-
अभिनेते आमीर खान यांच्या ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा संवाद !
-
चित्रपटात आमीर खान यांच्याकडून ‘महंमद’ नावाच्या पाकिस्तानी आतंकवाद्याला वाचवण्याचेही दृश्य !
- याविरोधात पोलिसांत तक्रार करून संबंधितांवार कारवाई झाली पाहिजे आणि या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे !
- असे वाक्य असतांना केंद्रीय केंद्रीय परिनिरीक्षण मंडळाने याला प्रमाणपत्र दिलेच कसे ? असे एखादे वाक्य मुसलमानांच्या विरोधात असते, तर एव्हाना काय झाले असते, हे वेगळे सांगायला नको ! -संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुंबई – अभिनेते आमीर खान यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटात चित्रपटात त्यांच्या तोंडी ‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’, असा संवाद आहे. यास भाजपच्या युवा मोर्चाचे सदस्य शिखर बख्शी यांनी विरोध केला आहे.
https://twitter.com/JaipurBJP/status/1557786357925171205?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1557786357925171205%7Ctwgr%5E6ac711357d6623db178f22b0afa05563457c2482%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsanatanprabhat.org%2Fmarathi%2F604291.html
शिखर बख्शी यांनी ट्वीट करून म्हटले आहे, ‘‘या चित्रपटातील एका दृश्यात पाकिस्तानी सैनिक आमीर खान याला (ज्याने एका भारतीय शीख सैनिकाची भूमिका साकारली आहे) विचारतो, ‘मी प्रतिदिन नमाजपठण करतो, तर तू पूजा का करत नाहीस?’ त्यावर आमीर खान म्हणतो, ‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात.’ हे वाक्य बोलून आमीर खान यांनी शीख आणि हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. मला अजून कळत नाही की, जगभरातील शिखांनी यास अद्याप विरोध केला नाही ? का ? कारण हे त्यांच्या धोरण सूचीमध्ये नाही ? हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे भारतीय संस्कृती आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे कृत्य आधीपासून होत आले आहे. आमीर खान यांच्या चित्रपटांतून हे सातत्याने होत असल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटात आमीर खान एका महंमद नावाच्या पाकिस्तानी आतंकवाद्याला वाचवतो, असेही दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात ‘एक भारतीय सैनिक सैन्यातील लोक आणि शत्रू यांच्यातील भेद कसा समजू शकत नाही’, असे शक्य आहे का ?’’
‘पूजा-पाठ से मलेरिया फैलता है, दंगे होते हैं’: ‘लाल सिंह चड्ढा’ में आमिर खान का हिन्दू विरोधी प्रोपेगेंडा, ‘मोहम्मद’ नाम के पाकिस्तानी आतंकी को बचाया#LalSinghChaddha #AamirKhanhttps://t.co/h9yiRyiPUU
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 11, 2022
स्रोत: दैनिक सनातन प्रभात