म्हणे, हिंदु धर्म हा देवांविषयी विचित्र कल्पना असलेला रानटी धर्म !

टीका : ‘हिंदु हा रानटी आणि मागासलेला धर्म आहे. या धर्मात बैल, कासव, साप, झाडे आणि दगडधोेंडे यांचीही पूजा करतात.’ – धर्मांतरणाला प्रवृत्त करणारे खिस्ती

खंडन :

१. हिंदु धर्म मागासलेला किंवा रानटी नसून सहस्रावधी वर्षांपासून विश्वात अग्रेसर असल्याने पाश्चात्त्यांनीही त्याचे महत्त्व जाणलेले असणे

१ अ. विश्वातील अन्य खंडांतील लोक रानटी अवस्थेतील जीवन जगत असतांना भारतात अत्यंत प्रगत आणि उच्च ज्ञान देणारी विद्यापिठे अस्तित्वात असणे : ‘भारतात प्राचीन काळापासून पुष्कळ मोठी विद्यापिठे अस्तित्वात होती. त्यातील काही विद्यापिठे बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत टिकवून होती. त्यातून उच्च प्रतीचे शिक्षण घेऊन सहस्रो विद्यार्थी बाहेर पडत होते. अलीकडे ‘ऑक्स्फर्ड’ आणि ‘केंब्रिज’ आदी पाश्चिमात्त्य विद्यापिठांची नावे आपण ऐकतो. तेथील शिक्षणाची उच्च पातळी, त्यांचे अनुशासन आणि त्यांची प्रदीर्घ परंपरा याविषयींचे ज्ञान वाचून आपल्याला कौतुक वाटते; पण आपल्याही देशात एके काळी या पाश्चात्त्य विद्यापिठांपेक्षा पुढारलेली, उच्च ज्ञान देणारी विद्यापिठे होती. ज्या वेळेला विश्वातील अन्य खंडांतील अन्य पंथीय रानटी आणि मागासलेल्या अवस्थेतील जीवन जगत होते, त्या वेळी भरत खंडात तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, नागार्जुन, काशी, प्रतिष्ठान, उज्जयिनी, वल्लभी, कांची, अयोध्या ही विद्यापिठे प्रसिद्ध होती. या विद्यापिठांची महती भारतात येणाऱ्या पाश्चात्त्य प्रवाशांनीही वर्णिलेली आहे.

असे असतांना ‘हिंदु धर्म रानटी आणि मागासलेला आहे’, असे म्हणणे अत्यंत अयोग्य आहे. आजही भारताच्या उज्ज्वल संस्कृतीचे अनुकरण पाश्चात्त्य करत आहेत, हे पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होते.

१ अ १. सद्यस्थितीत जॉर्जटाऊन या खिस्ती विद्यापिठात हिंदु धर्माचे शिक्षण दिले जाणे : अमेरिकेतील प्रतिष्ठित खिस्ती शिक्षणसंस्था असलेल्या जॉर्जटाऊन विद्यापिठात वेदांचे शिक्षण दिले जात आहे. ‘या विद्यापिठात हिंदु धर्मातील चालीरिती, आजचा हिंदु धर्म, वेद, उपनिषदे, साधू, गुरु, योगी, सण-उत्सव, व्रते, पूजाविधी, भक्तीगीते, तीर्थक्षेत्रे इत्यादी विषयांवर शिक्षण दिले जाते. जॉर्जटाऊन विद्यापिठाने हिंदु धर्माविषयी अवलंबलेला मार्ग हे योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे’, असे अमेरिकेतील हिंदू नेते श्री. राजन झेद यांनी नेवाडा येथून प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

१ अ २. विदेशांत हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांविषयी वाढते आकर्षण ! : पाश्चात्त्य कुप्रथांचा उदोउदो करणारी भारतातील सध्याची युवा पिढी विदेशांत लोकप्रिय ठरत असलेल्या हिंदु संस्कृतीकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. विदेशांत अनुभवावयास येत असलेली हिंदु संस्कृतीविषयीची ही वस्तुस्थिती फारच बोलकी आहे. त्यातील निवडक उदाहरणे पुढे देत आहे.

अ. अमेरिकेच्या सिनेटचा (संसदेचा) आरंभ वेदमंत्रांनी केला जातो.

