अधिक वार्ता

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या संशयित आरोपीचे ५ मजली बेकायदेशी घर तोडा ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

जरीमरी, साकीनाका येथे एका कट्टरपंथियाने धार्मिक तेढ निर्माण करून स्थानिक हिंदु कुटुंबावर जीवघेणे आक्रमण केले होते. यात ५ हिंदू गंभीर घायाळ झाले आहेत. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित कुटुंबाची चौकशी केली. मंत्री लोढा यांनी संशयित व्यक्तीचे बेकायदेशीररित्या उभे केलेले ५ मजली घर तोडण्याचे निर्देश दिले. Read more »

‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा सुधारणा विधेयक २०२४’ रहित करा !

कर्नाटक सरकारने २० फेब्रुवारी २०२४ या दिवशी ‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा अधिनियम १९९७’ यात आणखी सुधारणा केल्‍या आहेत. Read more »

हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या कृष्णकूपची पूजा करण्याची मिळाली अनुमती !

मथुरा (उत्तरप्रदेश) येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह मशिदीजवळील कृष्णकूपची (विहिरीची) पूजा करण्याची अनुमती हिंदूंना मिळाली आहे. याची माहिती मुख्य हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्‍वर भृगुवंशी आशुतोष पांडेय यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली. Read more »

बिकानेरमध्ये (राजस्थान) हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी राजस्थानच्या बिकानेरमध्ये भाजप आमदार श्री. जेठानंद व्यास, ‘भाजयुमो’चे बिकानेर जिल्हाध्यक्ष वेद व्यास आणि ‘महाराजा गंगा सिंह विद्यापिठा’चे कुलगुरु यांची भेट घेतली. Read more »

हिंदु जनजागृती समितीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

या प्रसंगी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधीकृती समिती’चे श्री. बाबासाहेब भोपळे यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन इतिहासाचा जागर करत मोहिमेचा समारोप करण्यात आला. Read more »

हिंदु जनजागृती समिती आयोजित पुणे येथे ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे शहराजवळील सासवड या गावानजिक असलेल्या मल्हार गडावर १७ मार्चला ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. Read more »

दुकानात हनुमान चालिसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणावर चाकूद्वारे आक्रमण

बेंगळुरू (कर्नाटक) येथील नगरथपेटे येथील जुम्मा मशीद मार्गावर हिंदूंच्या मालकीचे भ्रमणभाष संचांच्या विक्रीचे दुकान आहे. या दुकानात कथित अजानच्या (नमाजपठणासाठी मशिदीत बोलावण्याच्या आवाहनाच्या) वेळी हनुमान चालिसा लावल्यावरून काही मुसलमान तरुणांनी दुकानातील मुकेश नावाच्या हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण केले. Read more »

प्रयागराज येथील प्रा. डॉ. एहसान अहमद यांनी केला हिंदु धर्मात प्रवेश !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील एहसान अहमद नावाच्या प्राध्यापकाने नुकतीच घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) केली. आता ते अनिल पंडित या नावाने ओळखले जातील. Read more »

तमिळनाडूतील ‘जीझस रिडीम्स’ या ख्रिस्ती संस्थेचा विदेशी देणगी मिळण्याचा परवाना रहित !

चेन्नई (तमिळनाडू) राज्यातील तुतीकोरीन येथे असलेल्या ‘जीझस रिडीम्स’ या ख्रिस्ती संस्थेचा ‘विदेशी निधी (नियमन) कायद्या’च्या (एफ्.सी.आर्.ए.च्या) अंतर्गत देण्यात आलेला परवाना केंद्रीय गृहमंत्रालयाने रहित केला आहे. Read more »

1 7 8 9 10 11 1,285