देव नाही असे म्हणणे हास्यास्पद

अशिक्षिताने सूक्ष्म जंतू नाहीत, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी देव नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे !

सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवाचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘कर्त्याशिवाय, म्हणजे कोणीतरी करणारा असल्याशिवाय कोणतीही गोष्ट बनू शकत नाही, उदा. सुतार असल्याशिवाय आसंदी (खुर्ची) बनत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेला ‘देव नाहीच’, असे म्हणतात !’

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी संतांवर टीका करण्याचे कारण

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मला सर्व कळते’, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !’