Menu Close

‘के.एफ्.सी.’, ‘बर्गरकिंग’, ‘पिझ्झा हट’ या ‘हलाल सर्टिफाईड’ आस्थापनांवर बहिष्काराची मागणी !

‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

हिंदूंनो, भारत ‘हलाल’मुक्त करण्यासाठी देशभरात राबवण्यात येणार्‍या हलालविरोधी चळवळीत सहभागी व्हा !

‘हलालमुक्त दिवाळी’ या अभियानाच्या अंतर्गत राज्यभरात काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ‘के.एफ्.सी.’, ‘बर्गरकिंग’, ‘पिझ्झा हट’ या आस्थापनांकडे हिंदूंना हलालमुक्त उत्पादने देण्याची मागणी करण्यात आली. तसे न झाल्यास या आस्थापनांवर बहिष्कार घालण्याचे सहभागी हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदूंना आवाहन करण्यात आले. हिंदुत्वनिष्ठांचे हे संघटनच भारताला ‘हलाल’मुक्त करेल !

पुणे येथील आंदोलनात प्रशासनाला कृतीशील होण्याचे आवाहन !

१. अधिवक्त्या सीमा साळुंखे – भारताची अर्थव्यवस्था मुळापासून उपटून काढण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था राबवली जात आहे. त्याला आपण संघटित होऊन कडाडून विरोध केला पाहिजे. या समांतर अर्थव्यवस्थेला चटके देण्याची वेळ आलेली आहे. या व्यवस्थेला समूळ नष्ट करण्यासाठी भारतीय प्रशासनाने पावले उचलावीत.

उपस्थितांना संबोधित करताना अधिवक्त्या सीमा साळुंखे

२. अधिवक्ता नीलेश निढाळकर – ‘ये हलाल नही, जिहाद हैं, घर घर फैला रहा आतंकवाद है ।’ हे खरे आहे. आतापर्यंत अमली पदार्थांच्या माध्यमातून आतंकवादी संघटना पैसा गोळा करत होत्या. आतंकवादाला खतपाणी घालण्यासाठी आता ‘हलाल प्रमाणपत्रा’तून पैसा गोळा केला जात आहे. देशाला खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतंकवादी डोक्यातून निघालेला हा एकप्रकारचा सामाजिक किडा आहे. त्याला ठेचण्याचे कार्य आपण केले पाहिजे. जी आस्थापने ‘हलाल’ उत्पादनांची विक्री करतात, त्यावर आपण बहिष्कार टाकला पाहिजे. ती उत्पादने घेऊ नयेत.

उपस्थितांना संबोधित करताना अधिवक्ता नीलेश निढाळकर

३. श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती – इस्लामिक संघटना भारत सरकारची कोणतीही अनुमती न घेता, कोणताही कर न भरता ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत. यातून मिळणारा पैसा आतंकवादी, तसेच वेगवेगळ्या प्रकारचा जिहाद करणार्‍यांना न्यायालयात लढण्यासाठी पुरवला जातो. त्यातून देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. देश, देशाची राज्यघटना ‘निधर्मी’ असतांना एका धर्माच्या लोकांची मर्जी सांभाळली जात आहे. पुण्यातून चालू झालेले आंदोलन देशात चळवळ निर्माण करेल. ‘हलाल’ उत्पादनांची विक्री करणारी आस्थापने, दुकाने जोपर्यंत बंद पडत नाहीत, तोपर्यंत आपल्याला आंदोलन करायचे आहे. आपल्याला ‘हलाल’मुक्त देश निर्माण करायचा आहे.

क्षणचित्रे

१. आंदोलन चालू असतांना काही लोक स्वत:ची दुचाकी बाजूला घेऊन आंदोलनाचा विषय जाणून घेत होते, तर सिग्नलला गाडी थांबल्यावर गाडीचालक स्वत:हून साधकांना बोलावून आंदोलनाची माहिती घेत होते.

२. काहीजण स्वत:हून निवेदनावर स्वाक्षरी करत होते.

अमरावती येथे आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन !

अमरावती येथे आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

‘हलाल’ला देशातून हद्दपार करा ! – प्रकाश सिरवानी, पश्चिम विदर्भ युवा संघटक, भारतीय सिंधू सभा

दिवाळी हा हिंदूंचा पवित्र सण आहे. त्यामध्ये ‘हलाल उत्पादने’ आणून त्याला अशुभ करू नका. ‘हलाल उत्पादने’ हे हिंदूंवर आलेले मोठे संकट आहे. त्याविषयी माहिती घेऊन वेळीच त्याला देशातून हद्दपार करा !

या वर्षी सर्वांनी हलालमुक्त दिवाळी साजरी करूया ! – नितीन व्यास, प्रदेशाध्यक्ष, हिंदु महासभा

‘हलाल प्रमाणपत्र’ नावाचा जिहाद या दिवाळीच्या तोंडावर आपल्या भारत देशामध्ये पसरत चालला आहे. आपल्याच भारतामध्ये आपल्या सुरक्षेसाठी वेळोवेळी आंदोलने करावी लागतात, ही मोठी शोकांतिका आहे. या वर्षी सर्वांनी ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करून या नवीन आलेल्या संकटांना दूर करून खर्‍या अर्थाने आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन मी हिंदु महासभेच्या वतीने करत आहे.

उपस्थित मान्यवर

भारत रक्षा मंचचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजेश मिश्रा, श्री. अजित पाल मोंगा; कौंडण्यपूरपीठाचे विश्वस्त श्री. गिरीधर चव्हाण; मानव अधिकारी साहाय्यता संघाचे अमरावती जिल्हाप्रमुख श्री. आशिष तिवारी; अंबा मंडळ, भाजपचे सरचिटणीस श्री. तुषार वानखडे; भारतीय सिंधू सभेचे श्री. शैलेंद्र मेधवानी

क्षणचित्र : अमरावती येथे ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाच्या १० प्रती वितरीत झाल्या.


नागपूर येथेही दिसून आले राष्ट्र आणि धर्म प्रेमींचे संघटन !

नागपूर येथे आंदोलन करतांना राष्ट्र आणि धर्म प्रेमी

कोल्हापूर येथील आंदोलनात राष्ट्रप्रेमींचा कृतीशील सहभाग !

कोल्हापूर येथे आंदोलन करतांना राष्ट्र आणि धर्म प्रेमी

कोल्हापूर येथे झालेल्या आंदोलनात समितीचे श्री. किरण दुसे यांनी हलालमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी, शिवसेना करवीरतालुका प्रमुख श्री. राजू यादव, धर्मप्रेमी  श्री. रवींद्र खोचीकर, भुयेवाडी येथील शिवसेनेचे श्री. रमेश पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. दशरथ शिंदे आणि श्री. विजय आरेकर, बजरंग दलाचे विनायक आवळे, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी यांसह अन्य उपस्थित होते.


जळगाव येथील आंदोलनात उत्स्फूर्तपणे घोषणा !

जळगाव येथे आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

जळगाव – येथील स्टेडियम चौकात सायंकाळी ५ वाजता आंदोलनास प्रारंभ झाला. या वेळी हिंदु महासभा, हिंदु राष्ट्र सेना, मानव अन्याय निवारण समिती, सनातन संस्था या संघटनाचे प्रतिनिधी, तसेच राष्ट्र अन धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते. उपस्थितांना समितीचे श्री. निखिल कदम, कु. सायली पाटील, सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी संबोधित केले. ‘नही चलेगी, नही चलेगी, हलाल की सक्ती नही चलेगी’ अशा घोषणा या वेळी उत्स्फूर्तपणे देण्यात आल्या.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *