Menu Close

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील शाळेत ‘लव्ह जिहाद’ विषयावर व्याख्यान

‘श्याम सिंह मेमोरियल गर्ल्स इंटर कॉलेज’ येथे ‘लव्ह जिहाद’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

नोएडा (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सेक्टर ७३, सरफाबादमधील ‘श्याम सिंह मेमोरियल गर्ल्स इंटर कॉलेज’ येथे ‘लव्ह जिहाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या मणी मुंजाल यांनी १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले अन् ‘लव्ह जिहाद’ची भयावहता लक्षात आणून दिली. उपस्थित विद्यार्थिनींनी हा विषय लक्षपूर्वक ऐकला.

या वेळी त्यांना समितीच्या ‘लव्ह जिहाद’विषयीच्या ग्रंथाची माहिती देण्यात आली. याप्रसंगी प्राचार्या गीता शर्मा यांनी विद्यालयात नियमित संस्कार वर्ग घेण्यास सांगितले. या व्याख्यानाचा लाभ १०० विद्यार्थिनींनी घेतला. १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थिनी विद्यालयाला सुटी असतांनाही उपस्थित होत्या.

क्षणचित्र : शाळेच्या प्राचार्यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथांचा एक संच आणि ‘लव्ह जिहाद’ विषयावरील २५ ग्रंथ यांची मागणी केली. ‘हे ग्रंथ शाळेच्या ग्रंथालयात ठेवून ते विद्यार्थिनींना वाचण्यास दिले जातील’, असे त्यांनी सांगितले.

Latest News