Menu Close

(म्हणे) ‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार !’

एम्.आय.एम्.चे अलीगड (उत्तरप्रदेश) जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांचा प्रश्‍न

  • भारत हा राज्यघटनेनुसार धर्मनिरपेक्ष देश आहे आणि या राज्यघटनेचे पालन करण्याचे अन् तिचे रक्षण करण्याचे प्रत्येक राजकीय पक्ष बोलत असतो; मात्र एम्.आय.एम्. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्याच्या पक्षाची म्हणजे मुसलमानांची भारतात सत्ता यावी, असे स्वप्न पहात आहे, हे हिंदू कधी लक्षात घेणार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • मुसलमानांचा पक्ष असणार्‍या मुस्लिम लीगमुळे भारताची फाळणी झाली आणि आता एम्.आय.एम्.सारखा मुसलमानांचा दुसरा पक्ष भारताची सत्ता मिळवण्याचे स्वप्न पहात आहे. याचे कारण भारताचेच आता पाकिस्तान करण्याचा प्रयत्न असेल, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
डावीकडे असदुद्दीन ओवैसी आणि एम्.आय.एम्.चे अलीगड जिल्हाध्यक्ष गुफरान नूर

अलीगड (उत्तरप्रदेश) – ‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार ? असदुद्दीन ओवैसी साहेब पंतप्रधान कसे होणार ? शौकत अली साहेब उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री कसे होणार?’, असे प्रश्‍न एम्.आय.एम्.चे अलीगड जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी एका चर्चेमध्ये बोलत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर नूर बोलत होते.

हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर नूर यांनी याविषयी स्पष्टीकरण देतांना म्हटले की,  बलिदान करण्यात आमचे मोठे योगदान आहे; मात्र लोकसंख्येत आमचे प्रमाण अल्प आहे. (नूर कोणत्या बलिदानाविषयी बोलत आहेत, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे ! देशासाठी बलिदान केल्याची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नाही; मात्र गेली ३ दशके जिहादी आतंकवाद करण्यात मोठ्या संख्येने धर्मांध ठार होत आहेत, हे बलिदान ते म्हणत आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) ओवैसी साहेब पंतप्रधान व्हावेत, हे माझे वैयक्तिक मत आहे. ओवैसी साहेब पंतप्रधान कसे होतील, याविषयी आम्ही चर्चा करत होतो. त्यात अयोग्य काहीच नव्हते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *