हिंदूंची भूमी बळकावू पहाणार्‍या समाजवादी पक्षाचे माजी खासदार अदीब याच्यावर गुन्हा नोंद !

हिंदूंची मालकी असलेले समाधी स्थळ कब्रस्तान असल्याचे सांगून तेथे मशीद बांधण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे माजी खासदार महंमद अदीब यांच्यासह अब्दुल हसीब कासमी आणि मुफ्ती महंमद सलीम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

प्रार्थनेच्या नावाखाली शक्तीप्रदर्शन करून अन्य धर्मियांच्या भावना भडकावू नयेत ! – हरियाणाचे भाजपचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर

सर्व धर्मांचे लोक त्यांच्या धार्मिक स्थळांमध्ये म्हणजे मंदिर, गुरुद्वारा, मशीद, चर्च आदींमध्ये प्रार्थना करतात. सणांच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी अनुमती दिली जाते; मात्र प्रार्थनेच्या नावाखाली शक्तीप्रदर्शन करून दुसर्‍या धर्मांतील लोकांना भडकावणे योग्य नाही, असे विधान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्याच्या विधानसभेत केले. Read more »

गुरुग्राम (हरियाणा) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यास हिंदु संघटनांचा विरोध कायम !

शुक्रवारी सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला गेले काही मास हिंदूंकडून विरोध केला जात आहे. शुक्रवार, १७ डिसेंबरलाही हिंदु संघटनांकडून विरोध करण्यात आला. त्या वेळी नमाजपठण करणारे आणि हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणाही दिल्या. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. Read more »

सार्वजनिक जागांवर करण्यात येणारे नमाजपठण खपवून घेतले जाणार नाही ! – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर

सार्वजनिक जागांवर नमाजपठण करण्याची प्रथा खपवून घेतली जाणार नाही; पण चर्चेतून एक सौहार्दपूर्ण तोडगा काढला जाईल, अशी चेतावणी राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली. गुरुग्राममध्ये सार्वजनिक जागांवर नमाजपठण करण्याच्या विरोधात २ मासांपूर्वी हिंदूंनी निदर्शने चालू केल्यानंतर प्रथमच भाजप सरकारची भूमिका मुख्यमंत्री खट्टर यांनी स्पष्ट केली आहे. गेल्या २ मासांपासून प्रत्येक शुक्रवारी नमाजपठण करण्याच्या विरोधात निदर्शने आयोजित केली जात आहेत. Read more »

गुरुग्राम (हरियाणा) येथे हिंदूंकडून सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाला पुन्हा विरोध

हरियाणात भाजपचे सरकार असतांना हिंदू आणि त्यांच्या संघटना यांना सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाला सातत्याने विरोध करावा लागतो, तसेच पोलीस आणि प्रशासन त्याची नोंद घेऊन ते थांबवत नाहीत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! Read more »

गुरुग्राम (हरियाणा) येथे प्रशासनाने नमाजपठणाला दिलेल्या अनुमतीला विरोध

२६ नोव्हेंबरला येथील सेक्टर ३७ मध्ये ज्या ठिकाणी नमाजपठण करण्यात येणार होते, तेथे हिंदूंनी हवन चालू केल्याने नमाजपठण करण्यास आलेल्यांना परत जावे लागले. तथापि काही वेळाने हाजी शहजाद यांच्या उपस्थितीत २५ जणांनी हवनाच्या जागेपासून थोड्या अंतरावर एका कोपर्‍यात नमाजपठण केले. Read more »

बल्लभगड (हरियाणा) येथील सरकारी भूमीवरील अवैध मजार हिंदुत्वनिष्ठांनी तोडून टाकली !

बल्लभगडमध्ये बांधण्यात आलेली अवैध मजार (इस्लामी पीर किंवा फकिर यांची समाधी) हिंदुत्वनिष्ठांनी रात्रीच्या वेळी तोडून टाकली. येथे त्यांना लैंगिक संबंधांशी संबंधित, तसेच महिलांचे वशीकरण करण्याविषयीची औषधे सापडली. ही मजार येथील बल्लभगड पंचायत भवनच्या भूमीवर बांधण्यात आली होती. Read more »

हिंदूंच्या विरोधानंतर गुरुग्राम (हरियाणा) येथे ३७ पैकी ८ सार्वजनिक ठिकाणची नमाजपठणाला दिलेली अनुमती रहित !

गुरुग्राम (हरियाणा) येथील प्रशासनाने ३७ पैकी ८ सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांना नमाजपठण करण्यास दिलेली अनुमती मागे घेतली. हिंदूंच्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला. ‘अन्य ठिकाणच्या नमाजपठणाविषयी लवकरच निर्णय घेतला जाईल’, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे Read more »

‘सॅटो टॉयलेट्स एशिया’ आस्थापनाने श्री दुर्गादेवीचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

‘सॅटो टॉयलेट्स एशिया’ (SATO Toilets Asia) नावाचे आस्थापन सॅनिटरी वस्तूंचे (आरोग्य चांगले राखण्यासंबंधीच्या वस्तूंचे) उत्पादन करून त्यांची विक्री करते. यांमध्ये साबण, सॅनिटायझर, हँड वॉश आदींचा समावेश आहे. याचा प्रसार करण्यासाठी या आस्थापनाने एक विज्ञापन बनवून ते ट्विटरवर पोस्ट केले होते. Read more »

गुरुग्राम (हरियाणा) येथे मोकळ्या जागेत अवैधरित्या नमाजपठण करणार्‍यांच्या विरोधात हिंदु महिलांचे आंदोलन !

येथील ‘सेक्टर ४७’ येथे वास्तव्य करणार्‍या हिंदु महिलांनी मोकळ्या जागेत अवैधरित्या चालू असलेल्या नमाजपठणाला विरोध करण्यासाठी भजन-कीर्तन आणि आरती केली. ८ ऑक्टोबर या दिवशी हिंदु महिलांनी अवैधरित्या चालू असलेल्या नमाजपठणाच्या निषेधार्थ हातात फलक पकडून निदर्शने केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​