चर्चने केलेल्या अमानवी छळात होरपळलेली नन ल्युसी कलापुरा आणि न्यायनिवाडा !

‘ल्युसी कलापुरा ही केरळच्या एका चर्चमध्ये वयाच्या १७ व्या वर्षांपासून नन म्हणून कार्यरत होती. तिथे तिने शिक्षिका म्हणून २४ वर्षे ‘गणित’ विषय शिकवला; पण चर्चने तिला नुकतेच काढले. या वेळी चर्चने अतिशय क्षुल्लक कारण देत सांगितले की, ल्युसी चारचाकी वाहन चालवायला शिकली. Read more »

येत्या ३ वर्षांत भारत हिंदु राष्ट्र होणार !

वर्तमानातील राजकीय परिस्थिती भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या बाजूने आहे. राहुल गांधी हेसुद्धा आता स्वतःला ‘हिंदू’ असल्याचे सांगू लागले आहेत. त्यांनी स्वतःला ‘जानवे घातलेला ब्राह्मण’ असल्याचे घोषित केले आहे. यामुळेच येत्या ३ वर्षांत भारत हिंदु राष्ट्र होईल, असे प्रतिपादन ओडिशातील पुरी येथील गोवर्धन पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी आगरा जिल्ह्यातील नगला बिंदू नावाच्या गावात आले असता केले. Read more »

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी हिंदूंचा ध्वज काढून फेकल्याने तणाव !

धर्मांधांनी कवर्धा येथील कर्मादेवी चौकातील हिंदूंचा भगवा ध्वज काढून फेकला आणि त्या ठिकाणी त्यांचा हिरवा ध्वज लावला. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. या वेळी धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात झालेल्या दगडफेकीत अनेक जण घायाळ झाले. Read more »

कोलकाता उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही तृणमूल काँग्रेस सरकारकडून पीडित हिंदूंना हानीभरपाई देण्यास टाळाटाळ !

बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारने पीडितांना अजूनपर्यंत हानीभरपाई दिलेली नाही. त्यामुळे कोलकाता उच्च न्यायालयाने अप्रसन्नता दर्शवली असून बंगाल सरकारला फटकारले आहे. Read more »

‘सीएट टायर’च्या विज्ञापनातून अभिनेते आमीर खान यांचा रस्त्यांवर फटाके न फोडण्याचा संदेश !

अभिनेते आमीर खान यांनी केलेले ‘सीएट टायर’चे एक विज्ञापन प्रसारित होत आहे. यात आमीर खान एका मुलाला म्हणतात, ‘अनार, सुतळी बाँब आणि भुईचक्र हे सर्व फटाके आपला संघ जिंकला, तर नक्की फोडणार आहोत; परंतु ते रस्त्यांवर नाही. कारण रस्ते हे फटाके फोडण्यासाठी नाही, तर गाड्या चालवण्यासाठी आहेत. Read more »

झारखंडमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांना नमाज पठणासाठी बिराजपूर विद्यालयाला सुट्टी !

जिल्ह्यामध्ये १ ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारी कोणतीही शासकीय संमती न घेता बिराजपूर विद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांना नमाज पठणासाठी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला. याप्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी अभय शंकर यांनी विद्यालय व्यवस्थापन संमितीला नोटीस पाठवली आहे. Read more »

जळगाव येथे शेकडो धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत एक नागरिक घायाळ झाला असून तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. Read more »

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील प्रसिद्ध बरघशिखा भवानी मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील मट्टन भागामधील बरघशिखा भवानी मंदिरावर अज्ञातांनी आक्रमण करून तोडफोड केल्याची घटना २ ऑक्टोबरला दुपारी घडली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करण्यात आली आहे. Read more »

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे धार्मिक स्थळांपासून १०० मीटरच्या परिसरामध्ये मांसविक्रीवर बंदी !

शहरामध्ये धार्मिक स्थळांपासून १०० मीटरच्या परिसरात मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मांसाहारी पदार्थांची विक्री करणारी दुकाने आणि उपाहारगृहे यांच्यावर प्रतिबंध घालण्यात येत असल्याची घोषणा महापौर संयुक्ता भाटिया यांनी केली आहे. Read more »

आसाममध्ये धर्मांधांनी केलेल्या हिंदूंच्या हत्यांचे समर्थन करणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध आमदाराला अटक !

गेल्या आठवड्यात दरांग जिल्ह्यात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांनी आक्रमण केले होते. या पार्श्वभूमीवर ‘वर्ष १९८३ मध्ये दरांग जिल्ह्यात धर्मांधांनी ८ बोडोंची (हिंदु आदिवासींमधील एक जमातीतील लोकांची) केलेली हत्या योग्य होती’, असे हिंदुद्वेषी विधान काँग्रेसचे धर्मांध आमदार शर्मन अली अहमद यांनी केले. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​