पाकिस्तानी सैन्याधिकारी चीनच्या सैन्यामध्ये सहभागी होत आहेत ! – गुप्तचरांची माहिती

पाकिस्तानी सैन्याधिकारी चीनच्या सैन्यामध्ये भरती होत आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे.x Read more »

पाकमध्ये हिंदू तरुणाचे धर्मांतर करून अपहरण !

पाकच्या सिंध प्रांतातील तंदो अल्लायार या जिल्ह्यात नुकतेच चंदोर किट्ची उपाख्य चंदू या ३२ वर्षीय हिंदु तरुणाचे त्याचा शेजारी रहाणारा आझम काश्मिरी याने बलपूर्वक अपहरण करून धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे. याविषयी चंदू याने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. यामुळे तरुणाच्या वडिलांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. Read more »

फ्रान्समध्ये कट्टरतावादी कार्य करणार्‍या ६ मशिदींना सरकारने ठोकले टाळे !

 फ्रान्समध्ये ८९ मशिदींमध्ये कट्टरतावादी कार्य चालू असल्याच्या तक्रारीनंतर त्याविषयी चौकशी चालू करण्यात आली. यानंतर ६ मशिदींना सरकारकडून टाळे ठोकण्यात आले, तर उर्वरित मशिदींच्या संदर्भात चौकशी अद्याप चालू आहे. त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. Read more »

चीनकडून लडाख सीमेवर ५० सहस्र सैनिक तैनात !

चीनच्या सैन्याने लडाखच्या सीमेवरील दौलत बेग, ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आदी भागांमध्ये सैनिकी हालचाली वाढवल्या आहेत. येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने ५० सहस्रांहून अधिक सैनिक तैनात केले असून भारतीय चौक्यांच्या पुष्कळ जवळून ड्रोन उडवले जात आहेत, तसेच सीमेजवळ लढाऊ विमानांसाठी तळ उभारण्यात येत असून या तळांवर शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. Read more »

आसाममधील धर्मांधांच्या अतिक्रमणावर केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचा थयथयाट !

आसाममधील दरांग जिल्ह्यातील धौलपूर येथे धर्मांधांनी सरकारी भूमीवर केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलीस यांच्यावर सहस्रो धर्मांधांनी आक्रमण केले. धर्मांधांवर कारवाई केल्यामुळे पाकने थयथयाट केला आहे. Read more »

रोम (इटली) येथील चर्चचे ८६ लाख रुपये चोरून ‘समलैंगिक संबंधांची मेजवानी’ आयोजित करणारा पाद्री अटकेत !

रोम (इटली) येथील ४० वर्षीय पाद्री फ्रान्सेस्को स्पागनेसी याला चर्चचे ८६ लाख रुपये चोरल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या चोरलेल्या पैशांतून या पाद्य्राने स्वतःच्या घरी समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांची ‘लैंगिक संबंधांची मेजवानी’ (सेक्स पार्टी) आयोजित केली होती. Read more »

भारतात अन्य धर्मियांच्या तुलनेत मुसलमानांचा प्रजनन दर अधिक ! – प्यू रिसर्चचा अहवाल

भारतीय मुसलमानाचा प्रजनन दर अन्य धर्मियांच्या तुलनेत अधिक आहे. मुसलमानांमध्ये वर्ष १९९२ मध्ये प्रति महिला प्रजनन दर हा ४.४ इतका होता, तर वर्ष २०१५ मध्ये यामध्ये घट झाली असून तो २.६ इतका झाला आहे. तरीही भारतातील मोठ्या धार्मिक समूहामध्ये मुसलमानांचा प्रजनन दर सर्वाधिकच आहे. Read more »

पाकमध्ये मशिदीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या हिंदु कुटुंबाला धर्मांधांकडून मारहाण !

राम भील असे या कुटुंबाच्या प्रमुखाचे नाव आहे. ते आणि त्यांचे कुटुंबीय मशिदीजवळील शेतामध्ये काम करत होते. या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही Read more »

भारताच्या आगामी अण्विक क्षेपणास्त्र चाचणीवर चीनचा आक्षेप !

चीनची अनेक शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येणार असल्याने चीन अस्वस्थ झाला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव क्रमांक १ सहस्र १७२ नुसार दक्षिण आशिया खंडात शांतता, सुरक्षा आणि स्थिरता राखणे, हे सर्वच रोष्ट्रांचे दायित्व असून सर्व राष्ट्रे यासाठी प्रयत्न करतील, अशी आम्हाला आशा आहे. Read more »

(म्हणे) ‘सनातन संस्था ही आध्यात्मिक संघटना पुरोगाम्यांच्या हत्यांना उत्तरदायी ! – आनंद पटवर्धन, लघुपटनिर्माते

सनातन संस्था ही आध्यात्मिक संघटना पुरोगाम्यांच्या हत्यांना उत्तरदायी आहे, असा धादांत खोटा आरोप लघुपटनिर्माते आणि साम्यवादी आनंद पटवर्धन यांनी केला. १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​