Menu Close

शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन देव, देश आणि धर्मकार्य यांसाठी सिद्ध व्हा ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर

संभाजीनगर आणि श्रीरामपूर (नगर) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

संभाजीनगर : मातृशक्तीचे पूजन करणार्‍या छत्रपती शिवरायांच्या देशात आज भारतमाता, गोमाता आणि घराघरांतील माता असुरक्षित आहेत. ही परिस्थिती पालटण्यासाठी आपण प्रत्येकाने शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन संघटितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले. शिवजयंतीनिमित्त येथील घोगरगाव येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी टाकळीभान आणि संभाजीनगरमधील शिवराई येथे आयोजित केलेल्या व्याख्यानामध्येही शिवभक्तांना मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. शिवराई येथील ‘शंभूराजे ग्रुप’ने प्रथमच व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी ‘डी.जे.’ वाद्ये रहित करून ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची मिरवणूक काढली.

२. घोगरगाव येथील लहान मुले पारंपारिक पोषाखात उपस्थित होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *