कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता घर सोडले !
‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला विरोध करणार्या हिंदूंना ‘प्रेमाला धर्माचे बंधन नसते’, असे उपदेशाचे डोस पाजणारे आता शमा परवीनच्या कुटुंबियांना हा डोस का पाजत नाहीत ? -संपादक
बरेली (उत्तरप्रदेश) – बिहार राज्यातील औरंगाबाद येथील शमा परवीन आणि उत्तरप्रदेशमधील बलिया येथील शिवम वर्मा यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या विवाहाला शमाच्या कुटुंबियांचा विरोध होता. शेवटी विरोधाला न जुमानता ती शिवमकडे आली आणि त्यांनी हिंदु धर्मानुसार विवाह रचला. शमाने या वेळी घरवापसी करत ती ‘पूनम’ झाली. वर्षभरापूर्वी बिहारच्या बक्सरमध्ये एका विवाहाच्या वेळी दोघांची भेट झाली आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले. विरोधामुळे घर सोडून ती शिवमसमवेत बरेली येथे आली. येथील मध्यनाथ येथे असलेल्या अगस्त्य मुनी आश्रमाचे आचार्य पंडित शंखधर यांनी त्यांचा विवाह लावून दिला.
सनातन हिंदु धर्मावर माझी श्रद्धा आहे ! – पूनम उपाख्य शमा
पूनमने सांगितले की, मोगल आक्रमकांच्या दहशतीमुळे माझे पूर्वज इस्लामचे अनुयायी झाले होते; पण सनातन हिंदु धर्मावर माझी श्रद्धा आहे. मी हिंदु देवतांची पूजा करते. इस्लाम धर्मात महिलांना आदर नाही. तिहेरी तलाक आणि हलाला यांसारख्या वाईट प्रथा प्रचलित आहेत. मी स्वेच्छेने घरवापसी करत सनातन धर्म स्वीकारला आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात