(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठांकडून मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात !’

अत्यंत धादांत खोटी वक्तव्ये तमिळनाडू येथील लेखिका आणि कार्यकर्ती मीना कंडासामी यांनी पहिल्या सत्रात केली. १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत जागतिक स्तरावर ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (जागतिक स्तरावरील हिंदुत्वाचे उच्चाटन) या ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. Read more »

हिंदुत्वाला ‘ब्राह्मणवादी’ ठरवून त्यापासून धोका असल्याची हिंदुद्वेष्ट्या वक्त्यांची गरळओक !

‘हिंदुत्वनिष्ठांना ब्राह्मणवादाची पुनर्स्थापना करून हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असून हे सर्व धोकादायक आहे’, या आणि अशा धादांत खोट्या, बिनबुडाच्या अन् पुरावे नसलेल्या अनेक हिंदुविरोधी वक्तव्यांचा भडीमार ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या ऑनलाईन परिषदेत करून सहभागी वक्त्यांनी ‘हिंदुद्वेष त्यांच्या नसानसांत किती भिनला आहे ?’ याचे कडवे प्रदर्शन केले. Read more »

‘ग्लोबल डिसमेंटलिंग हिंदुत्व’ या परिषदेला अमेरिका आणि कॅनडा येथील हिंंदूंच्या १५० संस्थांचा विरोध !

अमेरिका आणि कॅनडा या देशांतील हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संस्था, मंदिरे आणि आध्यात्मिक संस्था अशा एकूण १५० संस्थांनी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या परिषदेला पाठिंबा देऊ नये, अशा आशयाचे एक निवेदन ४० विद्यापिठांना पाठवले आहे. Read more »

चीन तालिबानला साहाय्य म्हणून २२८ कोटी रुपये देणार !

अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर ७ सप्टेंबर या दिवशी तालिबान्यांनी त्यांच्या सरकारची घोषणा केली. या सत्ता स्थापनेवर जागतिक स्तरावरून कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी चीनने नवीन तालिबान सरकारसाठी ३१० लाख अमेरिकी डॉलर्सच्या (२२८ कोटी भारतीय रुपयांहून अधिकच्या) साहाय्याची घोषणा केली आहे. Read more »

अफगाणिस्तानमध्ये शरीयत कायद्यानुसार कारभार चालणार ! – तालिबानची घोषणा

सरकारच्या स्थापनेनंतर सरकारकडून करण्यात आलेल्या निवेदनामध्ये अफगाणिस्तानमध्ये शरीयतनुसार कारभार करण्यात येईल, असे घोषित करण्यात आले आहे. तसेच देशात निदर्शने आणि आंदोलने करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. Read more »

आम्ही तालिबानचे संरक्षक असून त्याच्यासाठी सर्वकाही केले ! – पाकच्या मंत्र्याची स्वीकृती

 आम्ही बराच काळ तालिबानी नेत्यांना संरक्षण दिलेले आहे. आमच्याकडे ते शरणार्थी म्हणून आले होते. त्यांनी पाकमध्येच शिक्षण घेतले आणि येथेच स्वतःचे घर वसवले. आम्ही तालिबानचे संरक्षक असून आम्ही तालिबानसाठी सर्वकाही केले, असे विधान पाकचे मंत्री शेख राशिद यांनी जाहीरपणे केले आहे. Read more »

(म्हणे) ‘काश्मीरला इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करा !’ – अल् कायदाचे तालिबानला आवाहन

अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्यानंतर जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाने तालिबानला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काश्मीरसहित अन्य इस्लामी भूमी इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करण्याचे आवाहन केले आहे. Read more »

पाकिस्तानमध्ये श्रीकृष्ण जयंती साजरी करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांकडून आक्रमण !

पाकिस्तानच्या सिंधमधील संघर जिल्ह्यातील खिप्रो या भागामध्ये धर्मांधांनी श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशीच श्रीकृष्ण मंदिरांत पूजा करणार्‍या हिंदूंवर आक्रमण करत त्यांना मारहाण केली. तसेच येथील भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचीही तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. Read more »

‘इस्लामिक स्टेट’मध्ये भारतातील धर्मांधांचाही समावेश !

आतंकवादी संघटनेच्या एका कमांडरची मुलाखत घेतली. त्यात त्याने ‘या संघटनेमध्ये भारतीय नागरिकांचाही (धर्मांधांचाही) समावेश आहे’, अशी माहिती दिली आहे. ‘काबुलमध्ये आमच्या संघटनेला कोणताच धोका नाही आणि आमची कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नाही’, असाही दावा या कमांडरने केला. काबुल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बाँबस्फोटांच्या मागे १४ भारतियांचाही सहभाग असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. Read more »

काबुल बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी केरळमधील १४ धर्मांधांचा सहभाग असल्याची शक्यता

काबुल  येथे ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ या आतंकवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या विमानतळाबाहेरील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी केरळमधील १४ धर्मांधांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दोघा पाकिस्तान्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​