आ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे त्यांच्यासमवेत नेहमी हनुमानाची प्रतिमा ठेवतात.

इ. ‘हॉलिवूड’ची प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स हिंदु संस्कृतीकडे आकर्षित झाली असून तिने हिंदु धर्म स्वीकारला आहे.

ई. अनेक देशांत संस्कृत भाषेवर संशोधन चालू असून ती सर्वांत सोपी संगणकीय भाषा असल्याचेही संशोधकांनी सांगितले आहे.

उ. विदेशात संस्कृत भाषा शिकणाऱ्यांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.

ऊ. विदेशातील प्रार्थनास्थळे (चर्च) ओस पडत असून ती हिंदू मंदिरांच्या कह्यात दिली जात आहेत.

ए. अनेक पाश्चात्त्य लोेक हिंदु संस्कृतीनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत.

१ अ ३. अमेरिकेतील एका शिक्षणसंस्थेच्या अभ्यासक्रमात हिंदु देवतांची माहिती समाविष्ट केली जाणे : अमेरिकेत शिकागो येथे खिस्ताब्द १८७९ मध्ये स्थापन झालेल्या ‘आर्ट इन्स्टिट्यूट’ या शिक्षणसंस्थेने बालवाडीपासून बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात श्री गणपति, शंकर, पार्वती आदी हिंदु देवतांचे गुणविशेष, त्यांच्या मुद्रा, नृत्य, वाहने, आयुधे, सृष्टीकार्याचे संचालन, मूर्तीशिल्पे इत्यादी माहिती समाविष्ट केली आहे.

१ अ ४. वैदिक संस्कृतीने मांडलेले आध्यात्मिक सिद्धांत हे देशकालातीत आणि वौश्विक असणे ! : निखळ आध्यात्मिक सत्याचे अंतिम टोक म्हणता येईल, अशा हिंदूंच्या उच्च वैदिक परंपरा आणि संस्कृती आहे. आत्मा-परमात्मा यांच्या गूढ आध्यात्मिक ज्ञानाविषयी वैदिक संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांच्यामध्ये जशी सत्यता अन् खोली आढळते, तशी सहसा कुठेच आढळत नाही. वैदिक संस्कृतीने मांडलेले आध्यात्मिक सिद्धांत हे देशकालातीत असल्याने खऱ्या अर्थाने वौश्विक आहेत !’ – स्टिफन नॅप, अमेरिका (लेखक) (संदर्भ ग्रंथ : ‘क्राइम्स अगेन्स्ट इंडिया अ‍ॅन्ड द नीड टू प्रोटेक्ट इट्स अॉन्शियंट वेदिक ट्रॅडिशन’)’ (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, संस्कृतीरक्षण विशेषांक, १३ मे २०१२)

या सर्व गोष्टींवरून हेच स्पष्ट होते की, हिंदु धर्म मागासलेला किंवा रानटी नाही, तर तो सहस्रावधी वर्षांपूर्वीही विश्वात अग्रेसर होता आणि आजही त्याचे महत्त्व पाश्चात्त्यांना कळत असल्याने ते त्याचा अंगीकार करत आहेत. असे असतांना त्याला मागासलेला आणि रानटी म्हणणे हे अज्ञानमूलक आहे.

१ आ. प्राचीन भारतातील समृद्ध राज्यपद्धत ! : भारताची प्राचीन राज्यपद्धत त्या वेळी कशी समृद्ध होती, हे पुढील काही उदाहरणावरून स्पष्ट होते.

१ आ १. संपूर्ण पृथ्वीतलावर राज्य करणाऱ्या पृथु राजाने सुशिक्षित ब्राह्मणांना अविकसित मनुष्यसमूहाकडे पाठवून त्यांना सुशिक्षित करणे आणि संपूर्ण समाजाचाच कायापालट घडवणे : ‘भागवतामध्ये पृथु राजाच्या संदर्भातील माहिती आहे. पृथु संपूर्ण समुद्रवलयांकित पृथ्वीचा राजा होतो. त्याने भूमीचा इतका उत्कर्ष केला की, त्याच्या नावावरूनच ‘पृथ्वी’ असे नाव पडले. त्याने यज्ञाद्वारे सर्व लोकांना जीवन समजावून दिले. गावांची पुनर्बांधणी करून ‘लहान, मोठी गावे कशी असावीत ?, ऋषीमान्य अशी स्वतंत्र शिक्षणव्यवस्था कशी असावी ?’, यांविषयीचे सविस्तर नियोजन केले होते. अशिक्षित, असंस्कारी आणि अविकसित अशा माणसांच्या समूहाकडे सुशिक्षित ब्राह्मणांना पाठवून त्यांना सुशिक्षित केले. त्याने संपूर्ण समाजाचाच कायापालट केला. त्याने व्यक्ती परिवर्तनावर भर दिला. पृथू राजाच्या या अलौकिक कार्यामुळेच आज काही पाश्चात्त्य देश विकसित झाल्याप्रमाणे वाटतात.

