Menu Close

गुजरातमध्ये मदरशांचे सर्वेक्षण करणार्‍या पथकातील एका शिक्षकावर धर्मांधांकडून आक्रमण

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! -संपादक 

कर्णावती (गुजरात) – गुजरात सरकारच्या आदेशानंतर १८ मेपासून राज्यात  मदरशांचे सर्वेक्षण चालू झाले आहे. कर्णावती येथील दरियापूरमधील सुलतान मोहल्ल्यात एका मदरशाच्या सर्वेक्षणाच्या वेळी सर्वेक्षण पथकातील आचार्य संदीप पटेल या कर्मचार्‍यावर १० जणांच्या टोळीने आक्रमण केले. पटेल हे सरकारी शाळेत शिक्षक आहेत. यानंतर तेथे १०० हून अधिक लोकांचा जमाव गोळा झाला आणि त्यांनीही पटेल यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

१. ‘राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगा’च्या (‘एन्.सी.पी.सी.आर्.’च्या) आदेशानंतर राज्यातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण चालू करण्यात आले आहे. याअंतर्गत मदरसे आणि त्यांत शिकणार्‍या मुसलमानेतर मुलांचा निधी, यांविषयी माहिती गोळा केली जात आहे.

२. सध्या संपूर्ण गुजरातमध्ये १ सहस्र २०० मदरसे आहेत, त्यांपैकी कर्णावती शहरात १७५ मदरसे आणि कर्णावतीच्या ग्रामीण भागांत ३० मदरसे आहेत. त्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर अहवाल शिक्षण विभागाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर तो अहवाल एन्.सी.पी.सी.आर्.कडे पाठवला जाईल. सर्वेक्षणासाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढून सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकार्‍यांकडे काम सोपवले असून त्यात एकूण ११ प्रकरणांची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *