Menu Close

पनवेल (जिल्हा रायगड) रेल्वेस्थानक परिसरात भगवे ध्वज लावण्यास धर्मांधांचा तीव्र विरोध !

  • दंगल माजवण्याचा प्रयत्न

  • त्वेषपूर्ण घोषणा दिल्या

  • पनवेल शहर आणि परिसर येथे धर्मांधांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ वेळेत जागे न झाल्यास उद्या याही पुढचे पाऊल धर्मांध उचलण्यास मागे-पुढे पहाणार नाहीत कशावरून ?
  • बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतातच हिंदू भगवा ध्वज लावू शकत नाहीत, याहून दुसरे दुर्दैव कुठले ? यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्या ! -संपादक 

पनवेल (महाराष्ट्र) – येथील रेल्वेस्थानकाच्या बाहेरील भागात भगवे झेंडे लावण्यास धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्याचा व्हिडिओ २१ जानेवारी या दिवशी सर्वत्र प्रसारित झाला. या वेळी धर्मांध मुसलमान ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) आणि ‘नारा ए तकबीर’च्या  (‘अल्लापेक्षा मोठे कुणी नाही’च्या) घोषणाही मोठमोठ्याने अन् त्वेषाने देत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्या वेळी तेथे उपस्थित असलेले पोलीस मात्र शिटी वाजवणे आणि त्यांच्याकडील काठीने जमावाला पांगवणे यापलीकडे काहीही करत नव्हते. या वेळी तेथे साधारण ७-८ पोलीस उपस्थित असल्याचे दिसते. या वेळी एका हिंदूला धर्मांधाने विनाकारण टपली मारल्याचा आणि एकाचा शर्ट ओढल्याचेही दिसून येत आहे.

यानंतर हिंदु धर्मीय पराग बालड यांच्यासह माजी नगरसेवक मुकीद काझी आणि पनवेल येथील जामा मशिदीशी संबंधित एक अशा तिघांनी मिळून एक व्हिडिओ प्रसारित केला. त्यात म्हटले आहे, ‘वरीलप्रकारे प्रसारित होणारा व्हिडिओ म्हणजे एक अफवा आहे. आम्ही पिढ्यान्पिढ्या एकत्र रहात आहोत. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. जे चालू आहे, ते खोटे आहे. रिक्शावाल्यांचे भाड्यावरून भांडण झाले होते, तो प्रकार या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.’ (पहिल्या व्हिडिओमध्ये भगवे ध्वज लावण्यासाठी हिंदु तरुण आल्याचे आणि त्यांना विरोध होत असल्याचे स्पष्ट दिसत असतांना रिक्शावाल्यांचा तेथे संबंध जोडला जाणे ही सारवासारव असल्याचे कुणाला वाटले, तर चूक ते काय ? – संपादक)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *