श्री सरस्वतीदेवीची विटंबना थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

शिक्षण विभागाने ही मूर्ती दुसर्‍या मजल्यावरील मोकळ्या जागेत दर्शनी भागात ठेवली; मात्र गत अनेक वर्षांपासून ही मूर्ती धुळखात पडून आहे. Read more »

भगवान अय्यप्पा स्वामी यांचा अवमान करणारे नास्तिकतावादी बैरी नरेश यांच्या विरोधात भाग्यनगरमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !

भारत नास्तिक संघाचे तेलंगाणा राज्य अध्यक्ष बैरी नरेश यांनी १९ डिसेंबरला कोडंगल जिल्ह्यातील रावुल पल्ली गावामधील एका सभेमध्ये भगवान अय्यप्पा स्वामी यांच्या जन्माविषयी अवमानकारक विधान केले. Read more »

तेलंगाणा येथे भगवान अय्यप्पाविषयी अश्‍लाघ्य वक्तव्ये करणार्‍या नास्तिकतावादी नेत्याला भक्तांकडून चोप !

भगवान अय्यप्पाविषयी अश्‍लाघ्य वक्तव्ये करणार्‍या ‘भारत नास्तिक संघा’चे अध्यक्ष बैरी नरेश यांच्यावर कडक कारवाईची मागणी करत अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी तेलंगाणा राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली. Read more »

चित्रपटावर स्थगिती आणण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय तो प्रदर्शित केलेल्या दिनांकानंतर करणार सुनावणी !

अभिनेते अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘थँक गॉड’ या आगामी चित्रपटातून हिंदूंच्या ‘चित्रगुप्त’ या देवतेचे विडंबन करण्यात आल्याने त्याच्या प्रदर्शनावर स्थगिती आणणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. Read more »

(म्हणे) ‘गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘जिहाद’ शिकवला !’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी ‘जिहाद केवळ इस्लाममध्येच नाही, तर श्रीमद्भगवद्गीता आणि ख्रिस्ती धर्मातही आहे’, असे संतापजनक विधान केले आहे. गीतेच्या एका भागामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवल्याचे ते म्हणाले. Read more »

देवतांचे विडंबन करून कोट्यवधी रुपये उकळू पहाणार्‍या चित्रपटांवर आजीवन बंदी आणा – राम कदम, आमदार, भाजप

चित्रपटातून देवीदेवतांचे विडंबन करून जे कोट्यवधी रुपये उकळू पहात आहेत, अशा चित्रपटांवर आजीवन बंदी आणण्याची आवश्यकता आहे, असे सडेतोड प्रतिपादन भाजपचे आमदार श्री. राम कदम यांनी केले. Read more »

प्रभु श्रीरामचंद्र यांचा विज्ञापनातून अवमान करणार्‍या ‘मंगलम् ऑर्गेनिक्स’ या कापूर बनवणार्‍या आस्थापनाच्या मालकाची क्षमायाचना !

भु श्रीरामचंद्र यांचा विज्ञापनातून अवमान करणार्‍या ‘मंगलम् ऑर्गेनिक्स’ या कापूर बनवणार्‍या आस्थापनाचे मालक पंकज दुधोजवाला यांनी समस्त रामभक्त आणि भाविक यांची सार्वजनिक क्षमा (माफी) मागितली आहे. Read more »

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना कायदेशीर नोटीस

‘आदिपुरुष’ चित्रपटातून रामायणाचे इस्लामीकरण केले आहे, असा आरोप ब्राह्मण महासभेने केला आहे. याविषयी आठवडाभराच्या आत क्षमा मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. Read more »

‘थँक गॉड’ चित्रपटाच्या विरोधात जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे पोलिसात गुन्हा नोंद !

‘थँक गॉड’ या चित्रपटाच्या प्रसारित झालेल्या ‘ट्रेलर’मध्ये हिंदूंची देवता चित्रगुप्त यांचे विडंबन करण्यात आल्याने हिमांशू श्रीवास्तव नावाच्या एका धर्मप्रेमी हिंदूने पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे. Read more »

बांगलादेशात आतंकवाद्यांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड

बांगलादेशातील कुष्टिया जिल्ह्यामधील लाहिनी कर्माकर गावात आतंकवाद्यांनी नुकतीच दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केली. नवरात्रोत्सवातील दुर्गापूजेच्या पूर्वी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवर झालेले हे तिसरे आक्रमण आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​