Menu Close

हिंदूंनो, ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घाला – श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंचा हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

कोल्हापूर – ‘हलाल’ ही इस्लामी संकल्पना ‘निधर्मी’ म्हणवणार्‍या भारतातील बहुसंख्य ७८ टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. भारतात शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.एस्.ए.आय.), तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खासगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून सहस्रो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहे. भारतातही ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ देशभरातील विविध बाँबस्फोटांत सहभागी मुसलमान आरोपींना कायदेशीर साहाय्य करत आहे. परिणामी भारतीय अर्थव्यवस्था तथा सुरक्षा यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार घालावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ते १२ फेब्रुवारीला पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या सभेस ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदू उपस्थित होते.

या सभेत सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी शंखनाद आणि नंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.

कोल्हापूर सभेच्या प्रारंभी वेदमूर्ती श्री. शतानंद कात्रे, श्री. नारायण जोशी आणि श्री. गुरुप्रसाद जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी यांनी मांडला. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी आणि सौ. भक्ती डाफळे यांनी केले.

श्री. मनोज खाडये म्हणाले, ‘‘विशाळगड अतिक्रमणमुक्त होण्यासाठी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती’ गेली २ वर्षे कार्यरत आहे. राज्य संरक्षित स्मारकांवर पशूहत्या करण्यात येऊ नये, असे पुरातत्व विभागाचा आदेश असतांना विशाळगडावर पशूहत्या करण्यासाठी अनधिकृत शेड उभारले जाते. यावरून तेथील धर्मांधांना प्रशासकीय यंत्रणेचा कोणताच धाक नाही, असेच दिसून येते. तरी प्रशासनाने अशांवर कारवाई करण्यासाठी हिंदूंनाही आता दबावगट वाढवून स्वत:ची संघटितशक्ती वाढवली पाहिजे !’’

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी खारीचा नाही, तर हनुमंताप्रमाणे वाटा उचला ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

आज भारतात इस्लाम आणि ख्रिस्ती, तसेच अन्य अल्पसंख्य पंथांना विशेष संरक्षण दिले गेले आहे; पण देशातील बहुसंख्यांकांच्या, म्हणजेच हिंदु धर्माला कोणतेही राजकीय संरक्षण प्राप्त नाही. त्यामुळे भारतात अल्पसंख्यांकांच्या विरुद्ध कथित अन्याय घडल्यास ‘अल्पसंख्यांक आयोग’ असतो. अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी स्वतंत्र ‘अल्पसंख्यांक विकास मंत्रालय’ असते किंवा ‘सच्चर आयोग’ आदी बनवले जातात. तरी हिंदूबहुल देशात अल्पसंख्यांकांना लाभ, तर हिंदूंवर अन्याय ही स्थिती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे. कालमहिम्यानुसार कलियुगांतर्गत सत्ययुग म्हणजेच हिंदु राष्ट्र येणार आहे. ‘जेथे धर्म असतो, तेथे विजय असतो’ या धर्मवचनाप्रमाणे हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी खारीचा नाही, तर हनुमतांप्रमाणे वाटा उचलूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

धर्मांधांकडून जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी विधाने ! –  अधिवक्ता नीलेश सांगोलकर

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराविषयी ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी, ‘सोमनाथ मंदिरामध्ये श्रद्धा आणि देवता यांच्या नावाखाली अयोग्य गोष्टी होत होत्या. मुलींना गायब केले जात होते. गझनी याने याची माहिती घेतली असता त्याला यात तथ्य आढळल्यावर त्याने आक्रमण केले’, अशा प्रकारचे संतापजनक विधान केले. रशिदी यांनी यापूर्वीही ‘येणार्‍या ५०-१०० वर्षांच्या काळात श्रीराममंदिर तोडून परत तिथे बाबरी मशीद बांधली जाईल. तेव्हा कदाचित् मुसलमान शासक असतील,’ असे श्रीराममंदिराविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.

विशाळगडचा रणसंग्राम उभारणारे धर्मवीर आणि शिवप्रेमी यांचा सत्कार !

विशाळगडावरील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था यांना वाचा फाेडण्यासाठी गेल्या २ वर्षांपासून विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती लढा देत आहे. समितीच्या पाठपुराव्यामुळे गडावरील अतिक्रमण काढण्याचा पहिला टप्पा लवकरच चालू होत आहे. हा रणसंग्राम उभारणारे धर्मवीर आणि शिवप्रेमी सर्वश्री राजू यादव, संभाजीराव भोकरे, रणजित घरपणकर, शरद माळी, सुरेश यादव, प्रमोद सावंत, बाबासाहेब भोपळे, किशोर घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा सत्कार श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते करण्यात आला.

उपस्थित पक्ष-संघटना-संप्रदाय आणि संत

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे आणि शिंदे गट), विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, वारकरी संप्रदाय, शिरोली येथील ह.भ.प. विठ्ठलतात्या  पाटील, सनातनचे संत पू. सदाशिव(भाऊ) परब, पू. (डॉ.) शरदिनी कोरे

विशेष

१. प्रारंभी श्री महालक्ष्मी मंदिर येथून मशाल प्रज्वलीत करून सभास्थळी आणण्यात आली.

२. रणरागिणींचा एक गट हातात भगवे झेंडे घेऊन सभास्थळी उपस्थित झाला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *