Menu Close

हिंदु संस्कृती आणि हिंदु प्रतिके यांच्या रक्षणाचे कार्य

डावीकडून नितीन शिंदे (प्रदेशाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन, महाराष्ट्र), एकलव्य सिंह गौड (संयोजक, हिंद रक्षक संघटना, इंदूर, मध्यप्रदेश), पंडित सुरेश मिश्रा (संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, सर्व ब्राह्मण महासभा, जयपूर), शेखर मुंदडा (अध्यक्ष, महाराष्ट्र गो सेवा आयोग, पुणे, महाराष्ट्र), सुनील घनवट (महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती)

भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी हिंदूंचे संघटन आवश्यक आहे ! – पंडित सुरेश मिश्रा, संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, सर्व ब्राह्मण महासभा, जयपूर

पंडित सुरेश मिश्रा, संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, सर्व ब्राह्मण महासभा, जयपूर यांचा सन्मान करताना धर्मप्रचारक संत, सनातन संस्था, महाराष्ट्र.
पंडित सुरेश मिश्रा, संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, सर्व ब्राह्मण महासभा, जयपूर यांचा सन्मान करताना धर्मप्रचारक संत, सनातन संस्था, महाराष्ट्र.
पंडित सुरेश मिश्रा, संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, सर्व ब्राह्मण महासभा, जयपूर
पंडित सुरेश मिश्रा, संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, सर्व ब्राह्मण महासभा, जयपूर

केवळ देशातच नाही, तर संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्राची स्थापना झाली पाहिजे. त्यादृष्टीने जगभर हिंदु धर्माचे कार्य चालू आहे; परंतु आपल्या भारतातच हिंदु राष्ट्र बनत नाही. हिंदू विखुरलेले असल्याने हे शक्य होत नाही. त्यामुळे जोपर्यंत हिंदू संघटित होणार नाहीत, तोपर्यंत भारतात हिंदु राष्ट्र होणार नाही.

जगात लोकसंख्येत पहिल्या क्रमांकावर ख्रिस्ती, तर दुसर्‍या क्रमांकावर मुसलमान आहेत. त्यानंतर हिंदूंचा क्रमांक आहे. हिंदु धर्म वाढवण्यासाठी कुणावरही बळाचा वापर करण्याची आवश्यकता नाही. आपल्या ज्ञानाकडेच विदेशी लोक आकर्षित होतील. हिंदु धर्म वाढवण्यासाठी, तसेच भारत देश वाचवण्यासाठी मुलांवर चांगले संस्कार करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना रामायण आणि महाभारत शिकवले पाहिजे.

विदेशातील हिंदूंना जोडण्यासाठी आणि भारतियांना विदेशात वसवण्यासाठी आम्ही ‘भारत गौरव’ पुरस्काराचा प्रारंभ केला आहे. त्या माध्यमातून सहस्रो भारतियांना विदेशात वसवण्यात यश मिळाले आहे. हा पुरस्कार देण्यासाठी काही वेळा भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीही नावे सुचवली आहेत. इंग्लंडच्या संसदेत ८ वेळा या पुरस्काराचे वितरण  झाले आहे. यावर्षी फ्रान्सच्या संसदेत झाले आणि नंतर न्यूयॉर्कमध्ये करण्याचे ठरवले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ‘भारत गौरव’ पुरस्कार देऊन आम्हीच गौरवान्वित झालो ! – पंडित सुरेश मिश्रा

या वर्षी ‘भारत गौरव’ पुरस्कार फ्रान्सच्या संसदेत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना दिला. तो त्यांच्या उत्तराधिकारी (सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) यांनी स्वीकारला. त्यामुळे आम्हीच गौरवान्वित झालो. या अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी समितीचे पदाधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी मला समितीची माहिती पुस्तिका दाखवली. त्यावरील प.पू. डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहिले आणि त्यांचे छायाचित्र पाहून त्यांच्या देवत्वाकडे मी इतका आकर्षित झालो की, मला वाटले, ‘हे ‘भारत गौरव’ आहेत.’ त्याचवेळी मी त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.

हिंद रक्षक संघटनेचे कार्यकर्ते राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचे पहारेकरी आहेत ! – एकलव्य सिंह गौड, संयोजक, हिंद रक्षक संघटना, इंदूर, मध्यप्रदेश

एकलव्य सिंह गौड, संयोजक, हिंद रक्षक संघटना, इंदूर, मध्यप्रदेश
एकलव्य सिंह गौड, संयोजक, हिंद रक्षक संघटना, इंदूर, मध्यप्रदेश

हिंद रक्षक संघटनेचे कार्यकर्ते राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचे पहारेकरी आहेत. संघटनेच्या वतीने वर्षाभरात प्रामुख्याने ३ उपक्रम राबवले जातात. होळीतील अपप्रकार टाळण्यासाठी कुटुंबासहित त्या दिवशी राधा-कृष्ण फाग (पारंपरिक नृत्य) यात्रा काढणे, महापुरुषांची माहिती असलेल्या ३ लाख अभ्यासपुस्तिका ६० सहस्र विद्यार्थ्यांना वितरण करणे आणि अपप्रकार टाळण्यासाठी पारंपरिक पोषाखात धार्मिक गीतांवर खेळल्या जाणार्‍या गरब्याचे आयोजन करणे. आता मालवांचल (राजस्थान) येथे ५०० हून अधिक राधा-कृष्ण फाग (पारंपरिक नृत्य) यात्रांमध्ये २५ सहस्रांहून अधिक हिंदू सहभागी होतात; परंतु ही यात्रा चालू करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात मोठा संघर्ष करावा लागला. मालवांचल येथील एका वनवासी भागात गरिबी आणि पाण्याचा अभाव यांमुळे मोठ्या प्रमाणात धर्मांतर चालू होते. तेथील १ सहस्र २३२ गावांमध्ये शिवालयांची स्थापना करून, तसेच पाण्याचे मोठे कुंड बांधून संघटनेने धर्मांतर रोखण्यात यश मिळवले आहे. देवतांची विटंबना करणारा हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुन्नवर फारुकी याच्या विरोधातही आम्ही भूमिका घेतली.

महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिरामध्ये गोशाळा चालू करावी ! – शेखर मुंदडा, अध्यक्ष, महाराष्ट्र गो सेवा आयोग, पुणे, महाराष्ट्र

शेखर मुंदडा, अध्यक्ष, महाराष्ट्र गो सेवा आयोग, पुणे, महाराष्ट्र
शेखर मुंदडा, अध्यक्ष, महाराष्ट्र गो सेवा आयोग, पुणे, महाराष्ट्र

देवस्थानांकडे धन आणि जागा आहे. महाराष्ट्रात जेवढी मंदिरे आहेत, त्यांमध्ये गोशाळा चालू करावी. ‘इस्कॉन’ या संस्थेने महाराष्ट्रात २ गोशाळा चालू केल्या आहेत. तुळजापूर देवस्थान, शिर्डी देवस्थान आणि पंढरपूर देवस्थान यांच्यासमवेत गोशाळा चालू करण्याविषयी आमचे बोलणे झाले आहे. गोमाता वाचली, तर देश वाचले. गोमातेला मानतो, तोच खरा हिंदु आहे. महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा आहे; मात्र त्याची कार्यवाही होत नव्हती. महाराष्ट्रात गो आयोगाची स्थापना झाल्यावर गोहत्या रोखण्यात काही प्रमाणात यश आले आहे. गोसंगोपन, गो संरक्षण, गोशाळा, गो शेती, गो पर्यटन, गो साक्षरता यांवर काम करण्याची आवश्यकता आहे. यानुसार काम केले, तरच गोमातेला मानाचे स्थान प्राप्त होईल.

साधू-संत जागृत झाले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना कुणीही थांबवू शकणार नाही ! – पू. संत श्रीराम ज्ञानीदासजी महात्यागी, अध्यक्ष, महात्यागी सेवा संस्थान, तिरखेडी आश्रम, गोंदिया

पू. संत श्रीराम ज्ञानीदासजी महात्यागी, अध्यक्ष, महात्यागी सेवा संस्थान, तिरखेडी आश्रम, गोंदिया
पू. संत श्रीराम ज्ञानीदासजी महात्यागी, अध्यक्ष, महात्यागी सेवा संस्थान, तिरखेडी आश्रम, गोंदिया

आपल्या देशातील साधू आणि संत यांची साधनापद्धती कोणतीही असली, तरी त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एकत्र आले पाहिजे. या देशातील साधू-संत जागृत झाले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना कुणीही थांबवू शकणार नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात देशभरातील आखाडे आणि खालसा यांना सहभागी करून घेतले पाहिजे. प्रयागराजमधील येत्या कुंभमेळ्यामध्ये प्रत्येक आखाडा आणि खालसा येथे ‘आम्ही सर्व हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या बाजूने आहोत’, अशा प्रकारचे फलक लावले गेले पाहिजे. या समवेतच देभरातील सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू केली पाहिजे. प्रत्येक मंदिरात ‘सात्त्विक वेशभूषा परिधान करूनच मंदिरात प्रवेश करावा’, असे फलक लावले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार करा ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन, महाराष्ट्र

नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन, महाराष्ट्र
नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या थडग्याभोवती अवैध दर्ग्याचे बांधकाम करण्यात आले होते. त्याखेरीज १९ खोल्याही दर्गा परिसरात बांधण्यात आल्या होत्या. या दर्ग्यासाठी पाकिस्तानातून झुंबरे आली होती. इस्लामी आतंकवाद कशाप्रकारे संपावावा लागतो ? हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या गडावर अफझलखानाचा वध करून दाखवून दिले, त्याच गडावर असे अतिक्रमण होणे हे संतापजनक होते. या विरोधात मी वर्ष २००१ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत आवाज उठवला, तसेच ‘श्री शिवप्रतापभूमीमुक्ती आंदोलन’चालू केले. यात हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा समावेश होता. आंदोलन चालू झाल्यावर ३ वेळा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही काँग्रेसच्या कार्यकाळात हे अवैध बांधकाम पाडण्यात आले नाही.

राज्यात भाजप-शिवसेनेचे हिंदुत्वनिष्ठ शासन आल्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा घेतला. शेवटी १० डिसेंबर २०२३ या दिनांकानुसार असलेल्या शिवप्रतापदिनाच्या दिवशी हे सर्व अतिक्रमण तोडण्यात आले. याचप्रकारे यापुढील काळात शिवरायांचे गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करण्याचा निर्धार करूया.

विशाळगडावरही रेहान मलिक दर्गा परिसरात अनेक अवैध बांधकाम झाली आहेत. गडावर कोंबड्यांचा बळी देण्यात येतो. यामुळे गडाचे पावित्र्य नष्ट होते. या संदर्भातही आम्ही ‘विशाळगडमुक्ती आंदोलन’ उभे केले. या आंदोलनाच्या माध्यमातून विशाळगडावर जी १६४ अनाधिकृत बांधकामे झाली आहेत, ती तात्काळ पाडावीत, विशाळगडावरील स्मारके-मंदिरे यांची जिर्णाेद्धार करावा, तेथे भरणारा ‘उरूस’ (एखाद्या मुसलमान धर्मगुरूच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित उत्सव) तात्काळ बंद करावा, पशूबळी देणे तात्काळ बंद व्हावे या मागण्या सरकारकडे केल्या आहेत. सध्या तेथील पशूबळी बंद असून तेथील अतिक्रमण हटवेपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहिल. आजच्या घडीला राज्यातील अनेक गडांवर अतिक्रमण झाले असून हे हटवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील.

या प्रसंगी उपस्थितांनी दिलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘आई भवानी शक्ती दे, मलंगगडाला मुक्ती दे !’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

हिंदूंना संपवण्यासाठी विरोधक एकत्र येत असतील, तर हिंदूंनीही संघटित झाले पाहिजे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

देशाचे भवितव्य मानल्या जाणार्‍या युवापिढीचा बुद्धीभेद करण्याचे काम चालू आहे. या षड्यंत्रामागे शहरी नक्षलवाद आहे. साम्यवाद्यांनी जगभरात ९ कोटी ४० लाखांहून अधिक जणांची हत्या केली आहे. महाराष्ट्रातही मागील २५ वर्षांत साम्यवाद्यांनी १४ सहस्रांहून अधिक जणांच्या हत्या केल्या आहेत. यामध्ये शेतकरी, सैनिक, पोलीस, लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. दक्षिण भारतात अनेक हिंदु नेत्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. काश्मीरमधून हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला; परंतु यावर कोणत्याही वृत्तवाहिनीवर चर्चा होत नाही. उलट साम्यवाद्यांना ‘मानवतावादी’, तर हिंदुत्वनिष्ठांना ‘आतंकवादी’ दाखवले जाते. पत्रकारांच्या टोळीकडून डाव्या विचारांचे उदात्तीकरण केले जाते. या सर्व षड्यंत्रामागे शहरी नक्षलवाद आहे. जर हिंदूंना संपवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येत असतील, तर हिंदूंनीही संघटित झाले पाहिजे. या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीकडून ‘सनातन धर्मरक्षक अभियान’ राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांत याविषयी २५० हून अधिक कार्यक्रम करण्यात आले. यामध्ये १० सहस्र लोक सहभागी झाले होते. सनातन धर्मरक्षक अभियानात हिंदूंनी सहभागी व्हावे.

Related News