Menu Close

(म्हणे) ‘दलित आणि मुसलमान एकत्र आले, तर ते संपूर्ण भारतात राज्य करू शकतात !’ – गुफरान नूर, जिल्हाध्यक्ष, अलीगड, एम्.आय.एम्.

  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची विधाने करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • कालीचरण महाराज यांच्यावर कारवाई करण्यात येते, तर अशा धर्मांध नेत्यांवर कारवाई का होत नाही ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • दिवास्वप्ने पहाणारे धर्मांध ! हिंदू संघटित नसल्यानेच आणि हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्याने धर्मांध अशा प्रकारची विधाने करण्यास धजावत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

डावीकडे एम्.आय.एम्.चे अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर

अलीगड (उत्तरप्रदेश) – नुकतीच हरिद्वार येथे धर्मसंसद झाली होती. त्यात एका विशेष धर्माला तोडण्याचे आवाहन करण्यात आले. हा धर्म कोणता होता ? हा मुसलमान धर्म होता. हिंदुत्वाची शाल पांघरून काही आतंकवादी मुसलमानांना तोडण्याची भाषा करत होते. आमच्या इस्लाममध्ये स्वतःला आणि दुसर्‍याला मारण्याची अनुमती नाही; मात्र जेव्हा आक्रमणकारी अत्याचाराची परिसीमा गाठतो, तेव्हा त्याला मारण्याची अनुमती आहे. जर दलित आणि मुसलमान एकत्र आले, तर ते संपूर्ण भारतात राज्य करू शकतात, असे विधान एम्.आय.एम्.चे अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी जमालपूर येथे केले. ते येथे एका कोपरा सभेमध्ये बोलत होते.

गुफरान नूर पुढे म्हणाले की, बाबर चुकीचा नव्हता. ज्याप्रमाणे आताची स्थिती आहे, अशा वेळी बाबरसारखेच शासन हवे. अल्लाच्या कृपेने तो दिवस लवकरच येईल आणि बाबरसारखे राज्य असेल. (हिंदूंनी हिंदु राष्ट्राचा उद्घोष केल्यावर आकाश-पाताळ एक करणारे नूर यांच्या या विधानाविषयी गप्प का ? – संपादक) एक किंवा दोन मुले जरी जन्माला घातली, तरी त्यांचे पालनपोषण अल्लाच करतो. (गुंडगिरी, तस्करी, चोरी, दरोडेखोरी आदी करून कुणी स्वतःचे पालनपोषण करत असेल, तर त्याला काय म्हणायचे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

(म्हणे) ‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर भारतावर राज्य कसे करणार ?’

गुफरान नूर यांनी डिसेंबर २०२१ मध्ये ‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार ? असदुद्दीन ओवैसीसाहेब (एम्.आय.एम्.चे अध्यक्ष) पंतप्रधान कसे होणार ? शौकत अलीसाहेब (एम्.आय.एम्.चे नेते) उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री कसे होणार ?’, असे प्रश्‍न एका चर्चेमध्ये विचारत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. (नूर यांनी गेल्या मासात अशी विधाने केली होती. त्यावरून त्यांची मानसिकता स्पष्ट झाली होती. आता त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना धार्मिक द्वेष पसरवल्यावरून कारागृहात टाकणेच योग्य ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *