तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये शरीयत कायदे लागू करावेत !

 ब्रिटनमध्ये विद्वेष पसरवणारे उपदेशक अंजेम चौधरी यांनी तालिबान्यांना अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक न्यायाप्रमाणे कठोर शिक्षा लागू करण्याचा आग्रह धरला आहे. ज्यामध्ये भेसळ करणार्‍यांना दगड मारणे, चोरांचे हात छाटणे आणि मद्यपान करणार्‍यांना मारहाण करणे आदींचा समावेश आहे. Read more »

काही दशकांपासून भारतात रहाणारे पाक आणि अफगाणिस्तान येथील शीख आणि हिंदु कुटुंबे भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत !

अफगाणिस्तानमधून काही दशकांपूर्वी भारतात आश्रय घेतलेल्या हिंदु आणि शीख कुटुंबांना अद्यापही भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) संमत झालेला असतांनाही या हिंदू आणि शीख यांना नागरिकत्व मिळत नसल्याचे चित्र आहे. Read more »

अफगाणी निर्वासितांना रोखण्यासाठी इस्लामी देश तुर्कस्तानने सीमेवर बांधली २९५ किलोमीटर लांब भिंत !

हे अफगाणी नागरिक इराणमार्गे तुर्कस्तानात जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी तुर्कस्तान इराणच्या सीमेवर २९५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर उंच भिंत बांधत आहे. आता केवळ ५ किलोमीटरचे काम शिल्लक राहिले आहे. जे निर्वासित काही आठवडे आणि मासांपूर्वी पलायन करून गेले होते ते आता सीमा भागात दिसू लागले आहेत. Read more »

अफगाणी निर्वासितांच्या नावाखाली आतंकवाद्यांना आश्रय मिळू नये ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आक्षेप घेतला आहे. ‘निर्वासितांच्या नावाखाली आतंकवाद्यांना आश्रय मिळू नये. आम्हाला रशियामध्ये अफगाणी आतंकवादी नकोत’, असे पुतिन यांनी म्हटले आहे. पुतिन यांनी काही पाश्‍चात्त्य देशांकडून अफगाणिस्तानमधील निर्वासितांना मध्य आशियाई देशांमध्ये स्थलांतरित करण्याच्या कल्पनेला विरोध केला आहे. Read more »

हरियाणातील भाजप सरकारकडून ‘गोरखधंदा’ या शब्दाच्या वापरावर बंदी !

हरियाणा सरकारने ‘गोरखधंदा’ या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे. ‘गोरखधंदा’ या शब्दाच्या अयोग्य प्रकारे होणार्‍या वापरावर बंदी आणावी, अशी मागणी गोरखनाथ समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनी या शब्दाच्या अयोग्य वापरावर बंदी घालण्यात येत असल्याचा नुकताच शासकीय आदेश काढला. Read more »

(म्हणे) ‘अल्लामुळेच तालिबान्यांनी अफगाणिस्तावर नियंत्रण मिळवले !’

अल्लामुळेच तालिबान्यांनी अफगाणिस्तावर दुसर्‍यांदा नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे सर्व मुसलमानांनी आनंदोत्सव साजरा केला पाहिजे, असे विधान तमिळनाडूतील मौलाना (इस्लामी अभ्यासक) शमसुद्दीन कासिमी यांनी केले आहे. Read more »

कोरोना प्रतिबंधक लसी फेकून दिल्याचे प्रकरण आणि त्यावरील अलाहाबाद उच्च न्यायालयाचा गंभीर दृष्टीकोन !

‘उत्तरप्रदेशमध्ये अलीगडच्या जमालपूर भागातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणार्‍या नेहा खान या परिचारिकेने २९ कोरोना प्रतिबंधक लसी कचर्‍यात फेकून दिल्या होत्या. या प्रकरणी तिच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम १७६, ४६५, ४२७ आणि १२० (ब) या कलमांच्या अंतर्गत, तसेच ‘प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट’ आणि कोरोना नियंत्रणासाठी बनवलेला ‘पॅनेडेमिक ॲक्ट’ या आपत्कालीन कायद्यातील कलम ३ अन् ४ यांचे उल्लंघन झाल्याविषयी गुन्हे नोंदवण्यात आले. Read more »

पाकिस्तानमध्ये ५० वर्षीय मौलवीकडून ३ वर्षांच्या ख्रिस्ती मुलीवर बलात्कार !

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये डॉ. महंमद सलीम नावाच्या ५० वर्षीय मौलवीने ३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मौलवीला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मुलगी एका खाजगी आस्थापनाकडून चालवण्यात येत असलेल्या शाळेत शिकण्यासाठी गेली होती. तेथून परत येत असतांना आरोपी सलीमने तिच्यावर बलात्कार केला. Read more »

ओवैसी यांना अफगाणिस्तानात पाठवून द्यायला हवे ! – केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचे प्रत्युत्तर

अफगाणिस्तानवरील तालिबानच्या नियंत्रणानंतर तेथील महिलांवरील अत्याचारांविषयी संपूर्ण जग चिंतेत आहे; परंतु ‘एम्आयएम्’चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘भारत सरकारने तालिबान सरकारमधील अफगाणी लोकांना साहाय्य करण्यापेक्षा भारतातील महिलांना साहाय्य केले पाहिजे’, असे विधान केले. Read more »

अमेरिकी सैन्यावर आक्रमण केले, तर सडेतोड प्रत्युत्तर देऊ ! – जो बायडेन यांची तालिबानला चेतावणी

आम्ही तालिबान्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, आमच्या सैन्यावर किंवा काबुल विमानतळावर चालू असलेल्या बचावकार्यावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण केले, तर त्याला तितक्याच तीव्रतेने आणि सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे. ते व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​