आजच्या शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात मूलभूत परिवर्तन होत नाही. पृथू राजाने तत्कालीन परिस्थितीत ऋषींच्या सान्निध्यातील शिक्षणाचा पुरस्कार केला. तो आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या कार्यकालापर्यंत चालूच राहिला. तरीही या देशाला रानटी किंवा मागासलेला म्हणणे हे किती हास्यास्पद आहे, हे दिसून येते.’ (संदर्भ : व्यासविचार, भागवत, चतुर्थ स्कंध, पृष्ठ १२८-१३१)

१ इ. प्रत्येक जीव दुसऱ्या जिवासाठी उपकारकच असणे : हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे चराचरात ईश्वर आहे. हिंदूंच्या या धारणेमुळेच ते बैल, कासव, साप, झाडे आणि दगडधोंडे यांचीही पूजा करतात. या सगळ्या गोष्टी माणसासाठी उपकारक अशा आहेत. प्रत्येक जीव कोणत्याही स्वरूपात असला, तरी तो दुसऱ्या जिवासाठी उपकारकच असतो. जसे ‘जीवो जीवस्य जीवनम् ।’, म्हणजे ‘प्रत्येक जीव दुसऱ्या जिवाच्या साहाय्यानेच जगत असतो.’
(याविषयीची सविस्तर माहिती ‘१ उ ४. आजच्या समाजाने भगवंताच्या सृष्टीच्या नियोजनात हस्तक्षेप करणे, याउलट भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीविषयी कृतज्ञता बाळगणारा प्राचीन भारतीय समाज सुसंपन्न असणे’, या सूत्रात दिली आहे.)

१ इ १. कोठे चराचरातील ईश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणारा व्यापक हिंदु धर्म आणि कोठे योग्य आचरणाची शिकवण न देणारे अन् मानवासहित प्राण्यांचीही मनमानी हत्या करायला प्रवृत्त करणारे अन्य रानटी पंथ ! : भारतीय संस्कृती कृषीप्रधान आणि धार्मिक आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनासाठी उपयोगी पडणारे बैल, कासव, साप या सजिवांसह झाडे आणि दगडधोंडे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करतात. जीवनासाठी हिरे-मोत्यांपेक्षाही दगडधोंडेच अधिक उपकारक आहेत. कोणत्याही धातूचे विघटन करत गेल्यास, म्हणजेच प्लॅटिनमसारख्या सर्वांत महाग अशा धातूचेही विघटन केले, तरी शेवटच्या सूक्ष्म कणातून धन आणि ऋण प्रभारित कण, म्हणजेच न्यूट्रॉन अन् प्रोटॉन रहातात आणि त्यातून अमोघ शक्ती प्रसारित होत असल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ असा की, प्रत्येक पदार्थाचा शेवट चैतन्यातच होतो. त्यामुळे बैल, कासव, झाडे हे जरी निरनिराळ्या स्वरूपात दिसत असले, तरी ते सर्व चैतन्याच्या आधारे चालत असतात. त्यामुळे या सर्वांची पूजा, म्हणजेच त्या चैतन्याची पूजा असते, हे लक्षात घ्यावे.

अन्य पंथांमध्ये सहजीवनासाठी पूरक असणाऱ्या निर्जिवांविषयी सोडाच; पण सजीव मानवाविषयीही कृतज्ञता बाळगली जात नाही, त्याला स्वधर्मात खेचण्यासाठी रक्तपात फसवणूक आदी मार्ग अवलंबले जातात. यावरून हिंदु धर्मापेक्षा इतर पंथच कसे रानटी आणि मागास आहेत, ते लक्षात येते.’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Leave a Comment