Menu Close

एमएसआरटीसी (MSRTC)चा अधिकृत थांबा असलेल्या हॉटेलमध्ये अस्वच्छता व निकृष्ट जेवण : सुराज्य अभियानाने उठवला आवाज

सुराज्य अभियानाच्या वतीने स्वच्छतेच्या निकृष्ट स्तराविरोधात तत्काळ कारवाईची मागणी

अहमदनगर – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) च्या अधिकृत थांब्याच्या स्वच्छतेबाबत सुराज्य अभियानाने चिंता व्यक्त केली आहे. MSRTC प्रशासनाला तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुणे मार्गावर प्रवास करणारे प्रवासी हॉटेल विराज गार्डनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या निकृष्ट गुणवत्तेची व तेथील अस्वच्छतेची सातत्याने तक्रार करत आहेत.

MSRTC द्वारे अधिकृत असूनही, हॉटेल विराज गार्डनमधील स्वच्छतेच्या स्तराविषयीच्या तक्रारी वाढत आहेत. निकृष्ट जेवणामुळे प्रवाशांच्या आरोग्याला आणि सुरक्षेला धोका पोहोचतो. याविषयी विविध वेबसाइटवर देखील खराब मानांकन (रेटिंग) आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि MSRTC अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

खालील ठळक मुद्दयांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी सुराज्य अभियान करते आहे…

तपासणी आणि दंड : हॉटेल विराज गार्डन आणि इतर MSRTC अधिकृत हॉटेल्समध्ये स्वच्छतेची पडताळणी करण्यासाठी चौकशी करावी. जर चूक सिद्ध झाली, तर त्यांचा ‘अधिकृत थांबा’ असलेला परवाना रद्द करावा.

गुणवत्ता नियंत्रण उपाय : MSRTC बस मार्गांवर जेवण पुरविणारे सर्व अधिकृत हॉटेल आणि विक्रेत्यांसाठी कठोर गुणवत्ता नियंत्रण उपाय लागू करावेत. यामध्ये नियमित तपासणी, स्वच्छता चाचणी आणि मान्यता तपासणीचा समावेश असावा.

पारदर्शी तक्रार व्यवस्था: प्रवाशांना MSRTC थांब्यांवर जेवणाच्या गुणवत्तेबाबत तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप / मेसेज / हेल्पलाइन नंबर वापरण्यासाठी पारदर्शी तक्रार व्यवस्था स्थापित करावी. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून त्वरित हस्तक्षेप आणि सुधारणात्मक कारवाई केली जावी.

जनजागृती मोहीम: अन्न सुरक्षा मानकांबद्दल प्रवाशांना त्यांच्या अधिकारांबाबत शिक्षित करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी. निकृष्ट दर्जाच्या जेवणाची कोणतीही उदाहरणे कशी ओळखायची आणि कशी रिपोर्ट करायची, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करावीत.

सुराज्य अभियान MSRTC प्रशासनाला ही समस्या तत्काळ आणि गांभीर्याने हाताळण्याची विनंती करते. प्रवाशांचे आरोग्य आणि कल्याण हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असावे. परिस्थिती सुधारण्यासाठी आणि दुर्लक्ष केल्याने होणाऱ्या संभाव्य घटना रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलली जावीत.

हे फक्त एका राज्याचे उदाहरण आहे. तुमच्या राज्यात अशाच चूका आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि आम्हालाही कळवा (आमच्या X हँडल @SurajyaCampaign द्वारे). संघटितपणे, आपण या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करू शकतो !

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *