Menu Close

अमरावती येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा आविष्कार !

डावीकडून दीपप्रज्वलन करतांना पू. अशोक पात्रीकर, डॉ. सुरेश चिकटे, श्री. नीलेशचंद्र जैन मुनी, श्री. सतीश कोचरेकर आणि सौ. अनुभूती टवलारे

अमरावती – हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे, धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणे आणि ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि महावीर मिशन ट्रस्ट यांच्या वतीने १२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात सभेला प्रारंभ झाला.

प्रारंभी श्री. विलास सावरकर यांनी केलेल्या शंखनादानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.


सभा पाहण्यासाठी क्लिक करा –

https://www.facebook.com/jagohinduamravati/videos/494857776185813

आणि इतरांनाही पहायला द्या ?


वेदशास्त्रसंपन्न सर्वश्री योगेश महाराज जोशी आणि शैलेश पाठक यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी मांडला.

सूत्रसंचालन श्री. पराग बिंड आणि सौ. प्राजक्ता जामोदे यांनी केले. या वेळी ‘महावीर मिशन ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष श्री. नीलेशचंद्र जैन मुनी, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर, रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे इत्यादी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहरातील धर्माभिमानी हिंदु मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *