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर या मंदिराच्या सरकारीकरणाची सिद्धता चालू झाल्याचे सांगण्यात येत आहे. महंत श्री किशोर पुरी महाराज यांच्यानंतर मंदिराचा सांभाळ करणारा कुणी नसल्याने या मंदिराचे सरकारीकरण करण्याचा विचार सरकार करत आहे. Read more »

तिरुनेलवेली (तमिळनाडू) येथील हिंदूंसाठी पवित्र असलेल्या डोंगरावर धर्मांधांनी चांदतारा काढून ‘अल्लाह’ आणि ‘७८६’ लिहिले !

हिंदूंनी संताप व्यक्त करत ‘राज्याच्या धर्मादाय विभागाने यावर त्वरित कारवाई करावी आणि डोंगर, तसेच मंदिरांचे रक्षण करावे’, अशी मागणी केली आहे. हिंदूंना भीती आहे की, धर्मांध या पवित्र डोंगरावरील मंदिरांच्या परिसरात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. Read more »

तमिळनाडूमध्ये अज्ञातांकडून पंच लिंगेश्‍वर मंदिरातील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड !

चेन्नई  राज्यातील राणीपेट येथील कोंडापूरम् गावात असलेल्या पंच लिंगेश्‍वर मंदिरामधील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली, तसेच मूर्तीवरील कपडे जाळण्यात आले. Read more »

मंदिर परिसरात पूजापाठ होण्याऐवजी तेथे शॉपिंग सेंटर निर्माण झाले आहेत ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदूंच्या मंदिरांचा वापर पूजापाठ आदींविषयी होण्याऐवजी तेथे शॉपिंग सेंटर निर्माण झाले आहेत, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली. या वेळी न्यायालयाने प्रशासनाच्या धार्मिक व्यवस्थापन विभागावर कोरडे ओढले. के. सुरेश यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी करतांना कोरडे ओढले. Read more »

केवळ एकच मूल जन्माला घातल्यास हिंदूच हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील ! – विश्‍व हिंदु परिषद

जर कुटुंबामध्ये एकच मूल असेल, तर हिंदू स्वतःहून हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणावर विचार करतांना हिंदूंचे प्रभुत्व  कायम राहील, याचा विचार हिंदूंनी केला पाहिजे; कारण हिंदूंच्या लोकसंख्येच्या प्रभुत्वामुळे देशातील राजकारण, धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता यांचे संचालन केले जात आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना मांडले. Read more »

तमिळनाडूच्या स्टॅलिन सरकारला हिंदु मंदिर परंपरेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही ! – अधिवक्ता सीताराम कलिंगा, मद्रास उच्च न्यायालय, तमिळनाडू

भारताच्या इतिहासात राजे-महाराजे मंदिरे स्वतःच्या कह्यात घेऊन चालवत नव्हते, तर ते मंदिरांसाठी भूमी आणि धन दान द्यायचे. त्या काळी मंदिरांचे व्यवस्थापन भाविकच पहात असत; मात्र स्वातंत्र्यानंतर मंदिरांचे धन पाहून ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारांनी मंदिरे कह्यात घेण्याचा गैरकारभार केला आहे. प्रत्यक्षात त्यांना हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्याचा आणि त्यातील परंपरा पालटण्याचा अधिकार नाही. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​