बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून गरोदर हिंदु महिलेची आणि तिच्या आईची कोयत्याने वार करून हत्या

बांगलादेशच्या नारायणगंज शहरातील दलपोट्टी क्षेत्रात झोबायर नावाच्या धर्मांधाने एका हिंदु कुटुंबाच्या घरात घुसून गरोदर महिलेची आणि तिच्या आईची कोयत्याने वार करून हत्या केली. झोबायर याने भरदिवसा इमारतीतील पीडितांच्या घराचा दरवाजा ठोठावला. घराचे दार उघडताच त्याने घरात घुसून रितू चक्रवर्ती (वय २२ वर्षे) या गरोदर महिलेची आणि तिची आई रुमा चकवर्ती (वय ४६ वर्षे) यांच्यावर कोयत्याने वार केले. Read more »

बांगलादेशमधील फरीदपूर येथे मंदिरातील श्री महादेवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

बांगलादेशातील फरीदपूर येथील डिकनोगोर गावात ६ मार्च या दिवशी अज्ञातांनी एका हिंदु मंदिरातील श्री महादेवाच्या मूर्तीची तोडफोड केली. हे मंदिर डिकनोगोर येथील रहिवासी गोविंदा साहा यांच्या घराच्या परिसरात आहे . Read more »

आमच्या मागण्या मान्य झाल्या, तरच युक्रेनवरील सैनिकी कारवाई थांबवू ! – पुतिन

आमच्या मागण्या मान्य झाल्या, तरच युक्रेनवरील सैनिकी कारवाई थांबवू, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सांगितले. रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी युक्रेनवर आक्रमण चालू केले होते. Read more »

रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना खारकीवमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी ६ घंटे आक्रमण थांबवले !

रशियाकडून मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यात येत असतांना तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रशियाने ६ घंटे युद्ध रोखले होते. Read more »

कॅनडामध्ये ‘स्वस्तिक’वर नाही, तर ‘नाझी हुक्ड क्रॉस’वर बंदी येणार !

कॅनडामध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या खासगी विधेयकामध्ये आता पालट करण्यात येणार आहे. या विधेयकामध्ये ‘स्वस्तिक’ ऐवजी ‘नाझी हुक्ड क्रॉस’ या शब्दाचा वापर करण्यात येणार आहे. Read more »

युक्रेनच्या खरसॉन शहरावर रशियाचे नियंत्रण !

रशियाच्या सैन्याने आक्रमणानंतर दक्षिण युक्रेनमधील खरसॉन या शहरावर नियंत्रण मिळवले आहे; मात्र स्थानिक अधिकार्‍यांकडून याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली नाही. Read more »

तिसरे महायुद्ध झाले, तर अणूबाँबचा वापर होईल ! – रशिया

युक्रेनला अण्वस्त्रे मिळाली, तर ती रशियासाठी फार धोकादायक ठरू शकतात. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्‍चात्त्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांनी अण्वस्त्रे डागणार्‍या दलास सिद्ध रहाण्याचा आदेश दिलेला आहे. Read more »

रशियाकडून युक्रेनच्या सैन्यतळावर झालेल्या आक्रमणात ७० सैनिक ठार

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या ६ व्या दिवशी रशियाने युक्रेनच्या ओख्तियार्क शहरातील सैन्यतळावर मोठे आक्रमण केले. यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक ठार झाले आहेत. Read more »

बांगलादेशातील वैद्यकीय महाविद्यालयात सर्व धर्माच्या विद्यार्थिनींसाठी हिजाब अनिवार्य !

बांगलादेशातील जेस्सोर येथील ‘अद्-दीन सकीना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल’ने आता तेथे शिकणार्‍या सर्व धर्माच्या विद्यार्थिंनींना हिजाब घालणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता मुसलमानेतर विद्यार्थिनींनाही हिजाब घालावा लागणार आहे. Read more »

खारकीवमध्ये रशियाच्या आक्रमणात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

भारताच्या नवीन शेखरप्पा या २१ वर्षीय विद्यार्थ्याचा रशियाच्या हवाई आक्रमणात मृत्यू झाला, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुबाच्या संपर्कात आहे. नवीन हा कर्नाटकातील चलागेरी येथील रहिसावी आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​