गडचिरोली येथे झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार !

१३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. यात ३ पोलीस घायाळ झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने तात्काळ नागपूरला नेण्यात आले आहे. मृत नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. Read more »

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा गोव्यात १७ नोव्हेंबर या दिवशी ‘डोंगरी टू नोवेअर’ हा कार्यक्रम

स्वयंघोषित विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांची हिंदुद्वेषी आणि आक्षेपार्ह वक्तव्याची पार्श्‍वभूमी आहे. त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये इंदौर (मध्यप्रदेश) येथील ‘मुनरो कॅफेम’मधील एका कार्यक्रमात हिंदु देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिपण्या केल्या होत्या. या वेळी त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले होते आणि ते ३७ दिवस कारागृहात होते. Read more »

(म्हणे) ‘आक्रमक हिंदुत्व हे इस्लामिक स्टेट आणि बोको हराम यांसारखे !’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या नव्या पुस्तकामध्ये त्यांनी हिंदुत्वाची तुलना इस्लामिक स्टेट आणि बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनांशी केली. ‘आक्रमक हिंदुत्व हे इस्लामिक स्टेट आणि बोको हराम यांसारखे आहे’, असा आरोप त्यांनी या पुस्तकात केला आहे. Read more »

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे एकाच कुटुंबातील १५ मुसलमानांची हिंदु धर्मात ‘घरवापसी !’

 बघरा येथे एका मुसलमान कुटुंबातील १५ लोकांनी हिंदु धर्म स्वीकारून ‘घरवापसी’ केली. त्यांनी १८ वर्षांपूर्वी भीतीपोटी इस्लाम स्वीकारला होता; परंतु आता ते परत हिंदु धर्मांत आले आहेत. Read more »

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे पाकचा झेंडा फडकावल्याच्या प्रकरणी चौघांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील चौरी चौरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणार्‍या पंचायतीमध्ये रहाणार्‍या तालिम नावाच्या व्यक्तीने त्याच्या घरावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावला. याची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर येथे मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला. या जमावाने या घरावर दगडफेक चालू केली, तसेच शालिम याच्या वाहनाची तोडफोड केली. Read more »

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा माहिरा खान यांना गोतस्करीच्या प्रकरणी ७ वर्षांनी अटक !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसच्या नेत्या माहिरा खान उपाख्य महक वारसी यांना ७ वर्षांपूर्वीच्या गोहत्या, गोतस्करी आणि फसवणूक या गुन्ह्यांच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. माहिरा काँग्रेसच्या मुरादाबाद शहर महिला अध्यक्षा आहेत. Read more »

पहाटे होणार्‍या अजानमुळे साधू-संत यांच्या साधनेत व्यत्यय येतो ! – भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर

इतर धर्मियांच्या प्रार्थनेच्या वेळी ‘मोठ्या आवाजात भजन, कीर्तन करू नका’ असे आपल्याला (हिंदूंना) सांगितले जाते; पण हे लोक (मुसलमान) पहाटे अजान देऊन लोकांची झोप मोड करतात. पहाटे ५ वाजता अजानमुळे लोकांची झोप उडते. रुग्णांना त्रास होतो. साधू-संतांची बहाटे पूर्जा-अर्चा किंवा ध्यान साधना चालू असते. Read more »

श्रीराम सेना, हिंदु राष्ट्र सेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी बेळगाव येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हाणून पाडला !

एका ख्रिस्ती पाद्य्राने प्रार्थनेच्या नावाखाली ७ नोव्हेंबर या दिवशी मराठा कॉलनी येथील एका इमारतीत ग्रामीण भागातील २०० हिंदूंना धर्मांतरासाठी एकत्र जमवले होते. श्रीराम सेना, हिंदु राष्ट्र सेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी या इमारतीला वेढा दिला अन् पोलिसांना बोलावले. Read more »

रायसेन (मध्यप्रदेश) येथील ‘ख्रिश्‍चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये आदिवासी मुलींना इतरांचे धर्मांतर करण्याचे दिले जात होते प्रशिक्षण !

रायसेन (मध्यप्रदेश) येथील ‘ख्रिश्‍चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये चालू असलेला धर्मांतराचा प्रयत्न ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी उघड केला. कानूनगो यांनी या हॉस्टेलला अचानक भेट दिली असता त्यांना  येथे आदिवासी हिंदु तरुणींना आणण्यात आल्याचे दिसून आले. Read more »

आतंकवादी दाऊद याची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही ! – सनातन संस्था

‘पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेच्या संदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करून घेऊ नये. त्यांचा हा प्रकार म्हणजे समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​