Menu Close

कॅनडात पुन्हा हिंदु मंदिराची तोडफोड : भारतविरोधी घोषणाही लिहिल्या !

गेल्या ९ मासांतील ५ वी घटना !

ओंटारियोच्या विंडसर येथील श्री स्वामीनारायण मंदिरातील ही घटना

ओंटारियो (कॅनडा) –
कॅनडामध्ये पुन्हा एका हिंदूंच्या मंदिराची तोडफोड केल्याची आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झाले असून त्याआधारे पोलीस २ आरोपींचा शोध घेत आहेत.

ओंटारियोच्या विंडसर येथील श्री स्वामीनारायण मंदिरात ५ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. गेल्या वर्षीच्या जुलै मासापासून कॅनडात घडलेली ही पाचवी घटना आहे.

(सौजन्य : Bharat Tak) 

मंदिरात काम करणारे हर्षल पटेल म्हणाले की, मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिलेली पाहून आम्हाला धक्का बसला. २० वर्षांत प्रथमच येथे असे घडले आहे. याविषयी आम्ही तातडीने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे  शहरातील हिंदू समाज संतप्त झाला आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक दैनिक सनातन प्रभात)

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *