कुठे आता कार्य उरले नसल्याने पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटणारे प.पू. डॉक्टर, तर कुठे युगानुयुगे कार्य करणारा ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी !

हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची स्थापना होणार, याची खात्री अनेक संत आणि नाडी भविष्य सांगणारे ऋषी यांनी मला दिली आहे. त्यामुळे आता करण्यासारखे काही कार्य उरले नसल्याने मला पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे झाले. तेव्हा विश्‍वाचा निर्माता ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी यांनी सत्त्वप्रधान राज्याची स्थापना करण्यासाठी युगानुयुगे कार्य केले आहे, … Read more

वाचकसंख्या वाढावी यासाठी सनातन प्रभातमध्ये लेख आणि सदरे छापत नाहीत,…

वाचकसंख्या वाढावी यासाठी सनातन प्रभातमध्ये लेख आणि सदरे छापत नाहीत, तर वाचकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यास त्यांना दिशा मिळावी, यांसाठी असतात.

खरी वास्तुशुद्धी !

१. सर्वसाधारण व्यक्ती : यांना आपण रहातो ती वास्तू, असे वाटते आणि तिच्यासाठी आवश्यक असल्यास ते वास्तुशुद्धी विधी करतात. २. व्यष्टी साधना करणारे : यांना शरीर, मन आणि बुद्धी ही आत्म्याची वास्तू वाटते आणि ते त्यांच्या शुद्धीसाठी प्रयत्न करतात. ३. समष्टी साधना करणारे : यांना राष्ट्र ही वास्तू वाटते आणि … Read more

गुरु-शिष्य नाते

ज्या नात्यात भांडणे होत नाहीत, असे एकच नाते जगात आहे आणि ते म्हणजे गुरु-शिष्य नाते.

स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्‍वरेच्छा

आपल्या इच्छेने जे करतो, ते योग्य कि अयोग्य, हे आपल्याला कळत नाही; म्हणून स्वेच्छा नको, तर साधनेत पुढे गेलेल्यांच्या मार्गदर्शनानुसार, म्हणजे परेच्छेने सर्व करावे. त्यातूनच पुढे ‘ईश्‍वरेच्छा म्हणजे काय’, हे कळते आणि प्रत्येक पाऊल ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने पडते.

मोक्षप्राप्ती व्हावी’, असे वाटणे आणि ‘धर्मकार्य करण्यासाठी पुन: पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते !

साधना करणारे ‘पुढचा जन्म नको साधना करून याच जन्मात मोक्षाला जाऊया’, अशी इच्छा बाळगतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी पुन: पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते. ही स्वेच्छा म्हटली, तरी ‘पुढचा जन्म नको’ हीदेखील स्वेच्छाच ठरते !

भक्तीयोगात होत असलेली समष्टी साधना !

बर्‍याच जणांना वाटते की, भक्तीयोगात फक्त व्यष्टी साधना होते. प्रत्यक्षात तसे नसून भक्ताकडे इतर आकर्षिले जातात आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला लागतात. त्यामुळे त्याची समष्टी साधनाही होते.

साधनेत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे याला कलियुगात प्राधान्य !

स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केले, तरच कोणत्याही साधनामार्गाने साधना करून जलद प्रगती करता येते. आधीच्या युगांत स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक नसल्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची आवश्यकता नव्हती. ते आपोआपच नष्ट होत.

सर्व साधनामार्गांचा पाया असलेला गुरुकृपायोग !

भक्तीयोगाचे उदाहरण म्हणजे देवाची भक्ती करण्यास शिकवले जाते, ज्ञानयोगाचे उदाहरण म्हणजे योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन शिकवले जातात आणि कर्मयोगाचे उदाहरण म्हणजे नामजप करत कर्म करण्यास शिकवले जाते. हे सर्व गुरुकृपायोगात शिकवले जाते. हठयोग, कर्मयोग, कुंडलिनीयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना करायची असली, तरी गुरुकृपायोगात सांगितलेली अष्टांग साधना व्यष्टी साधनेचा पाया … Read more