Menu Close

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे पाकचा झेंडा फडकावल्याच्या प्रकरणी चौघांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथील चौरी चौरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणार्‍या पंचायतीमध्ये रहाणार्‍या तालिम नावाच्या व्यक्तीने त्याच्या घरावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावला. याची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर येथे मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला. या जमावाने या घरावर दगडफेक चालू केली, तसेच शालिम याच्या वाहनाची तोडफोड केली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगवले. यासह तालिम, पप्पू, आशिक आणि आरिफ या चौघांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंद केला. त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

१. याविषयी ब्राह्मण जन कल्याण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कल्याण पाण्डे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. ते म्हणाले की, जर आरोपींना अटक झाली नाही, तर त्यांचे घर पाडण्यात येईल.

२. पोलिसांनी म्हटले की, सध्या चौकशी चालू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. त्याचा विदेशात कुणाशी संपर्क आहे का, हे पडताळण्यात येत आहे. तालिम याने लागवलेला झेंडा इस्लामचा झेंडा आहे कि पाकिस्तानचा ? याचीही चौकशी केली जात आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *