पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या भिंतीवर लिहिण्यात आले आहेत उपनिषदातील संस्कृत श्‍लोक !

सामाजिक माध्यमांतून एक छायाचित्र प्रसारित होत आहे. यामध्ये पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या बाहेरील भिंतीवर उपनिषदामधील संस्कृत भाषेतील श्‍लोक लिहिण्यात आल्याचे दिसत आहे. Read more »

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे शाहूवाडी तहसीलदार यांना निवेदन

जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडावर चालू असलेले अतिक्रमण पहाता स्थानिक प्रशासन, राज्यशासन, पुरातत्व खाते आदी सर्वजण यांकडे डोळेझाक करत आहे. Read more »

‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ या तेलुगु चित्रपटातून आदी शंकराचार्य लिखित ‘भज गोविन्दम् भज गोविन्दम्’ स्तोत्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे विडंबन !

‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ (आता नाहीतर केव्हा ?) या तेलुगु चित्रपटाचा ‘ट्रेलर’ (चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ) प्रसारित झाला. त्यातील एका अश्लील दृश्यामध्ये आदि शंकराचार्य लिखित ‘भज गोविन्दम् भज गोविन्दम्’ या पवित्र संस्कृत स्तोत्राचा पार्श्वसंगीत म्हणून वापर करण्यात आला होता, तसेच एका संभाषणातून भगवान श्रीकृष्णाचेही विडंबन करण्यात आले होते. या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संघटितपणे प्रयत्न केले. Read more »

पाकमध्ये धर्मांधांकडून गणपति मंदिराची तोडफोड !

 पाकच्या पंजाब प्रांतातील भोंग शहरामध्ये धर्मांधांनी गणपति मंदिराची तोडफोड केली. मंदिरातील श्री गणेश, शिव आणि पार्वती यांच्या मूर्ती, तसेच झुंबर अन् सजावटीचे काचेचे साहित्य या धर्मांधांकडून फोडण्यात आले. Read more »

मदरशामधील अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी धर्मांध शिक्षकाला ११ वर्षांचा कारावास !

तुमकुरू जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने मदरशातील शिक्षकाला ११ वर्षे कारावास आणि ३० सहस्र रुपये दंड ठोठावला आहे. यासमवेतच न्यायालयाने ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा’ला पीडित मुलाला ५ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा आदेशही दिला आहे. Read more »

मुसलमान तरुणांनी मुसलमान समाजामध्येच विवाह करावा ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मुसलमान तरुणांना मुसलमान समाजामध्येच विवाह करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात बोर्डाचे सरचिटणीस मौलाना (इस्लामी अभ्यासक ) खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून मुसलमान तरुण, त्यांचे शिक्षण, पालक यांना हे आवाहन केले आहे. देशातील लव्ह जिहादच्या घटनांवरून बोर्डाने हे आवाहन केल्याचे सांगितले जात आहे. Read more »

‘भारत के वामपंथी चीन के गुलाम ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

देशभक्तीपेक्षा कोणतीही विचारधारा मोठी असू शकत नाही; मात्र शत्रूराष्ट्र चीनशी मित्रता ठेवणार्‍या डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना फक्त स्वत:ची विचारधारा महत्त्वाची वाटते. त्यांना भारताशी, तसेच भारतीय संस्कृतीशी काही देणे-घेणे नाही. एका बाजूला आपले सैनिक सीमेवर चीनविरोधात लढत आहेत, तर दुसर्‍या बाजूला ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चीनी दुतावासाने नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशातील प्रमुख साम्यवादी नेत्यांनी उपस्थित राहून चीन, तसेच चीनच्या धोरणांची प्रशंसा केली. Read more »

८१ हिंदु कुटुंबांची पलायन करण्याची चेतावणी !

मुरादाबाद  येथील लाजपतनगरच्या शिवविहार संकुलामध्ये धर्मांध करत असलेल्या मानसिक छळामुळे ८१ हिंदु कुटुंबांनी स्वतःच्या घरावर ‘घरे विकणे आहे’, असा फलक लावला आहे. धर्मांधांनी या संकुलाच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांच्या परिसरातील हिंदूंची घरे विकत घेतली आहेत. त्यासाठी त्यांनी बाजारमूल्यापेक्षा अधिक रक्कम दिली आहे. Read more »

अनुसूचित जाती आणि जमातींतील व्यक्तीने धर्मांतर केल्यास तिला त्यांच्यासाठीच्या योजनांचा लाभ मिळणार नाही ! – केंद्रशासन

केंद्रशासनाने म्हटले की, सरकारी योजनांचा उद्देश अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या कल्याण आणि विकास करणे, हा आहे. त्याचा लाभ धर्मांतरितांना देण्यात येऊ शकत नाही. Read more »

अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद गांधी यांचे निधन !

अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद पुखराज गांधी (वय ७१ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने ३ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. ते राजस्थान दौर्‍यावर असतांना जयपूर येथे ही घटना घडली. ५० वर्षांहून अधिक काळ तन, मन आणि धन यांचा त्याग करून अविरतपणे हिंदूसंघटनाचे कार्य करणार्‍या अधिवक्ता गोविंद गांधी यांच्या निधनामुळे सातारा जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये पितृछत्र हरपल्याची भावना निर्माण झाली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​