जगभर झालेल्या प्रदूषणावर हास्यास्पद उपाय नकोत !

जगभर प्रदूषणाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. प्रदूषणाचा मानवी जीवनावर किती घोर परिणाम होत आहेत, याच्या बातम्या अधूनमधून नियतकालिकांत येतात आणि दूरचित्रवाहिन्यांवर सांगण्यात येतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, खरे महाभयानक प्रदूषण आहे रज-तम कणांचे आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या वाईट शक्तींचे. या मुळाशी जाऊन मानव सात्त्विक कसा बनेल आणि वाईट शक्तींचे पृथ्वीच्या वातावरणातून उच्चाटन कसे होईल, याचा विचार करायला हवा. यासाठी सर्वांना साधना करायला लावली पाहिजे. असे न केल्यास प्रदूषणावर बुद्धीच्या साहाय्याने शोधलेले हास्यास्पद उपाय पुढील पिढ्यांची अवस्था केविलवाणी करतील.

(वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

Leave a Comment