Menu Close

गडचिरोली येथे झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार !

गडचिरोली – येथे १३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. यात ३ पोलीस घायाळ झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने तात्काळ नागपूरला नेण्यात आले आहे. मृत नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये संघटनेचा मोठा नेता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read more on Featured News

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *