हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचे आवाहन

मुंबई : गृहसंकुलांमध्ये पशूंची हत्या न करण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश आहे; मात्र तरीही मीरा-भाईंदरसारख्या मुसलमानबहुल भागांतील गृहसंकुलांमध्ये बकरी ईदनिमित्त हत्या करण्यासाठी पशूंना आणले जात आहे. बकरी ईदनिमित्त अशा प्रकारे होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे. याविषयी २६ मे या दिवशी त्यांनी मंत्रालयात वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना मुलाखत दिली.
या वेळी श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘बकरी ईदनिमित्त गृहसंकुलांमध्ये बकर्या आणून त्यांना कापले जाते. या वेळी रक्तमिश्रित पाणी आजूबाजूच्या परिसरात फेकले जाते. त्यामुळे रोगराई पसरते. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.’’
हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाची आवई उठवणारे आता कुठे आहेत ?
होळी, गणेशोत्सव आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तसेच पुरो(अधो)गामी मंडळी प्रदूषण होत असल्याची आवई उठवून ते रोखण्याचे आवाहन करण्यासाठी पुढे येतात. बकरी ईदनिमित्त पशूंच्या अवैध हत्या करून रक्तमिश्रित पाण्यामुळे होणार्या रोगाच्या प्रादुर्भावाविषयी ही मंडळी का पुढे येत नाहीत ? असा प्रश्न श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी उपस्थित केला.
सोलापूर:
बकरी ईदच्या निमित्ताने सोलापूरमधील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना निवेदन !

हिंदु राष्ट्र सेना जिल्हाप्रमुख श्री. रवि अण्णा गोणे यांनी अवैध गोतस्करी करणार्यांवर कठोर गुन्हे नोंद करून संबंधित वाहनांचे परवाने रहित करण्याची मागणी केली. या वेळी भाजपचे नगरसेवक सतीश अण्णा सिरसिल्ला, भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष विजय महिंद्रकर, ‘जगदंब सामाजिक बहुउद्देशीय संस्थे’चे अध्यक्ष विजय यादव आदी उपस्थित होते.
पुणे:
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोहत्येच्या विरोधात भोर (पुणे) येथे नायब तहसीलदार आणि पोलीस यांना निवेदन !

या प्रसंगी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, समस्त हिंदु आघाडी गोरक्षक दल भोर तालुका, रोहिडा गोमाता समिती, हिंदु जनजागृती समिती, सकल हिंदु समाज, भोर तालुका या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







