कुठे आता कार्य उरले नसल्याने पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटणारे प.पू. डॉक्टर, तर कुठे युगानुयुगे कार्य करणारा ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी !

हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची स्थापना होणार, याची खात्री अनेक संत आणि नाडी भविष्य सांगणारे ऋषी यांनी मला दिली आहे. त्यामुळे आता करण्यासारखे काही कार्य उरले नसल्याने मला पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे झाले. तेव्हा विश्‍वाचा निर्माता ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी यांनी सत्त्वप्रधान राज्याची स्थापना करण्यासाठी युगानुयुगे कार्य केले आहे, तरी त्यांना त्याचा कंटाळा आला नाही, हे लक्षात आले. त्यावरून मी किती क्षुद्र आहे आणि ते किती श्रेष्ठ आहेत, हे लक्षात आले.