Menu Close

अहिल्यानगर जिल्ह्यातील भानस हिवरे गावात हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

राममंदिराच्या समवेत रामराज्याकडे म्हणजेच हिंदु राष्ट्राकडे जाण्याचा संकल्प करूया – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सद्गुरु नंदकुमार जाधव आणि प्रतीक्षा कोरगावकर

अहिल्यानगर (महाराष्ट्र) – २२ जानेवारीला राममंदिराची स्थापना झाली. आता आपण सर्वांनी रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील होऊया, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात भानस हिवरे या गावात नुकत्याच झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये बोलत होते. सद्गुरु नंदकुमार जाधव पुढे म्हणाले की, आता घराघरातील हिंदूंनी एकमेकांना भेटल्यावर ‘जय श्रीराम’ म्हणूया, तसेच वाढदिवस धर्मशास्त्राप्रमाणे औक्षण करून करूया.

सभेला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

घराघरात शौर्य निर्माण झाले, तर रामराज्याला वेळ लागणार नाही ! – प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती

प्रतीक्षा कोरगावकर

या वेळेस उपस्थितांना मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीच्या प्रतीक्षा कोरगावकर म्हणाल्या की, मुली आणि महिला यांवर होणारे आघात रोखायचे असतील, तर प्रत्येकीत शौर्य जागृत होण्याची आवश्यकता आहे. घराघरांतून शक्ती आणि भक्ती या दोन्हींची उपासना करायला हवी.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची यशोगाथा श्री. रामेश्वर भूकन यांनी या वेळेस सांगितली. कु. श्रुती शिरसाट यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. स्थानिक ग्रामस्थ श्री. भगवान आरले यांनी केलेल्या शंखनादाने सभेचा आरंभ झाला. गावातील युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या सभेला ९०० हून अधिक उपस्थिती होती

क्षणचित्रे

१. सभेला महिलांची उल्लेखनीय उपस्थिती होती. महिलांनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.

२. सभास्थळी प्रभु श्रीरामांच्या ८ फुटी मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

३. श्री रामराज्याच्या प्रतिज्ञेनी सभेची सांगता झाली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *