Menu Close

रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत अधिकचे बसभाडे घेणार्‍या १८ खासगी बसगाड्यांवर कारवाई !

जनतेच्या समस्यांविषयी संवेदनशीलता दाखवून खासगी बसमालकांवर कारवाई करणार्‍या परिवहन विभागाचे अभिनंदन !

हिंदु जनजागृती समितीसमवेत अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले होते आंदोलन !

रत्नागिरी (महाराष्ट्र) – गणेशोत्सवाच्या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडून रत्नागिरी जिल्ह्यात येणार्‍या खासगी बसगाड्यांची तपासणी चालू आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणार्‍यांवर कारवाई होत आहे. यासमवेतच जिल्ह्यात गणेशोत्सव काळात खासगी बसमालकांकडून अवाच्या सवा तिकीट दर आकारले जात असल्याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडे करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने महामार्गावर तपासणी करून कारवाई करण्यात आली. दोन दिवसांत १८ खासगी बसवर कारवाई करून १ लाख ३० सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीसमवेत अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून यासंदर्भात केले गेलेले प्रयत्न –

काही नियमबाह्य गोष्टी आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात मुंबई, तसेच पुणे येथून नागरिक दाखल झाले आहेत. गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या कालावधीत खासगी बसमालकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे भाडे लाटल्याच्या विरोधात गेल्या काही वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीसमवेत अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून सातत्याने आंदोलने करणे, निवेदने देणे यांसारखे प्रयत्न केले जात आहेत. दैनिक ‘सनातन प्रभात’नेही वेळोवेळी या अनधिकृत कृत्यांवर प्रकाश टाकत सातत्याने या समस्येचे वार्तांकन केले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *