Menu Close

प्रतापगडनंतर आता मलंगगडही अतिक्रमणमुक्त करणार – एकनाथ शिंदे

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेची सांगता !

हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर गोतस्करी, धर्मांधांची अतिक्रमणे आदी सार्‍याच समस्या संपतील ! -संपादक 

उपस्थित धारकर्‍यांना अभिवादन करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा (महाराष्ट्र) – छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून धारकर्‍यांनी चालत ही मोहीम पूर्ण केली. मीही अनेक गडकोटांवर गेलो आहे. मलंगगडावरही मी जातो. आता प्रतापगडनंतर मलंगगडाचाही अतिक्रमणमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्रीरत्नेश्वर (श्रीरायरेश्वर) ते श्रीप्रतापगड मार्गे श्रीमहाबळेश्वर, अशी गडकोट मोहीम पार पडली. या मोहिमेची सांगता प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या पार या गावी झाली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित राहून धारकर्‍यांना मार्गदर्शन केले. या वेळी पू. संभाजीराव भिडेगुरुजी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार नितेश राणे, महेश लांडगे, मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख आदी मान्यवर आणि सहस्रो धारकरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, श्रीरायरेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतल्यामुळे या मंदिराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपला जन्म झाला, हे आपले भाग्य आहे. छत्रपतींचा दैदीप्यमान वारसा पुढच्या पिढीला कळावा, यासाठी अशा गडकोट मोहिमा महत्त्वाच्या आहेत. गडकोटांसह, जुनी मंदिरे यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र अन् राज्य सरकार प्राधान्य देत आहे. प्रतापगडच्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. त्यांपैकी १३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दुर्गराज रायगड येथे शिवछत्रपतींचे सुवर्ण सिंहासन निर्माण करण्याचा संकल्प पू. भिडेगुरुजींनी केला आहे. तो आपण सर्वांनी मिळून पूर्ण करायचा आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *