कुठे आता कार्य उरले नसल्याने पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटणारे प.पू. डॉक्टर, तर कुठे युगानुयुगे कार्य करणारा ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी !

हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची स्थापना होणार, याची खात्री अनेक संत आणि नाडी भविष्य सांगणारे ऋषी यांनी मला दिली आहे. त्यामुळे आता करण्यासारखे काही कार्य उरले नसल्याने मला पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे झाले. तेव्हा विश्‍वाचा निर्माता ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी यांनी सत्त्वप्रधान राज्याची स्थापना करण्यासाठी युगानुयुगे कार्य केले आहे, तरी त्यांना त्याचा कंटाळा आला … Read more

देशात ७० सहस्त्राहून अधिक न्यायाधिशांची आवश्यकता असतांना त्यांची नियुक्ती न करता कित्येक दशके निकाल न देणारी भारताची आणि जगातील एकमेव लज्जास्पद न्यायप्रणाली !

देशात ७० सहस्त्राहून अधिक न्यायाधिशांची आवश्यकता असतांना आणि ते उपलब्ध असतांना न्यायाधिशांना पगार द्यायला पैसे नाहीत; म्हणून भारत सरकारने त्यांची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे ३ कोटी ७० लाखांहून अधिक दावे प्रलंबित आहेत. त्यांच्या निकालाची वाट पहात कारागृहात रहाणार्‍या लाखो कैद्यांचे खाणे-पिणे आणि निवास यांवर शासनाचे इतके पैसे खर्च होत आहेत की, निकाल लवकर देऊन निरपराध्यांना … Read more

जनतेने मताधिकार वापरून एखाद्या रुग्णाला औषध द्यायचे ठरवणे याला मूर्खपणा म्हणता येईल

जनतेने मताधिकार वापरून एखाद्या रुग्णाला औषध द्यायचे ठरवणे याला मूर्खपणा म्हणता येईल. त्याचप्रमाणे राष्ट्र आणि धर्म मृत्यूशय्येवर असतांना तशा जनतेने निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणे, याला महामूर्खपणा म्हणता येईल.

वाचकसंख्या वाढावी यासाठी सनातन प्रभातमध्ये लेख आणि सदरे छापत नाहीत,…

वाचकसंख्या वाढावी यासाठी सनातन प्रभातमध्ये लेख आणि सदरे छापत नाहीत, तर वाचकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यास त्यांना दिशा मिळावी, यांसाठी असतात.

केवळ खर्‍या संतांमुळेच आज मानव जिवंत आहे, हे लक्षात घ्या !

खरे संत सूक्ष्मातील अदृष्य वाईट शक्तींना त्यांच्या संकल्पाने किंवा केवळ अस्तित्वाने हरवून पृथ्वीवरील मनुष्य देहधारी असुरांची मूळ शक्ती नष्ट करतात. त्यामुळेच त्यांना हरवणे सात्त्विक धर्मयोद्ध्यांना शक्य होते. हे कळत नसल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना वाटते, एवढा मोठा आपत्काळ असूनही संत काही करत का नाहीत ? त्यांच्या लक्षात येत नाही की, केवळ खर्‍या संतांमुळेच ते जिवंत आहेत ! … Read more

म्हणून मी नेहमी आनंदात असतो.

मी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मयोगाप्रमाणे करतो. कर्मफलाकडे ज्ञानयोगानुसार साक्षीभावाने पहातो, तर भक्तीयोगाप्रमाणे सर्व ईश्‍वरेच्छेने होते, हे ज्ञात असल्यामुळे कर्मफलाचे विचार करत नाहीत; म्हणून मी नेहमी आनंदात असतो.

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना ईश्‍वरचरणी स्थान मिळावे, असे वाटते

बहुतेक हिंदुत्ववाद्यांना एखाद्या संघटनेत पद मिळावे, आमदार-खासदार बनावे, असे वाटते. याउलट सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना ईश्‍वरचरणी स्थान मिळावे, असे वाटते !

बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनांची राजकारण्यांप्रमाणे खेळी !

राजकारणी दुसर्‍या पक्षातील चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी पक्षातील एखादे चांगले पद देऊ करतात. त्याप्रमाणे आता बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनाही छोट्या हिंदुत्ववादी संघटनांमधील चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्या संघटनेत आणण्यासाठी संघटनेतील एक चांगले पद देऊ करत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनांमध्ये आता चांगले कार्यकर्ते तयार करण्याची क्षमता उरलेली नाही.