कृतज्ञतेची जाणीव कौतुकास्पद !

दहिया यांनी भारतात परतल्याक्षणी शिव मंदिरांत जलाभिषेक, तसेच रुद्राभिषेक करून कृतज्ञता व्यक्त केली. मोठे यश संपादन केल्यानंतरही दहिया यांच्या मनामध्ये असलेली ईश्वराच्या कृपेची जाणीव कौतुकास्पद आहे. Read more »

(म्हणे) ‘तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सारखेच !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना मी तालिबानशी केली  होती. धर्माच्या आधारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालतो आणि तालिबानदेखील तेच करत आहे; म्हणून मी संघाची तुलना तालिबानशी केली. भाजप आणि रा.स्व. संघ यांनी कितीही विरोध केला, तरी माझे म्हणणे मी मागे घेणार नाही, असे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (‘के.पी.सी.सी.’चे) कार्याध्यक्ष आर्. ध्रुवनारायण यांनी स्पष्ट केले आहे. Read more »

मेवात (हरियाणा) जिल्ह्यात मौलानांकडून हिंदु युवकाचे धर्मांतर

हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यात असलेल्या बरोट येथे मौलानांनी पैशाचे आमीष देऊन मनोज कुमार नावाच्या एका हिंदु युवकाचे धर्मांतर केले. त्यानंतर दोन मौलानासहित चार धर्मांधांनी तो गोमांस खात नाही, हे पाहून त्याला मारहाण केली, तसेच हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरून ‘मूर्तीपूजेमध्ये दम नाही’, असे विधान केले. Read more »

जेएनयूआणि ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ या विद्यापिठांतील विद्यार्थ्यांचा आतंकवादी कारवायांत सहभाग !

शहरी नक्षलवादाच्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना स्वत:चे सरकार स्थापन करायचे होते. त्यामुळेच त्यांनी अस्तित्वात असलेले सरकार उलथवून लावण्यासाठी देशाविरुद्ध युद्ध पुकारले. स्फोटकांचा वापर करून नागरिकांच्या मनात भय निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. Read more »

राजस्थानमधील मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलन करणार ! – श्री राजपूत करणी सेनेची घोषणा

राजस्थान सरकार मेंहदीपूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने त्याच्या डोक्यातून सरकारीकरणाचा विचार काढून टाकावा. श्री राजपूत करणी सेना मेहंदीपूर बालाजी मंदिर आणि राज्यातील अन्य मंदिरे यांचे सरकारीकरण होऊ देणार नाही. आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करू, अशी चेतावणी श्री राजपूत करणी सेनेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंह मकराना यांनी येथे दिली. Read more »

तालिबान आणि आय.एस्.आय. यांनी ‘इस्लामिक स्टेट’ला सोपवले भारतात आतंकवादी आक्रमण करण्याचे दायित्व ! – गुप्तचर विभागाची माहिती

 भारतात आत्मघाती आक्रमण करण्यासाठी तालिबान आणि पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. यांनी ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेला दायित्व सोपवले आहे, अशी माहिती भारतीय गुप्तचर विभागाने दिली आहे. यात आक्रमणासाठी पाकपुरस्कृत आतंकवाद्यांचा वापर होण्याची शक्यता आहे. Read more »

‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या वतीने चालू असलेल्या अवैध मनकर्णिका कुंडाच्या उत्खनन प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार पुरातत्वाचे संकेत भंग न करता जतन आणि संवर्धन करा !

मनकर्णिका कुंडाच्या उत्खनन प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार पुरातत्वाचे संकेत भंग न करता जतन आणि संवर्धन करण्यात यावे, पूर्व द्वारातून येणारे सांडपाणी ज्याचे त्यांनी स्वखर्चाने बाहेरून वळवून घ्यावे. मंदिराचे पावित्र्य आणि पुरातत्वाचे संकेत अबाधित राखावेत, या मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २४ ऑगस्ट या दिवशी जिल्हा प्रशासनास देण्यात आले. Read more »

तालिबान्यांना जेवण आवडले नाही; म्हणून त्यांनी महिलेला जिवंत जाळले !

तालिबानी पैसे मिळवण्यासाठी अफगाणिस्तानमधील महिलांना शेजारच्या देशांमध्ये विकत आहेत. नोकरदार महिलांना नोकरी करण्यास बंदी करण्यात आली असून त्यांच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. Read more »

बांगलादेशी धर्मांध तालिबानमध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या मार्गाने अफगाणिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात !

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर काही बांगलादेशी धर्मांध भारताच्या मार्गाने अफगाणिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व जण तालिबानमध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाला सतर्क करण्यात आले आहे. Read more »

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये शरीयत कायदे लागू करावेत !

 ब्रिटनमध्ये विद्वेष पसरवणारे उपदेशक अंजेम चौधरी यांनी तालिबान्यांना अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक न्यायाप्रमाणे कठोर शिक्षा लागू करण्याचा आग्रह धरला आहे. ज्यामध्ये भेसळ करणार्‍यांना दगड मारणे, चोरांचे हात छाटणे आणि मद्यपान करणार्‍यांना मारहाण करणे आदींचा समावेश आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​