Menu Close

हलाल अर्थव्यवस्था म्हणजे आधुनिक ‘जिझिया कर’ – श्री. रमेश शिंदे

ओझर (जिल्हा पुणे) येथील महाराष्ट्र मंदिर परिषदेच्या सत्रातील वक्त्यांचे उद्बोधक विचार

नेवासा येथील प्राचीन नारदमुनींचे मंदिर ‘वक्फ’कडून कह्यात घेण्याचा प्रयत्न ! – अधिवक्ता संदीप जायगुडे

अत्यंत प्राचीन असलेल्या नेवासा, नगर येथील श्री नारदमुनींच्या मंदिराच्या परिसरात ‘कबरी’ उभारून अतिक्रमण करून ते मंदिर कह्यात घेण्याचा मुसलमानांचा प्रयत्न आहे. आता त्याही पुढे जाऊन येथील मंदिराच्या संपूर्ण भूमीवर ‘वक्फ’ने दावा केला आहे. आमच्याकडे असलेल्या जुन्या काही पुराव्यांच्या आधारे या निर्णयाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात स्थगिती मिळवली आहे. सध्या येथे ‘जैसे थे स्थिती’ आहे. त्यामुळे हिंदूंनी यापुढील काळात जागृत राहून त्यांच्या मंदिरांवर इस्लामी अतिक्रमण होत नाही, याकडे सतत लक्ष ठेवले पाहिजे !

विकास करतांना मंदिराची मूळ रचना वाचवणे आवश्यक ! – विलास वहाणे, उपसंचालक, पुरातत्व विभाग

मंदिरांचा विकास करतांना मंदिराची मूळ रचना वाचवणे आवश्यक असते. मंदिरांची दुरुस्ती करतांना, जीर्णोद्धार करतांना मंदिराच्या बांधकाम शैलीचा अभ्यास करणेही आवश्यक आहे. मंदिरात ‘टाइल्स’ बसवल्यामुळे मूळ दगडापर्यंत हवा पोचत नसल्यामुळे काही वर्षांनंतर दगडांची झीज होते. सध्या मूर्तीवर वज्रलेप करण्याच्या नावाखाली रासायनिक घटक वापरले जात आहेत. ते अत्यंत चुकीचे आहे. मंदिरांचे संवर्धन करतांना मूळ मंदिर आणि देवतेची मूर्ती यांना कोणतीही इजा न पोचता ते काम व्हायला हवे. तरच मंदिरातील भगवंताचा वास टिकून रहातो.

हलाल अर्थव्यवस्था म्हणजे आधुनिक ‘जिझिया कर’ ! – श्री. रमेश शिंदे

श्री. रमेश शिंदे

कोट्यवधी रुपये देऊन हलाल प्रमाणपत्र विकत घेणार्‍या इस्रायलने हमास आक्रमणाला प्रत्युत्तर दिले म्हणून इस्लामी संघटनांनी इस्रायलच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास चालू केले. डुकराचे मांस हराम असले, तरी गायीचे मांस हलाल असल्याने उद्या हलाल उत्पादनांमध्ये गायीचे मांस वापरल्यास हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्यावर घाला घातला जाईल. यासाठी आतापासूनच मंदिरात येऊ घातलेला ‘हलाल जिहाद’ वेळीच हद्दपार करा ! अमेरिकेतील मंदिरांनी हलाल जिहादच्या विरोधात जागृती करण्याचे कार्य चालू केले आहे. आपणही आपल्या मंदिरांतून जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. उत्तरप्रदेशमध्ये हलालवर आलेली बंदी महाराष्ट्रातही त्वरित लागू व्हायला हवी ! मोगलांनी त्या काळी हिंदूंवर जिझिया कर लादला होता. आज मुसलमानांना हलाल विकण्यासाठी प्रमाणपत्र घेणारे आपल्याकडूनच त्याचे पैसे वसूल करत आहेत. आजची ही हलाल अर्थव्यवस्था म्हणजे हिंदूंकडून वसूल करण्यात येणारा आधुनिक जिझिया करच आहे !

सनातन धर्माला संपवण्याचे षड्यंत्र हा हिंदूंच्या वंशविच्छेदाचा कट !  – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

‘सनातन धर्म नष्ट व्हायला पाहिजे. सनातन धर्म एक रोगासारखा आहे’, अशी अनेक हिंदुद्वेषी वक्तव्ये केली जात आहेत. सनातन धर्म हा अनंत आहे आणि मंदिरे या धर्माचे, चैतन्याचे स्रोत आहेत. त्यामुळे आज सनातन धर्माला संपवण्याची भाषा होत असेल, तर यदा कदाचित् उद्या मंदिरांनाही संपवण्याचे भाष्य केले जाईल. देशभरातील पुरोगामी, शहरी नक्षलवादी आणि सनातन धर्मविरोधक चालवत असलेले सनातन धर्माला संपवण्याचे षड्यंत्र म्हणजे हिंदूंच्या ‘मास जेनोसाईड’चा (वंशविच्छेदचा) कटच आहे. अशांचा घटनात्मक विरोध करण्यासाठी त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन सनातन धर्मरक्षणाचे पाऊल टाकूया !

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *