नवी मुंबई : येथील महापौर श्री. सुधाकर सोनावणे यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी महापौरांनी कार्यक्रमाची प्रशंसा करत नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन प्रतीवर्षी विविध वृत्तपत्रांत यासंबंधी विज्ञापन देऊन प्रबोधन करत असल्याचे सांगितले. या वेळी अखिल भारतीय हिंदु महासभेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख श्री. मंगेश म्हात्रे, श्री. हेमंत म्हात्रे, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. उदय धुरी आणि वसंत सणस उपस्थित होते. हिंदु महासभेनेही यासंदर्भात स्वतंत्र निवेदन दिले.